मॅड काऊ डिसीज का होतो?
५ वर्षापूर्वी युरोपमध्ये विशेषतः इंग्लंडमध्ये
प्राण्यांच्या या रोगाने हाहाकार माजवला होता.
मॅड काऊ डिसीज म्हणजे शास्त्रीय भाषेत बोव्हाईन
स्पॉन्जीफॉर्म एन्केफॅलोपॅथी. मूलतः शाकाहारी
असणार्या गाई-म्हशींना त्यांचे मांस वाढावे यासाठी
प्राण्यांचे मांस-हाडे यांची भुकटी या देशांमध्ये
दिली जात असे. याची परिणती या प्राण्यांमध्ये
एका संसर्गक्षम प्रथिनाच्या अर्थात ‘प्रायॉन’च्या
निर्मितीत झाली व या रोगाची लागण जनावरांमध्ये
होऊ लागली. अशी या रोगांची कारणमिमांसा दिली
जाते. १०७० मध्ये या रोगाची सुरुवात गाईंमध्ये
झाल्याविषयी शयता वर्तवली जाते. १९८६ मध्ये
हा रोग दोन गाईंना झाल्याची खातरजमा करण्यात
आली.
प्राण्यांचे मांस खाणार्या व्यक्तींमध्ये मेंदूवर
परिणाम करणार्या क्रूट्झफील्ड-जॅकॉब रोगाचा
एक प्रकार आढळून आला. कमी वयात होणारा
गंभीर रोग जीवघेणा ठरतो. यामुळे मांस खाणार्या
लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. इंग्लंडमधून मांस
आयात करण्यास अनेक देशांनी निर्बंध घातले.
इंग्लंडचे अर्थकारणही अडचणीत आले. यावर उपाय
म्हणून इंग्लंडमध्ये रोगग्रस्त किंवा रोग असल्याच्या
संशय असलेल्या गाई मारून टाकण्यात आल्या.
तसेच शाकाहारी प्राण्यांना देण्यात येणार्या आहारात
मांस-हाडे यांची भुकटी टाकणे बंद करण्यात आले.
त्यामुळे आज हा रोग बर्याच प्रमाणात आटोयात
आला आहे. मॅड काऊ डिसीज व उपरोक्त मानवी
रोग यातील संबंधामुळे मॅड काऊ डिसीजला महत्त्व
प्राप्त झाले. निसर्ग नियमांच्या विरूद्ध वागल्यास काय
होऊ शकेल याचे एक उदाहरण म्हणजे मॅड काऊ
डिसीज होय. या उदाहरणातून माणसाने धडा घेतला
नाही तर असे अनेक जीवघेणे रोग भविष्यात निर्माण
होतील यात शंका नाही.