रस्त्यावर गाडी चालवताना मास्क लावण्याचा उपयोग होतो का?

0
39

रस्त्यावर गाडी चालवताना मास्क लावण्याचा उपयोग होतो का?

बर्‍याचदा टीव्हीवर कार्यक्रम बघताना किंवा
तुम्ही दिल्ली, मुंबईत राहत असाल तर तेथील
रस्त्यावर वाहने चालवणार्‍या अनेक व्यक्ती तोंडावर
कापडी मास्क बांधून गाड्या चालवताना दिसतात.
हवेच्या प्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम या व्यक्ती
खरेच टाळू शकतात का? असा प्रश्न पडणे
स्वाभाविकच आहे. हवेच्या प्रदूषणाचे प्रमुख कारण
म्हणजे वाहनांचा धूर हे होय. या प्रदूषित हवेत
काजळी, सल्फर डायऑसाइड, अमोनिया,
अल्डिहाईड, नायट्रोजनचे ऑसाइड, तसेच अत्यंत
सूक्ष्म अशा आकारमानाची धूळ असते. याखेरीज
कार्बन मोनॉसाइड व शिसेही असते.
आपल्या असे लक्षात येईल की, आपण
रहदारीच्या ठिकाणी गाडी चालवत असताना
सभोवतालच्या प्रदूषित हवेत बरेचसे विषारी वायू
असतात (जसे कार्बन मोनॉसाइड, सल्फर
डायऑसाइड, अमोनिया इत्यादी.) कापडी वा
इतर प्रकारच्या मास्कमुळे हवेला नाकात जाण्यास
अटकाव होत नाही. तसे करणेही हानीकारक
ठरेल, कारण असा अभेद्य मास्कमुळे व्यक्तीला
जीवनावश्यक असा प्राणवायू मिळणार नाही व
व्यक्ती गुदमरेल. वायूखेरीज अत्यंत सूक्ष्म अशी
धूळसुद्धा या कापडी आवरणाच्या आरपार जाऊ
शकते. साहजिकच अशा विषारी वायूंचे व धुळीचे
व्हायचे ते दुष्परिणाम कापडी मास्क असो वा नसो,
व्यक्तीला होणारच. फक्त आपण सुरक्षित असल्याचा
वा हवेच्या प्रदूषणापासून वाचत असल्याचा भ्रम
तेवढा असेल. त्यामुळे रस्त्यावर गाडी चालवताना
असे मास्क लावण्याऐवजी वाहनाची वेळेवर दुरुस्ती
व देखभाल, पेट्रोल व ऑईलचे योग्य प्रमाण,
सिग्नलच्या ठिकाणी गाडी बंद करणे, उगाचच
अ‍ॅसीलेटर रेझ न करणे, मर्यादेपेक्षा जास्त वेगात
गाडी न चालवणे इत्यादी गोष्टींकडे जास्त लक्ष
दिल्यास आपल्या सभोवतालची हवा प्रदूषित होणार
नाही व आपल्याला तसेच इतरांनाही प्रदूषणाचे
दुष्परिणाम भोगावे लागणार नाहीत.