काजूचे मोदक

0
79

काजूचे मोदक

साहित्य : अर्धी वाटी खोवलेले ओले
खोबरे, १० काजूचे बारीक केलेले तुकडे, २
वाटी कणिक दुधात भिजवुन, १/२ वाटी पीठी
साखर, २ वेलचीची पूड, १/२ वाटी तूप.
कृती : ओले खोबरे, काजूचे तुकडे,
पीठी साखर, वेलची पूड एकत्र करुन सारण
तयार करुन घ्या. भिजवलेल्या कणकेचे २१
छोटे गोळे करुन घ्या.
एक गोळा घेऊन त्याची लाटी लाटा.
साखर, खोबरे, विलायची, काजू तुकडे
मिसळून तयार केलेले सारण भरा. मोदकाचा
आकार देऊन तूपात मंद आचेवर तळा. रंग
बदलला की काढून घ्या. हे मोदक २-३
दिवस चांगले राहतात.