किडलेल्या दातामुळे फार त्रास होत
असल्यास गरम पाण्यात थोडा हिंग टाकून
गुळण्या कराव्यात म्हणजे त्रास कमी होतो.
दैनिक पंचांग शुक्रवार, दि. ९ फेब्रुवारी २०२४
दर्श अमावास्या, शके १९४५ शोभननाम संवत्सर, पौष कृष्णपक्ष, श्रवण २३|२९
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.
राशिभविष्य
मेष: आपणास आकस्मिकरीत्या इतर लोकांबरोबर चांगला काळ व्यतीत होईल.
घरातील वयोवृद्धांची चिंता मात्र सतावेल. वास्तुसौख्य लाभेल.
वृषभ : एखाद्या कल्पक, सर्जनशील कार्यात गुंतलेले राहू शकता. प्रणयातही समस्या
येण्याची शयता. मात्र संयम राखल्यास आनंद प्राप्त होईल.
मिथुन : काळजीपूर्वक कार्य करा. कोणतेही कार्य एखाद्यावर विसंबून करू नका.
जुन्या मित्र मंडळींची भेट होईल. सार्वजनिक प्रसंगांतून दिवस चिंतेचा.
कर्क: अपत्यांपासून आनंदप्राप्ती होईल. वाहनसुख मिळेल. उत्तम भोजनाचे
सुख मिळेल. पितृचिंता सतावेल. आधी दिलेली उधारी उसनवारी मिळेल.
सिंह: भागीदारीच्या विषयांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. वाहने
जपून चालवावीत. एखादी नवीन वस्तू घेण्यास दिवस अनुकूल आहे.
कन्या : आपण आपल्या इच्छेनुसार कार्य करण्याचे प्रयत्न करता त्यावेळी त्रास होण्याची
शयता आहे. पत्नी व मुलांच्या सहवासाने दिवस आनंदात व्यतीत होईल.
तूळ : परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे आपल्यासाठी उत्तम राहील. सरकारी
कामकाजासाठी दिवस अत्यंत अनुकूल आहे.
वृश्चिक : आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या. मागील चालू असलेली
प्रकरणी सुरळीत होतील.
धनु : नव्या योजना आणि प्रोजेट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर
ठरेल. हाती नवीन कामे घेण्यासाठी दिवस अत्यंत अनुकूल आहे.
मकर : एखादी चांगली संधी मिळाल्यामुळे आपली मनस्थिती चांगली राहील. मागील
एखादे महत्त्वाचे काम मार्गी लागण्याची दाट शयता आहे.
कुंभ : गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक योजना आरंभ करू शकाल.
मानसिक स्थिती अत्यंत प्रसन्न राहिल.
मीन : अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. जुन्या
मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल.
संकलक: अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.
शास्त्राचा उपयोग कोणता?
शास्त्राचा उपयोग कोणता?
प्राचीन भारतात नागार्जुन नावाचे एक महान रसायन शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांना एका सहाय्यकाची आवश्यकता होती. दोन तरुण या कामासाठी त्यांच्या मुलाखतीला आले आचार्यांनी दोघात एक पदार्थ दिला व त्यापासून एक विशिष्ट रसायन करून आणायला सांगितलं. तीन दिवसाचा अवधी दिला. दोघे उत्साहाने कामाला लागले. तीन दिवसांनी परत आले. आचार्यांनी विचारले, “कामात काही अडचणी तर आल्या नाहीत?”’ पहिला अभिमानाने म्हणाला, “आईला ताप होता वडील पोटदुखीने हैराण झाले होते. भाऊ पडल्यामुळे हाडाला मार लागला होता. पण माझी साधना मी सोडली नाही व हे रसायन करून आणल आहे.” दुसरा म्हणाला, “आचार्य, क्षमा असावी. मी घरी जात असता वाटेत एक वृद्ध रुग्ण दिसला. निर्धनही होता बिचारा. त्याला औषधोपचार करून त्याचे व्यवस्था लावण्यात वेळ गेला. आपण दिलेलं काम पूर्ण करू शकलो नाही. कृपया आणखी दोन दिवसाची सवड द्यावी.” आचार्यांनी त्याचीच निवड केली. ते म्हणाले, “रसायन शास्त्राचा उपयोग जीवन रक्षणासाठी झाला पाहिजे, समाजविन्मुख ज्ञानाचा काय उपयोग?” तात्पर्य ः ज्ञानाचा/शिक्षणाचा उपयोग समाजात झाला तर खर्या अर्थाने शिक्षणाचा उपयोग झाला असे समजावे.
गुडमार खाल्ल्यानंतर साखरेची चव का लागत नाही?
गुडमार खाल्ल्यानंतर साखरेची चव का लागत नाही?
साखर किंवा पेढा खाऊन नंतर चहा पिऊन पहा. काय म्हणता हा प्रयोग तुम्ही केला आहे? असे असेल तर नक्कीच तुम्ही तो परत करणार नाही! कारण चहा अगोड लागतो. दुसरी एक गंमत सांगतो… काही खेड्यांमध्ये एक प्रथा आढळते. साप चावलेल्या माणसाला मिरची किंवा कडूनिंबाचा पाला खायला देतात. त्या माणसाने जर मिरचीची तिखट वा कडूनिंबाची कडू सांगितली तर तो बरा होणार असे मानतात व जर चव नाही असे तो म्हणाला, तर तो मरणार असे मानतात. याबद्दल आता माहिती घेऊ. जिभेमुळे आपल्याला चव कळते. चव कळण्यासाठी जिभेवर स्वादांकुर असतात. या स्वादांकुरानुसार एखादा पदार्थ सूक्ष्म प्रमाणात जरी ठेवला तरी आपल्याला चव कळते. जिभेच्या कडांना, पाठीमागच्या बाजूस व शेंड्याला कडू, तुरट आंबट गोड अशा चवी वेगवेगळ्या प्रमाणात समजतात. स्वादांकुराचे कार्य व्यवस्थित चालले तरच चव समजते. गुडमार ही वनस्पती आहे. तिचा पाला खाल्ल्यानंतर गोड चव कळणार्या स्वादांकुरावर परिणाम होतो व हे स्वादांकुर त्यांचे कार्य करू शकत नाहीत. साहजिकच गुडमार खाल्ल्यानंतर साखर गोड लागत नाही. विषारी सापाच्या विषाचा स्वादांकुरातून चवीची संवेदना मेंदूपर्यंत वाहून नेणार्या मज्जातंतूंवर परिणाम झाल्याने काही विशिष्ट प्रकारचे साप चावल्यास तिखट, कडू, चव कळत नाही. म्हणजे वर सांगितलेल्या खेड्यातील प्रथेत हे वैज्ञानिक तत्व आहे. पण चव कळत नाही म्हणून माणूस मरणार, असे मानणे योग्य नाही. सापाच्या विषावरील प्रतिद्रव्य दिल्यास व इतर उपचार मिळाल्यास साप चावलेली व्यक्ती वाचू शकते. काही वेळा स्वादांकुराचे कार्य काही विशिष्ट प्रमाणात कमी होते. किंवा आपण खाल्लेल्या पदार्थांमुळे त्यांच्या जाणिवा बोथट होतात. याचे उदाहरण म्हणजे तिखटाचा दुसरा घास पहिल्या घासापेक्षा तिखट कमी तिखट लागतो व साखर खाऊन चहा पिल्यास चहा अगोड लागतो






