नम्रतेचा परिणाम दूरवर फैलावतो; परंतु त्यासाठी पैचाही खर्च करावा लागत नाही.
काजूचे मोदक
काजूचे मोदक
साहित्य : अर्धी वाटी खोवलेले ओले
खोबरे, १० काजूचे बारीक केलेले तुकडे, २
वाटी कणिक दुधात भिजवुन, १/२ वाटी पीठी
साखर, २ वेलचीची पूड, १/२ वाटी तूप.
कृती : ओले खोबरे, काजूचे तुकडे,
पीठी साखर, वेलची पूड एकत्र करुन सारण
तयार करुन घ्या. भिजवलेल्या कणकेचे २१
छोटे गोळे करुन घ्या.
एक गोळा घेऊन त्याची लाटी लाटा.
साखर, खोबरे, विलायची, काजू तुकडे
मिसळून तयार केलेले सारण भरा. मोदकाचा
आकार देऊन तूपात मंद आचेवर तळा. रंग
बदलला की काढून घ्या. हे मोदक २-३
दिवस चांगले राहतात.
वास्तू
घरातील उत्तर-पूर्व कोपर्यात हिरव्या
रंगाचा बल्ब किंवा मेणबत्ती लावावी. यामुळे
मुलांचे अभ्यासात लक्ष लागते. घराच्या
दक्षिण भागात लाल रंगाचा बल्ब लावावा.
यामुळे माता लक्ष्मी धन व वैभव देते. जर
कलात्मक क्षेत्राशी आपला संबंध असेल,
आपले उपजीविकेचे साधन असेल तर यात
उन्नतीसाठी उत्तर-पश्चिमी भागात पांढर्या
रंगाचा लाईट लावावा. घरातील लोक स्वस्थ
रहावे म्हणून पूर्व दिशेला निळा बल्ब किंवा
लाईट लावावा.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.
दैनिक पंचांग शुक्रवार, दि. २३ फेब्रुवारी २०२४
—-, शके १९४५ शोभननाम संवत्सर, माघ शुलपक्ष, आश्लेषा १९|२५
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. ३६ मि.
राशिभविष्य
मेष : आपल्या नवीन व विविध विचारांनी आपण आपल्या मित्रांना आणि सहकार्यांना प्रभावित कराल. काही अडचणींनंतर यश मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती नरम-गरम राहील. आरोग्य उत्तम राहील.
वृषभ : व्यापार-व्यवसायात अपेक्षेनुसार घडेल. घर जमीनसंबंधी व्यवहारात फायदा होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. प्रशासकीय कामे पूर्ण होतील. नवीन कार्याचे स्वरूप बनविण्यासाठी वेळ उत्तम.
मिथुन : व्यापार-व्यवसायात स्थिती आशाजनक राहील. आर्थिक नुकसानाची शयता आहे. कौटुंबिक विषयांमध्ये काळजी
घ्या. नोकरदार व्यक्तींनी कार्यात सावधगिरी बाळगावी.
कर्क : दिवसाच्या सुरुवातीला काही मोठे कार्य करायची वेळ येऊ शकते. आपल्या मनात अनेक प्रकारच्या काळज्या
घर करू शकतील. कौटुंबिक विषयांसाठी वेळ उत्तम राहील.
सिंह : इतर लोकांना आपण प्रभावित कराल. नोकरीपेशा व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. आपल्या कौटुंबिक तणावांचा समस्यांचा प्रभाव आपल्या कार्यावर होऊ देऊ नका.
कन्या : आनंदाची बातमी मिळेल. आपल्या दिनचर्येचा सुरुवात गंभीर मानसिक स्वरूपाच्या कार्यांनी होईल. यथायोग्य विचार करून कामे करा.
तूळ : जेव्हा इतर व्यक्ती आपल्याकडून वेळ मागतील त्यावेळी आपणास आपल्या इच्छेवर संयम ठेवणे आवश्यक असेल. दिवस आनंदात जाईल.
वृश्चिक : काही महत्वपूर्ण प्रश्नांची सोडवणूक होण्याची शयता आहे. शत्रू वर्ग पराभूत होईल. बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल. आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील.
धनु : नोकरीपेशा व्यक्तींसाठी कामात स्थिती सुखदायक राहील. व्यापारय्व्यवसायात आर्थिक लाभ मिळेल. जवळच्या नात्याचा आनंद घेण्यावर आपले चित्त एकाग्र करा. स्वार्थी बनू नका.
मकर : आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर एकांतात वेळ घालवण्याची आपली इच्छा पूर्ण होण्याची शयता आहे.
कुंभ : व्यापारिक करार व व्यवहारात सावधगिरी बाळगा. पत्नी व मुलांचा सहवास लाभेल. दिवस चांगला आहे. आपल्या छान वागण्याने इतरांना हवेहवेसे वाटू शकता.
