—, शके १९४५ शोभननामसंवत्सर, माघ शुलपक्ष, अश्विनी ०९|२६
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. ३० मि.
मेष : आज आपणास कठोर श्रम करावे लागेल. काही निष्कारण चिंतांमुळे आपली व्यग्रता वाढेल. कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी, वाईट संगत व व्यसनापासून दूर राहा.
वृषभ : आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा चांगला नसेल. मित्रांमध्ये होणारे वाद आपल्या संबंधासाठी वाईट ठरतील. मात्र संयमाने वागल्यास यश मिळेल.
मिथुन : व्यस्त राहाल. कौटुंबिक विषयांमध्ये पैसा खर्च होईल. आई-वडीलांची विशेष काळजी असेल.
कर्क : एखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. वडीलोपार्जीत मालमत्तेमधून मोठे लाभ संभवतात.
सिंह : चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. मागील राहिलेले सरकारी काम पूर्ण होण्याचे योग आहेत.
कन्या : काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. करणीबाधा व शत्रुपीडेमुळे मानसिक त्रास होईल. दिवस वाईट आहे
तूळ : हातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात निष्काळजीपणे वागू नका. मागील साठविलेला पैसा आज खर्च होण्याची शयता आहे.
वृश्चिक : शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेटची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. वाहने व यांत्रिक उपकरणे सावकाश चालवा. जुने मित्र भेटण्याचे उत्तम योग आहेत.
धनु : वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. जुने मित्र भेटतील. मागील देणी फिटतील. संततीसौख्य लाभेल. दूरचे प्रवास होतील.
मकर : आजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. सर्व क्षेत्रात प्रगतीची घोडदौड, धनलाभ, वास्तुचे योग.
कुंभ : भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शय आहे म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. वाहन अपघात होण्याची शयता आहे.
मीन : वडिलधार्यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. मागील उधारी उसनवारी वसूल होईल. आर्थिक उत्पन्न वाढेल, कमाईचे नवे साधन उपलब्ध होईल.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.