मसाला भेंडी

0
200

साहित्य – भेंडी, चौकोनी चिरलेली – साधारण 3-4 वाट्या, कांदा 1 मध्यम किंवा अर्धा मोठा, टोमॅटो – 1 मध्यम आकाराचा, सिमला मिरची – एक मध्यम किंवा फार मोठी असल्यास अर्धी पुरेल, धण्या-जिर्‍याची पूड दीड ते 2 चमचे, गरम मसाला (ऑप्शनल), कसुरी मेथी, हळद, तिखट, मीठ, फोडणीचे साहित्य.

कृती – भेंडी, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची चिरून घ्या. भेंडी फार बारीक चिरू नये. सिमला मिरचीचे देखिल मोठेच तुकडे असू द्यावे. कढईत तेल गरम करून जिरे मोहरीची फोडणी करा. त्यात कांदा परतावा. पारदर्शक झाला की टोमॅटोच्या फोडी घालून परताव्या. मिश्रण जरा मिळून आले की धणे जिरे पावडर, गरम मसाला (घालणार असल्यास), हळद, तिखट घाला. लगेचच भेंडी घालून जरा परतावी. 2-3 मिनिटांनी सिमला मिरचीचे तुकडे घालावे. सिमला मिरची थोडी नंतर घालण्याचे कारण म्हणजे ती फार गाळ शिजणे अपेक्षित नाही. आता मीठ घालावे, भाजी मध्यम आचेवर शिजू द्यावी. झाकण ठेवू नये. शिजत आल्यावर दोन तीन चिमुट कसुरी मेथी घालून मिक्स करा. कसुरी मेथीचा स्वाद फार छान लागतो. गॅस बंद करून वरून कोथिंबीर घाला.