दैनिक पंचांग गुरुवार, दि. ८ फेब्रुवारी २०२४

0
39

शिवरात्रि, शके १९४५ शोभननाम संवत्सर, पौष कृष्णपक्ष, उ.षा.२६|१४
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष : आपली स्थिति, वास्तविकता वाढेल. पारिवारिकदृष्टया वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल. दिवस चांगला जाईल. महत्त्वाच्या कार्यात हितचिंतकांकडून मदत मिळेल.

वृषभ : उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. कलाक्षेत्रातील व्यक्तींच्या कामात स्थिती सुखद राहील. नवीन करार होतील.

मिथुन : खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. जबाबदारीची कामे पडतील. जुने मित्र भेटतील. हितशत्रुंपासून सावधान. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ अनुकूल राहील.

कर्क : शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्हा करु नका. मन रमणार नाही. व्यावसायिक अडचणी सतावतील.

सिंह : मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. राजकीय व्यक्तींसाठी स्थिती संतोषदायक राहील.

कन्या : अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्‍यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. दिवस आनंदात जाईल. विश्वासू दगा देतील.

तूळ : आपल्या प्रयत्नाने उन्नति कराल. धनलाभ होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल.

वृश्चिक : आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. नवीन ओळखी संभवतात. मानसन्मानात वाढ होईल.

धनु : संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग. मनात नवीन कल्पना सुचतील. आपल्या क्रोधावर संयम ठेवाल.

मकर : नवीन कार्य सुरू करू नका. विरोधकांपासून दूर रहा. यश मिळणार नाही मागील केलेली सत्कृत्ये आज फळास येतील.

कुंभ : आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. पूर्वीपासून आपल्या मनातील असलेले संकल्प पूर्ण होतील.

मीन : अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. पितृचिंता जाणवेल. वाहन चिंता सतावेल. आरोग्य उत्तम राहिल.

                                                                                      संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.