पाककला

0
30

तळलेले मोदक

साहित्य : २ नारळ खवून, २ वाटी
पिवळाधमक चिरलेला गूळ अथवा २ वाटी
साखर, ५-६ वेलदोड्यांची पूड, १ वाटी मैदा
व १ वाटी रवा, चिमूटभर मीठ, ३ टेबलस्पून,
कडकडीत तेल, तळण्याकरता डालडा अथवा
रिफांईड तेल.
कृती : २ खवलेले नारळ, अथवा गूळ
घालून सारण चिकट होईल असे शिजवून
घ्यावे व वेलदोडा पूड घालून ठेवावे. रवा,
मैदा, ३ टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन व
चिमूटभर मीठ घालून शयतो दुधात अथवा
पाण्यात घट्ट भिजवून १ तास झाकून ठेवावे.
भिजलेला मैदा हाताने चांगला मळून २१
लाट्या कराव्यात. पोळपाटावर पुरीएवढी लाटी
लाटावी. हातावर घेऊन मुखर्यालपाडून वाटी
करावी. १ चहाचा चमचा भरून सारणमध्ये
भरावे व मोदकांचे तोंड बंद करावे. असे सर्व
मोदक भरून घ्यावेत. कढईत मंद आचेवर
सर्व मोदक गुलाबी रंगावर तळून घ्यावे. वरील
साहित्यात २१ मोठ्या आकाराचे मोदक
होतात.