गुलकंद-नारळ करंज्या
साहित्य : २ वाट्या बारीक रवा, १
वाटी मैदा, पाव चमचा मीठ, ८ टे. स्पून पातळ
डालडाचे मोहन. सारणासाठी २ मोठे नारळ, ३
वाट्या साखर, अर्धा चमचा वेलदोड्यांची पूड,
२ टे. स्पून बेदाणे, ८-१० बदाम, सारणामध्ये
१ लहान बाटली गुलकंद घालावा व थोडा
खवा किंवा ७-८ पेढे कुस्करून घालावे.
कृती : रवा, मैदा व तूप एकत्र करावे.
नंतर दुधात व पाण्यात पीठ भिजवावे.
साधारण तासभराने फूडप्रोसेसरमध्ये तिंबून
घ्यावे. त्याच्या बेताच्या आकाराच्या लाट्या
कराव्यात, वाळू देऊ नयेत यासाठी ओल्या
कपड्याखाली झाकून ठेवाव्या. ओल्या
खोबर्याचे साखर घालून सारण करून
घ्यावे. त्यात गुलकंद, वेलदोड्यांची पूड व
बदामाची साले काढून केलेले काप घालावे.
थोडा खवा भाजून घेऊन घालावा किंवा
पेढे तसेच कुसकरून टाकले तरी चालतात.
रवा-मैद्याच्या पीठाच्या पातळ पुर्या लाटून,
त्यात सारण भरून करंज्या करून बाजूने कडा
चांगल्या जुळवून, नंतर कापणीने कापून मंद
गॅसवर तळाव्यात