रताळ्याची खीर

0
67

रताळ्याची खीर


साहित्य – २ रताळी, एका नारळाचे दूध, १ वाटी बारीक चिरलेला गुळ, चिमूटभर
मीठ, थोडी वेलदोड्याची व जायफळाची पूड.

कृती – रताळी उकडून घ्यावी. नंतर साले काढून बारीक फोडी कराव्या. नारळाचे
दूध व गुळ एकत्र करावे. त्यात रताळ्याच्या फोडी घालून उकळावे. दाटपणासाठी थोड्या
रताळ्याच्या फोडी कुस्करून त्यात घालाव्या. नंतर वेलदोडे व जायफळ यांची पूड घालावी.