मीन : शेयरच्या विषयामध्ये सावधगिरी बाळगा. महत्वाकांक्षा पूर्ण झाल्यामुळे आनंद वाटेल.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर
कुचल्याच्या बियांची पावडर जखमेवर लावावी का?
कुचल्याच्या बियांची पावडर जखमेवर लावावी का?
कुचला ही एक विषारी वनस्पती आहे. इंग्रजीत तिला स्ट्रिनॉस नस व्होमिका असे म्हणतात. पिकलेल्या फळातील बिया विषारी असतात. दोन सें. मी. व्यास व अर्धा सें. मी. जाडी असलेल्या या बिया करड्या रंगाच्या असतात व त्यांच्यावर लव असते. या बियांमध्ये स्ट्रीच्नीन, ब्रूसनीन व लोगॅनीन हे घटक असतात. स्ट्रीच्नीनमुळे मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या सर्व भागांच्या कामाला उत्तेजना मिळते. मेंदूतील काही पेशी उत्तेजित झाल्याने शरीरातील स्नायूंची प्रतिसाद देण्याची तीव्रता खूपच वाढते. साहजिकच ध्वनी, उजेड, हवेची झुळूक अशा गोष्टींमुळेही रुग्णाला झटके येतात. कुचल्याच्या बिया खाल्ल्याने (म्हणजे कवचासहित गिळल्याने) त्यांचे पचन न झाल्याने काहीही परिणाम होत नाही. याउलट जर बियांचे तुकडे खाल्ले वा बिया चावून खाल्ल्या, तर अत्यंत कडवट चव लागते. १५ मिनिटांतच विषबाधेची लक्षणे दिसून येतात. रुग्ण अस्वस्थ होतो. त्याचे स्नायू कडक होतात. त्यानंतर या विषबाधेतील विशिष्ट प्रकारचे झटके येऊ लागतात. श्वसन करता न आल्याने शरीर काळेनिळे होते. अत्यंत वेदनामय रीतीने मृत्यू येतो. जखमेवर कुचल्यांच्या बियांची भुकटी लागल्याने एखाद्यावेळी स्ट्रीच्नीन हे विष शरीरात शोषले जाऊ शकते. शोषल्या गेलेल्या विषाचे प्रमाण जास्त असल्यास विषबाधाही होऊ शकते. तसेच कुचल्याच्या बियांची भुकटी जखमेला लावल्याने जखम भरून यायला काही मदत होत नाही. रक्तस्राव थांबण्यास थोडी मदत होऊ शकेल; पण या कामासाठी अत्यंत परिणामकारक अशी आधुनिक औषधे उपलब्ध असल्याने कुचल्याच्या बियांच्या भुकटीसारख्या विषारी पदार्थांचा वापर करणे केवळ अयोग्यच नव्हे, तर धोकादायकही आहे.
हेल्दी गुळ-फुटाणे
हेल्दी गुळ-फुटाणे
गुळ-फुटाण्यांच्या सेवनाने यामधील झिंक म्हणजेच जस्त त्वचा उजळण्यास मदत करते. झिंक
त्वचेला तजेला प्रदान करते. याचे नियमित सेवन केल्याने स्त्रियांचे सौंदर्य अधिक वाढते. गूळ व फुटाणे
दातांना सुरक्षित ठेवतात. यामधील फॉस्फरस दातांसाठी उपयोगी आहे. गर्भावस्थेनंतर स्त्रियांनी गुळ-
फुटाणे खायला हवे. यातील पोटॅशियम हार्ट अटॅकपासून रक्षण करते. ह्रदय संबंधित समस्यांसाठी गूळ-
फुटाणे उपयोगी आहेत.
तळलेले मोदक
तळलेले मोदक
साहित्य : २ नारळ खवून, २ वाटी
पिवळाधमक चिरलेला गूळ अथवा २ वाटी
साखर, ५-६ वेलदोड्यांची पूड, १ वाटी मैदा
व १ वाटी रवा, चिमूटभर मीठ, ३ टेबलस्पून,
कडकडीत तेल, तळण्याकरता डालडा अथवा
रिफांईड तेल.
कृती : २ खवलेले नारळ, अथवा गूळ
घालून सारण चिकट होईल असे शिजवून
घ्यावे व वेलदोडा पूड घालून ठेवावे. रवा,
मैदा, ३ टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन व
चिमूटभर मीठ घालून शयतो दुधात अथवा
पाण्यात घट्ट भिजवून १ तास झाकून ठेवावे.
भिजलेला मैदा हाताने चांगला मळून २१
लाट्या कराव्यात. पोळपाटावर पुरीएवढी लाटी
लाटावी. हातावर घेऊन मुखर्यालपाडून वाटी
करावी. १ चहाचा चमचा भरून सारणमध्ये
भरावे व मोदकांचे तोंड बंद करावे. असे सर्व
मोदक भरून घ्यावेत. कढईत मंद आचेवर
सर्व मोदक गुलाबी रंगावर तळून घ्यावे. वरील
साहित्यात २१ मोठ्या आकाराचे मोदक
होतात.







