दैनिक पंचांग शुक्रवार, दि. ९ फेब्रुवारी २०२४

0
56

दर्श अमावास्या, शके १९४५ शोभननाम संवत्सर, पौष कृष्णपक्ष, श्रवण २३|२९
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६  वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष: आपणास आकस्मिकरीत्या इतर लोकांबरोबर चांगला काळ व्यतीत होईल.
घरातील वयोवृद्धांची चिंता मात्र सतावेल. वास्तुसौख्य लाभेल.

वृषभ : एखाद्या कल्पक, सर्जनशील कार्यात गुंतलेले राहू शकता. प्रणयातही समस्या
येण्याची शयता. मात्र संयम राखल्यास आनंद प्राप्त होईल.

मिथुन : काळजीपूर्वक कार्य करा. कोणतेही कार्य एखाद्यावर विसंबून करू नका.
जुन्या मित्र मंडळींची भेट होईल. सार्वजनिक प्रसंगांतून दिवस चिंतेचा.

कर्क:  अपत्यांपासून आनंदप्राप्ती होईल. वाहनसुख मिळेल. उत्तम भोजनाचे
सुख मिळेल. पितृचिंता सतावेल. आधी दिलेली उधारी उसनवारी मिळेल.

सिंह: भागीदारीच्या विषयांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. वाहने
जपून चालवावीत. एखादी नवीन वस्तू घेण्यास दिवस अनुकूल आहे.

कन्या : आपण आपल्या इच्छेनुसार कार्य करण्याचे प्रयत्न करता त्यावेळी त्रास होण्याची
शयता आहे. पत्नी व मुलांच्या सहवासाने दिवस आनंदात व्यतीत होईल.

तूळ : परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे आपल्यासाठी उत्तम राहील. सरकारी
कामकाजासाठी दिवस अत्यंत अनुकूल आहे.

वृश्चिक : आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या. मागील चालू असलेली
प्रकरणी सुरळीत होतील.

धनु :  नव्या योजना आणि प्रोजेट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर
ठरेल. हाती नवीन कामे घेण्यासाठी दिवस अत्यंत अनुकूल आहे.

मकर : एखादी चांगली संधी मिळाल्यामुळे आपली मनस्थिती चांगली राहील. मागील
एखादे महत्त्वाचे काम मार्गी लागण्याची दाट शयता आहे.

कुंभ : गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक योजना आरंभ करू शकाल.
मानसिक स्थिती अत्यंत प्रसन्न राहिल.

मीन :  अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. जुन्या
मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल.

                                                            संकलक: अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.