अर्थजगत

0
115

जूनमध्ये भारताच्या घाऊक महागाईत सलग तिसर्‍या महिन्यात मोठा दिलासा दिला आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारताचा घाऊक महागाई दर जूनमध्ये वार्षिक आधारावर उणे 4.12 टक्क्यांपर्यंत खाली आला, तर मे महिन्यात तो उणे 3.48 टक्के होता. भारताचा घाऊक महागाई दर 8 वर्षांतील नीचांकी पातळीवर आला आहे. मासिक आधारावर जूनमध्ये घाऊक महागाई दर 0.40 टक्क्यांनी घसरला. जूनमध्ये घाऊक महागाई दरात घसरण मुख्यत्वे खनिज तेल, अन्न उत्पादने, मूलभूत धातू, कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि कापड यांच्या किमती कमी झाल्यामुळे झाली. गेल्या वर्षी जूनमध्ये तो 16.23 टक्के होता.अन्न निर्देशांकातील घाऊक महागाई जूनमध्ये वर्षभराच्या तुलनेत 1.24 टक्क्यांनी घसरली, जी महिन्यापूर्वी 1.59 टक्क्यांनी घसरली होती. जूनमध्ये प्राथमिक वस्तूंची महागाई 2.87 टक्क्यांवर आली.