श्रीखंड
साहित्य : १ किलो चक्का, १ किलो
साखर, वेलदोडा-जायफळ पूड प्रत्येकी
१ चमचा, ८-१० केशर काड्या चुरून, हवे
असल्यास बदाम-पिस्त्याचे पातळ काप.
कृती : चक्का व साखर आदल्या
दिवशी एकत्र करून फ्रिजमध्ये ठेवावे. जर
घाई असेल, वेळ कमी असेल तर साखर
दळून चयात मिसळावी. अर्धी वाटी गरम
दुधात केशर भिजत ठेवावे व थोड्या वेळाने ते
खलावे. हँडमिसी किंवा श्रीखंडाच्या यंत्रातून
चक्का-साखर मिश्रण घोटावे व मग त्यात
केशर, वेलदोडा, जायफळ पूड, बदाम-पिस्ते
घालावेत व व्यवस्थित ढवळून फ्रिजमध्ये
ठेवावे. शयतो श्रीखंड आदल्या दिवशी
करून ठेवावे म्हणजे मुरते. फ्रिजशिवाय मोठ्या
पातेल्यात किंवा तसराळ्यात पाणी घालून
त्यात ठेवले तरी चालते. म्हणजे आंबत नाही
किंवा फसफसत नाही. मातीच्या कुंडीत पाणी
घालून ठेवले तर छान गार राहाते.
टीप : श्रीखंडासाठी नेहमी निरसे दूध
कोमट करून मग चक्का बांधावा. दूध पूर्ण
तापवू नये म्हणजे छान मलईदार चक्का होतो.