एक इंजिनिअरिंग झालेली मुलगी घरात बसलेली असते
शेजारच्या काकू येऊन तिला विचारतात काय ग पुढे काय करणार|
मुलगी : काय नाही कुकरच्या तीन शिट्या झाल्यावर गॅस बंद करणार!!
सारे काही माझेच ?
एक बहुश्रुत कीर्तनकार होते. निरनिराळी वचने, दाखले देऊन, गोष्टी सांगून कीर्तन खुलवायचे. लोकही रंगून जायचे, कीर्तनाला गर्दी करायचे. हरिदासबुवांची खूप स्तुती करायचे. एकदा या कीर्तनकाराला एक गावी त्यांचा जुना वर्गमित्र भेटला. त्यांनी त्याला आपल्या निवासस्थानी बोलाविले.आगत स्वागत केले व म्हणाले, “अरे, एकदा माझ्या कीर्तनाला ये ना, लोक माझी खूप स्तुती करतात. पहा तर एकदा ” मित्रानं मान्य केलं. रात्री तो कीर्तनाला गेला. कीर्तनकार रंगात आले. एकेक वचने सांगू लागले. नवा श्रोता मित्रत्वाच्या नात्याने पुढेच बसला होता. बुवांच्या एकेक वचनावर अभिप्राय देऊ लागला. “हे तर शंकराचार्यांनी म्हटलंय, हे रामदासांचे वचन, हे ज्ञानेश्वरीत सांगितलेय आणि हे तर एका इंग्रजी वचनाचं भाषांतर आहे.” बुवा चिडून म्हणाले, “अरे मूर्खाप्रमाणे सारखा अडथळा आणू नकोस.” लगेच मित्र उद्गारला, “हे मात्र तुमचे स्वतःच वाय आहे हं !” तात्पर्य : लेखक, वक्ते, राजकारणी अनेक वचने स्वत:चीच असल्यासारखी सांगत असतात. पण अहंकार बरा नव्हे
काचा खाल्ल्यास काय होते ?
काचा हा काय खायचा पदार्थ आहे? सर्वसामान्य माणूस तर काचा खाऊ शकत नाही. तसे कोणी केले तर त्याचा विक्रमवीर म्हणून सत्कारच होईल जीवावर बेतेल ते वेगळेच! काचा खाल्ल्या तर (म्हणजे अगदी चावून चावून!) घशात, जठरात व पोटात तीव्र अशा जळजळल्यासारख्या वेदना होतात. मळमळ, उलट्या होतात. उलटीमध्ये रक्त असते. संडासच्या जागी दुखते व संडासवाटे रक्त येते. काचांमुळे जठर वा आतडे फाटल्यास खूप रक्तस्राव होतो व व्यक्ती मरते. कधी कधी अशा जखमांतून जंतूसंसर्ग झाल्याने त्यापासूनही व्यक्ती मरू शकते. काचेत सिलिका असते. क्ष-किरण सिलीकातून आरपार जायला अडचण येते. त्यामुळे जठरात वा आतड्यात काचेचे तुकडे असल्याचे निदान त्यांच्या फिकट अशा छायाकृतींमुळे करता येते. चुकून काच खाल्ली असेल तर भात वा केळी असे पदार्थ देऊन त्यानंतर सौम्य विरेचक द्यावे. लक्षणानुरूप इतरही औषधे द्यावी लागतात. खूप बारीक केलेली काच मात्र कमी त्रासदायक ठरते. त्यामुळेच बहुदा काचा खाऊन दाखविण्याचा प्रयोग करणारे लोक काचा खूप वेळ चावून त्या अगदी पावडरसारख्या करून मग गिळत असावेत! त्यामुळे काचेला लवकरच कचरा पेटी दाखविणेच योग्य

स्वयंपाकघरासंबंधी
* चहाची उकळलेली पावडर फेकून
देण्याऐवजी वाळवून जाळावे. या धुराने डास
पिटाळले जातील.
* पोटदुखी, मुरडा इ. त्रासात ओवा
व मिठासोबत हिंग सेवन करावा.
* टोमॅटोची आंबट-गोड चटणी
तयार केल्यानंतर त्यात सायट्रिक अॅसिड
मिसळल्यास ती आठवडाभर टिकू शकते.
