लो सॉल्ट म्हणजे काय?
उच्च रक्तदाब असणार्या लोकांना ‘मीठ
खाऊ नका’ असा सल्ला डॉटर देतात. मिठावाचून
जेवण ही कल्पनाच काही लोकांना करवणार
नाही. तुम्हीही एकदा मिठावाचून जेवण्याचा प्रयत्न
करा. नक्कीत तुम्हाला ‘जेवण’ काय ‘जीवन’
सुद्धा अळणी झाल्यासारखे वाटेल! मग या
उच्च रक्तदाबवाल्यांचे काय? त्यांचा हा रोग तर
आयुष्यभराचा सोबती. मीठ म्हणजे सोडियम
लोराईड. यातील सोडियममुळे शरीरात पाणी
जास्त प्रमाणात राखले जाते. साहजिकच रक्तदाब
वाढतो. त्यामुळे नीट कमी खायला वा बंद
करायला सांगतात. शरीराला सोडियमचा पुरवठा
स्वयंपाकात टाकल्या जाणार्या मीठाखेरीज इतर
अनेक अन्नपदार्थातून होत असल्याने मीठ खाणे
बंद केले, तरी शरीराला योग्य त्या प्रमाणात वा
उपयुक्त क्षार मिळत राहतो; पण हे जरी खरे असले
तरी जेवताना काही जणांना मीठ लागतेच. अशा
लोकांसाठी साध्या मिठाऐवजी म्हणजेच सोडियम
लोराईडऐवजी पोटॅशियम वा मॅग्नेशियम लोराईड
अर्थात सोडियम नसलेले मीठ उपयुक्त ठरते.
पोटॅशियम, मॅग्नेशियम लोराईडमुळे चव मीठाचीच
लागते; पण सोडियममुळे होणारे दुष्परिणाम होत
नाहीत.
बाजारात हे मीठ ‘लो सॉल्ट’ या नावाने
उपलब्ध आहे. उच्च रक्तदाबाच्या लोकांसाठी जेवणात
व जीवनात रंग निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम
हे मीठ करते.