श्री गणेश जयंती, विनायक चतुर्थी (अंगारक योग), शके १९४५ शोभननाम
संवत्सर, माघ शुलपक्ष, उ.भा.१२|३५ सूर्योदय ०६ वा. २९ मि. सूर्यास्त ०६ वा. ३१ मि.
राशिभविष्य :
मेष: महत्वाकांक्षा वाढतील. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात अपेक्षेनुसार
घडेल. मागील उधारी उसनवारी वसुल होईल.
वृषभ: यथायोग्य विचार करून कामे करा. कौटुंबिक विषयांसाठी वेळ उत्तम राहील.
मुले व पत्नी यांचा उत्तम सहवास लाभेल.
मिथुन : बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल. कोणत्याही प्रकारची जोखीम
टाळा. मात्र संयमाने सामोरे गेल्यास दिवस आनंदात जाईल.
कर्क : दिवस चांगला आहे. आपल्या मनात अनेक प्रकारच्या काळज्या घर करू
शकतील. कार्यालयाच्या ठिकाणी सहकार्यांशी वाद घालू नयेत.
सिंह : इतर लोकांना आपण प्रभावित कराल. मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी
मिळेल. संततीसौख्य प्राप्त होईल. भावंडांकडून सहकार्य मिळेल. नोकरीमध्ये बढती व
पगारवाढीचे योग आहेत.
कन्या : मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. नोकरीपेशा व्यक्तींसाठी
उत्तम काळ आहे. वाहने व तांत्रिक उपकरणे जपून वापरावीत.
तूळ : आज पैसे आणि बळाची विशेष भूमिका राहील. काही महत्वपूर्ण प्रश्नांची
सोडवणूक होण्याची शयता आहे. मागील नियोजित कामे पूर्ण होतील.
वृश्चिक : कला जगातील व्यक्तींना लाभ मिळेल. शत्रू वर्ग पराभूत होईल. आपल्या
फटकळ व उतावीळ स्वभावावर नियंत्रण मिळविल्यास यश प्राप्ती होईल. मागील उधारी
व उसनवारी वसुल होईल.
धनु : स्वार्थी बनू नका. प्रेम-प्रसंगात यश मिळेल. व्यापार-व्यवसायात आर्थिक
लाभ मिळेल. पितृचिंता सतावेल. वडीलांशी वाद करू नकात. वाहने चोरीस जाण्याचा
संभव आहे.
मकर : नोकरीपेशा व्यक्ती वायफळ खर्च टाळा. आनंदाची बातमी मिळण्याची शयता
आहे. दिवस अत्यंत आनंदात व समाधानात व्यतीत होईल.
कुंभ : पर्याप्त लाभ मिळणे कठीण. व्यापारिक करार व व्यवहारात सावधगिरी
बाळगा. आजचे काम उद्यावर ढक़लू नयेत यामुळे आपली प्रतिमा मलीन होऊ शकते.
वरिष्ठांकडून स्तुतीसमुमने उधळली जातील.
मीन : पळापळ अधिक राहील. शेयरच्या विषयामध्ये सावधगिरी बाळगा. पुर्व सुकृत
आज फळास येईल. मागील देणी पुर्ण होतील. दिवस आनंदात व उत्साहात जाईल. जुन्या
मित्र-मैत्रिणींची भेट होईल.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.