* फ्लॉवर वाळवायचा असेल, तर
त्याची फुले तोडून माळेत ओवून उन्हात
वाळवावीत.
कच्च्या कैरीची बर्फी
साहित्य – १ किलो कच्ची कैरी, दिड किलो साखर, लहान चमचा वेलची पावडर,
थोडेसे केशर व खाण्याचा चूना, वर्ख.
कृती – कच्ची कैरी सोलून त्याचे कद्दूकस करावे. फोडी चुन्याच्या पाण्यात
घालून थोड्या वाळवाव्या. फोडी सावलीत वाळवाव्या. नंतर या फोडी चार वेळा स्वच्छ
पाण्यात धुऊन वाफवून घ्याव्यात. साखरेचा एक तारी पाक करून फोडी दाबून पाकामध्ये
घालाव्यात. अर्धा तास झाल्यावर फोडी शिजल्यावर मिश्रण घट्ट होत आल्यावर
गॅसवरून उतरावे. आता त्यामध्ये वेलची पावडर व केशर घालावे. एका ताटाला तूप
लावून गार झाल्यावर तुकडे करावे.
कॅल्शियम हाडांची मजबुती वाढवतो

डेयरी प्रॉडटमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असत. कॅल्शियमच्या सेवनामुळे हाड मजबूत
होतात. शरीराला थकवा न येऊ म्हणून शरीराला कॅल्शियमची गरज पडते. शरीरात उपस्थित
९९ टक्के कॅल्शियम हाडांमध्येच असतात. अशात डेयरी प्रॉडटचे सेवन केल्याने तुमच्या शरीरात
कॅल्शियमची भरपूर मात्रा बनते. रोज दुधाने तयार आईसक्रीम खाल्ल्याने ऑस्टियोपोरोसिस
(हाड पातळ आणि कमजोर होण्याचे आजार) चा धोका कमी होतो
रथसप्तमी, भीमाष्टमी, शके १९४५ शोभननामसंवत्सर, माघ शुलपक्ष, भरणी
०७|४७
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. ३० मि.
राशिभविष्य
मेष : कामात अडचणी येण्याची शयता आहे. काळजीपूर्वक कार्य करा.
वृषभ : मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मातृपक्षाकडून सहयोग मिळेल.
मिथुन : घरात किंवा पैशांमध्ये वाढ झाल्याने आपणास आनंद मिळेल. आपला निष्काळजी दृष्टीकोण आज चांगला ठरणार
नाही.
कर्क : आपल्या आत्मविश्वासाचा स्तर वाढविण्याचा प्रयत्न करा.
सिंह : अधिक श्रम करावे लागतील. व्यापार-व्यवसाय व आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल.
कन्या : सामाजिक क्षेत्रांमध्ये अजून काही विशेष कार्ये होणार नाही. एखादी व्यक्ती निष्कारण आपल्याला त्रास देईल.
तूळ : व्यवसायासाठी उत्तम वेळ. नवीन कामात यश मिळेल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील.
वृश्चिक : आज रात्री विश्रांती घ्या. घर बदलण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. शत्रू प्रभावहीन ठरतील. कार्यालयामध्ये वरिष्ठांशी आदबीने वागा.
धनु : विद्यार्थ्यांसाठी वेळ उत्तम. वाद- विवाद किंवा प्रतिस्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. दिवस अत्यंत आनंददायक वातावरणात जाईल.
मकर : आजचा दिवस आपल्यासाठी नवीन सुरुवात करणे किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय निर्धारित करण्यात सहायक ठरेल.
कुंभ : नोकरदार व्यक्तींनी कार्यात सहयोग घेऊन चालावे. भविष्यात मानय्सन्मानात वाढ होईल.
मीन : प्रिसिद्धी मिळेल. अडकेलेली कार्ये योग्य वेळी होतील. नोकरदार व व्यापारी बंधूंना लाभ मिळेल. वाहनसुख मिळेल.
मिथुन : संततीविषयक समस्या, खर्चात वाढ, व्यापारात मंदी जाणवेल. मागील उधारी
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.