दैनिक पंचांग शुक्रवार, दि. २३ फेब्रुवारी २०२४

0
98

—-, शके १९४५ शोभननाम संवत्सर, माघ शुलपक्ष, आश्लेषा १९|२५
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. ३६ मि.

राशिभविष्य

मेष : आपल्या नवीन व विविध विचारांनी आपण आपल्या मित्रांना आणि सहकार्‍यांना प्रभावित कराल. काही अडचणींनंतर यश मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती नरम-गरम राहील. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ : व्यापार-व्यवसायात अपेक्षेनुसार घडेल. घर जमीनसंबंधी व्यवहारात फायदा होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. प्रशासकीय कामे पूर्ण होतील. नवीन कार्याचे स्वरूप बनविण्यासाठी वेळ उत्तम.

मिथुन : व्यापार-व्यवसायात स्थिती आशाजनक राहील. आर्थिक नुकसानाची शयता आहे. कौटुंबिक विषयांमध्ये काळजी
घ्या. नोकरदार व्यक्तींनी कार्यात सावधगिरी बाळगावी.

कर्क : दिवसाच्या सुरुवातीला काही मोठे कार्य करायची वेळ येऊ शकते. आपल्या मनात अनेक प्रकारच्या काळज्या
घर करू शकतील. कौटुंबिक विषयांसाठी वेळ उत्तम राहील.

सिंह : इतर लोकांना आपण प्रभावित कराल. नोकरीपेशा व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. आपल्या कौटुंबिक तणावांचा समस्यांचा प्रभाव आपल्या कार्यावर होऊ देऊ नका.

कन्या : आनंदाची बातमी मिळेल. आपल्या दिनचर्येचा सुरुवात गंभीर मानसिक स्वरूपाच्या कार्यांनी होईल. यथायोग्य विचार करून कामे करा.

तूळ : जेव्हा इतर व्यक्ती आपल्याकडून वेळ मागतील त्यावेळी आपणास आपल्या इच्छेवर संयम ठेवणे आवश्यक असेल. दिवस आनंदात जाईल.

वृश्चिक : काही महत्वपूर्ण प्रश्नांची सोडवणूक होण्याची शयता आहे. शत्रू वर्ग पराभूत होईल. बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल. आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील.

धनु : नोकरीपेशा व्यक्तींसाठी कामात स्थिती सुखदायक राहील. व्यापारय्व्यवसायात आर्थिक लाभ मिळेल. जवळच्या नात्याचा आनंद घेण्यावर आपले चित्त एकाग्र करा. स्वार्थी बनू नका.

मकर : आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर एकांतात वेळ घालवण्याची आपली इच्छा पूर्ण होण्याची शयता आहे.

कुंभ : व्यापारिक करार व व्यवहारात सावधगिरी बाळगा. पत्नी व मुलांचा सहवास लाभेल. दिवस चांगला आहे. आपल्या छान वागण्याने इतरांना हवेहवेसे वाटू शकता.

मीन : शेयरच्या विषयामध्ये सावधगिरी बाळगा. महत्वाकांक्षा पूर्ण झाल्यामुळे आनंद वाटेल.

                                                                                          संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर