लो सॉल्ट म्हणजे काय?

लो सॉल्ट म्हणजे काय?

उच्च रक्तदाब असणार्‍या लोकांना ‘मीठ
खाऊ नका’ असा सल्ला डॉटर देतात. मिठावाचून
जेवण ही कल्पनाच काही लोकांना करवणार
नाही. तुम्हीही एकदा मिठावाचून जेवण्याचा प्रयत्न
करा. नक्कीत तुम्हाला ‘जेवण’ काय ‘जीवन’
सुद्धा अळणी झाल्यासारखे वाटेल! मग या
उच्च रक्तदाबवाल्यांचे काय? त्यांचा हा रोग तर
आयुष्यभराचा सोबती. मीठ म्हणजे सोडियम
लोराईड. यातील सोडियममुळे शरीरात पाणी
जास्त प्रमाणात राखले जाते. साहजिकच रक्तदाब
वाढतो. त्यामुळे नीट कमी खायला वा बंद
करायला सांगतात. शरीराला सोडियमचा पुरवठा
स्वयंपाकात टाकल्या जाणार्‍या मीठाखेरीज इतर
अनेक अन्नपदार्थातून होत असल्याने मीठ खाणे
बंद केले, तरी शरीराला योग्य त्या प्रमाणात वा
उपयुक्त क्षार मिळत राहतो; पण हे जरी खरे असले
तरी जेवताना काही जणांना मीठ लागतेच. अशा
लोकांसाठी साध्या मिठाऐवजी म्हणजेच सोडियम
लोराईडऐवजी पोटॅशियम वा मॅग्नेशियम लोराईड
अर्थात सोडियम नसलेले मीठ उपयुक्त ठरते.
पोटॅशियम, मॅग्नेशियम लोराईडमुळे चव मीठाचीच
लागते; पण सोडियममुळे होणारे दुष्परिणाम होत
नाहीत.
बाजारात हे मीठ ‘लो सॉल्ट’ या नावाने
उपलब्ध आहे. उच्च रक्तदाबाच्या लोकांसाठी जेवणात
व जीवनात रंग निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम
हे मीठ करते.

डायबिटीज रुग्णांसाठी फायदेशीर

0

डायबिटीज रुग्णांसाठी फायदेशीर
ज्यांना शुगरचा त्रास असतो त्यांनी कच्च्या पपईचे सेवन करून रक्तात शर्कराच्या मात्रेला
कमी करू शकता. यामुळे शरीरात इंसुलिनची मात्रा वाढते. कच्च्या पपईत फायबर भरपूर
प्रमाणात असतो. पपई पोटाशी निगडित समस्या दूर करते आणि शरीरातून विषारी पदार्थ बाहेर
काढते. मात्र गर्भवती महिलेस पपई खायला देऊ नये.

सुविचार

नम्रता म्हणजे अहंकाराचा नाश. : महात्मा गांधी

श्रीखंड

0

श्रीखंड

साहित्य : १ किलो चक्का, १ किलो
साखर, वेलदोडा-जायफळ पूड प्रत्येकी
१ चमचा, ८-१० केशर काड्या चुरून, हवे
असल्यास बदाम-पिस्त्याचे पातळ काप.
कृती : चक्का व साखर आदल्या
दिवशी एकत्र करून फ्रिजमध्ये ठेवावे. जर
घाई असेल, वेळ कमी असेल तर साखर
दळून चयात मिसळावी. अर्धी वाटी गरम
दुधात केशर भिजत ठेवावे व थोड्या वेळाने ते
खलावे. हँडमिसी किंवा श्रीखंडाच्या यंत्रातून
चक्का-साखर मिश्रण घोटावे व मग त्यात
केशर, वेलदोडा, जायफळ पूड, बदाम-पिस्ते
घालावेत व व्यवस्थित ढवळून फ्रिजमध्ये
ठेवावे. शयतो श्रीखंड आदल्या दिवशी
करून ठेवावे म्हणजे मुरते. फ्रिजशिवाय मोठ्या
पातेल्यात किंवा तसराळ्यात पाणी घालून
त्यात ठेवले तरी चालते. म्हणजे आंबत नाही
किंवा फसफसत नाही. मातीच्या कुंडीत पाणी
घालून ठेवले तर छान गार राहाते.
टीप : श्रीखंडासाठी नेहमी निरसे दूध
कोमट करून मग चक्का बांधावा. दूध पूर्ण
तापवू नये म्हणजे छान मलईदार चक्का होतो.

डासांपासून मुक्तीसाठी

डासांपासून मुक्तीसाठी
एका मोठ्या भांड्यात पाणी भरून त्यात
३-४ चमचे मोहरीचे तेल टाकावे. घरात
फिरणारे डास त्या भांड्याजवळ गोळा होतील.
भांडे घराबाहेर ठेवल्यास तुमच्या घराला
डासांपासून मुक्ती मिळते.

सल्ला

0

कपभर दाणेदार साखरेत रिफाईंड
तेलाचे २ चमचे मिसळून पेस्ट बनवून संपूर्ण
शरीरावर मालिश करा. थंड पाण्याने स्नान
करून बॉडीलोशन लावा. त्वचा उजळून
निघेल.

वास्तू

0

* दक्षिणमुखी घराच्या उत्तरेसही
एक दरवाजा बसवून घेतल्यामुळे दक्षिणेचा
वास्तूदोष निष्प्रभ होतो.
* दक्षिणमुखी घरासमोर जास्त जागा
रिकामी सोडू नये. * दक्षिणमुखी भूखंडाचे
मुख्य प्रवेशद्वार पूर्वेस किंवा उत्तरेस ठेवण्याचा
सल्ला वास्तूशास्त्राने दिला आहे.
* मुलांनी डायनिंग टेबलवर अभ्यास
करणे अत्यंत अशुभ होय.
* स्वयंपाकघर आग्नेय कोपर्‍याव्यतिरिक्त
इतर कोणत्याही दिशेस बांधलेले असल्यास
कुटुंबातील महिला कायम मानसिक
तणावाखाली राहतात.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

प्रियकर : प्रिये तुझी आठवण आली, की तुझा फोटो समोर घेऊन
तुला बघत राहतो.
प्रियसी : मग माझ्या आवाजाची आठवण आली तर काय करतोस ?
प्रियकर : मग काय एखाद्या कुत्रीला दगड मारतो.

दैनिक पंचांग गुरुवार, दि. १५ फेब्रुवारी २०२४

—, शके १९४५ शोभननामसंवत्सर, माघ शुलपक्ष, अश्विनी ०९|२६
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. ३० मि.

मेष : आज आपणास कठोर श्रम करावे लागेल. काही निष्कारण चिंतांमुळे आपली व्यग्रता वाढेल. कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी, वाईट संगत व व्यसनापासून दूर राहा.

वृषभ : आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा चांगला नसेल. मित्रांमध्ये होणारे वाद आपल्या संबंधासाठी वाईट ठरतील. मात्र संयमाने वागल्यास यश मिळेल.

मिथुन : व्यस्त राहाल. कौटुंबिक विषयांमध्ये पैसा खर्च होईल. आई-वडीलांची विशेष काळजी असेल.

कर्क : एखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. वडीलोपार्जीत मालमत्तेमधून मोठे लाभ संभवतात.

सिंह : चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. मागील राहिलेले सरकारी काम पूर्ण होण्याचे योग आहेत.

कन्या : काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. करणीबाधा व शत्रुपीडेमुळे मानसिक त्रास होईल. दिवस वाईट आहे

तूळ : हातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात निष्काळजीपणे वागू नका. मागील साठविलेला पैसा आज खर्च होण्याची शयता आहे.

वृश्चिक : शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेटची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. वाहने व यांत्रिक उपकरणे सावकाश चालवा. जुने मित्र भेटण्याचे उत्तम योग आहेत.

धनु : वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. जुने मित्र भेटतील. मागील देणी फिटतील. संततीसौख्य लाभेल. दूरचे प्रवास होतील.

मकर : आजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. सर्व क्षेत्रात प्रगतीची घोडदौड, धनलाभ, वास्तुचे योग.

कुंभ : भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शय आहे म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. वाहन अपघात होण्याची शयता आहे.

मीन : वडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. मागील उधारी उसनवारी वसूल होईल. आर्थिक उत्पन्न वाढेल, कमाईचे नवे साधन उपलब्ध होईल.

                                                                                      संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

गॅसेस का होतात?

गॅसेस का होतात?

खूप लोकांना गॅसेसचा त्रास होतो.
म्हातारपणात तर बर्‍याच लोकांमध्ये हा त्रास
आढळून येतो. लहान मुलांमध्येही गॅसेस होऊ
शकतात. गॅसेस किंवा वायूविकाराचे मुख्य कारण
म्हणजे आपल्याला माहीत नसताना हवा गिळण्याची
सवय. खूप बोलणार्‍या लोकांमध्ये (उदा. शिक्षक,
राजकीय नेते) अशा प्रकारे जास्त हवा गिळली
जाते आणि गॅसेसचा त्रास होतो. लहान मुलेही दूध
पिताना हवा गिळतात आणि त्यामुळे गॅसेस होऊन
त्यांचे पोट दुखायला लागते. मोठ्या आतड्यात
सूक्ष्म जंतूंची अन्नावर क्रिया होऊनही वायू निर्माण
होतो. याखेरीज शौचास साफ न झाल्यास किंवा
बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास मल शरीरात साचून
राहतो व या मलाचे विघटन होऊनही वायू तयार
होतात. वायू तयार झाल्यावर तो आतड्याच्या
भिंतीवर ताण आणतो. त्यामुळे पोट दुखते. डोकेही
दुखते.
गॅसेसचा त्रास होऊ नये यासाठी जेवणाच्या
वेळा नियमित असाव्यात. थोडीशी भूक ठेवूनच
जेवावे. हरभर्‍याच्या डाळीचे किंवा तेलकट-
तूपकट पदार्थ कमी खावेत. बैठे काम करणार्‍यांनी
भरपूर व्यायाम करावा. सर्वांनीच निदान जास्तीत
जास्त पायी चालण्याचा प्रयत्न करावा. पवनम
ुक्तासनासारख्या आसनांमुळे गॅसेस बाहेर पडतात.
अनावश्यक बडबड टाळावी. हिंग्वाष्टक चूर्ण
घेतल्यास गॅसेसवर चांगला उपचार होतो. बैठे
काम करणार्‍यांनी जेवणानंतर दीड-दोन तासांनी
ताठ बसून बेंबी आत ओढून ५ ते १५ सेकंद
तशीच ठेवण्याचा प्रयत्न करावा. असा उपाय
वारंवार केल्यास गॅसेसचा त्रास नक्कीच कमी होतो.
चारचौघे जमल्यावर आपल्याला लाज आणणारा
हा वायूविकार आहाराच्या सुयोग्य सवयी आणि
व्यायाम यामुळे आपण आटोयात आणू शकू.