शके १९४५ शोभननामसंवत्सर, पौष कृष्णपक्ष, विशाखा अहोरात्र
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. ३० मि.
राशिभविष्य
मेष : मंगळाचेच घनिष्ठा नक्षत्र आज प्रभावी असल्याने कार्यक्षेत्रात आपण उत्तम
कामगिरी दाखवाल. आपले नेतृत्वगुण, हिंमत व मेहनती स्वभाव आपणास निश्चितच चांगले
फळ देईल.
वृषभ : भागीदारी व्यवसायात लाभ होतील. जोडीदाराच्या नक्षत्रातील राशीस्वामीचे
अष्टमातील भ्रमण आपणास सध्यात री महत्वपुर्ण निर्णय घेण्यास लगाम लावत आहे.
मिथुन : संध्याकाळी साडेसात पर्यंत तरीवाहने जपून चालवावीत. वादविवाद टाळावा.
कामावर लक्ष केंद्रीत करून हातातील काम पुर्ण करण्याकडे लक्ष द्यावे.
कर्क : भाग्याची साथ लाभेल. आपण
घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. जुने मित्र
मंडळी भेटतील. दिवस अत्यंत आनंददायी
वातावरणात व्यतीत होईल.
सिंह: वाहन जपून चालवावे. आरोग्याची काळजी घ्यावी. नियोजनपूर्वक कृती करावी.
कुणाच्या वादात पडू नये. आपले काम मेहनत व सातत्य राखून पार पाडावे.
कन्या : पंचमातील बुध असंगत आहे. सध्या तरी कामाच्या नियोजनावर भर द्यावा
लागेल. दिवस सकारात्मक असेल. वाहनपिडा सतावेल.
तूळ : प्रॉपर्टी संदर्भात कार्य फायदेशीर ठरतील. घरात आनंदी वातावरण असेल.
जळवचे प्रवासाचे बेत आखाल. छोट्या-मोठ्या दुखापती उदा.कापणे, चिरणे आदींचा संभव
आहे. म्हणून जपून कामे करावीत.
वृश्चिक : जुनी येणी वसूल होईल. आर्थिक कामात उन्नती साधाल. बौध्दिक कामात यश
लाभेल. वाहन सावकाश चालवावे.
धनु : कार्यक्षेत्रात नावलौकिक वाढेल.व्यवहार फायदेशीर ठरतील. भागीदारीत फायदा
होईल मात्र संगनमत ठेवावे लागेल. मागील परिश्रम फळास येतील.
मकर : मानसिक स्थिती सांभाळून शांततेत निर्णय घ्यावे. भागीदारी व्यवसायात
लाभ होऊ शकतो. मागील उधारी वसुल होईल. स्थावर जंगम मालमत्तांचे व्यवहार करा.
कुंभ : वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. अनावश्यक खर्च होऊ शकतो.
व्यवहार काळजीपुर्वक करावे.
मीन : दिवस आनंदी असेल. हाती घेतलेले काम उत्तमरित्या पुर्ण करू शकाल.
सकारात्मक दिवस ठरेल.
संकलक: अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.