तारुण्य पीटिका का येतात?

तारुण्य पीटिका का येतात?

‘तारुण्य पीटिका’ या नावावरून आपल्या लक्षात येईल की, त्यांचा तारुण्याशी संबंध आहे. १४-१५ वर्षांच्या मुला-मुलींना तारुण्य पीटिका येतात. काही जणांना त्या कायम होतच राहतात. तारुण्य पीटिका म्हणजेच त्वचेवर येणारे फोड. ते चेहर्‍यावर वा शरीरावर इतरत्र कोठेही येऊ शकतात. त्वचेत काही तैलग्रंथी असतात. त्यातील स्रावामुळे त्वचा स्निग्ध राहते. त्यांची रंध्रे बंद झाल्यास त्यातील स्राव गोळा होतो व फोड येतात. नंतर जंतूसंसर्गही होतो. या फोडांनाच तारुण्य पीटिका असे म्हणतात. तारुण्य पीटिका येण्याची अनेक कारणे आहेत. पौगंडावस्थेमध्ये शरीरातील संप्रेरकाच्या (हार्मोन्सच्या) प्रमाणात होणारे बदल, त्वचेची नीट निगा न राखणे, दीर्घ मुदतीचे आजार, कुपोषण, आहारात मेदयुक्त पदार्थांचा जास्त समावेश, बद्धकोष्ठ तसेच मानसिक ताणतणाव अशा अनेक कारणांमुळे तारुण्य पीटिका होतात. साहजिकच तारुण्य पीटिकांच्या उपचारासाठी वरील कारणांवर आधारित अनंत उपाय उपलब्ध आहेत; पण एक लक्षात ठेवायला हवे ते म्हणजे शारीरिक अनारोग्याचे एक वरवरचे लक्षण म्हणजे तारुण्य पीटिका. निरोगी, सुदृढ (मानसिक व शारीरिकदृष्ट्या) व्यक्तीला त्यांचा त्रास होत नाही. चिंता करण्याने तारुण्य पीटिका अधिकच वाढतात. शारीरिक स्वच्छता, समतोल आहार, जेवणाच्या वेळा, विश्रांती-झोपेच्या वेळा यात नियमितपणा, व्यायाम आदी आरोग्यपूर्ण सवयींचा अंगिकार केल्यास या त्रासापासून आपली मुक्तता होऊ शकेल.

बेबी मसाजचे फायदे

0

बेबी मसाजचे फायदे

* मसाजमुळे मुलाचे वजन वाढण्यास मदत होते.
* दिवसभरातून किमान एक वेळा मसाज केल्याने मुलाचे स्नायू बळकट होतात.
* मसाजमुळे मुलामधील एकाग्रता वाढते.
* मुलाच्या पोट व पचनक्रियेसंबंधी व्याधी दूर होतात.
* मसाजमुळे मुले व आई यांच्यात घनिष्टता वाढीस लागते.
* मसाजमुळे मुलांना शांत झोप लागत असते.
* मसाजमुळे मुलाचा शारीरिक व मानसिक विकास होत असतो.

सुविचार

उडण्यासाठी जेव्हा आम्ही वाकतो, तेव्हा आम्ही विवेकाच्या अगदी नजीक जात असतो. : मार्कस औरलियस

उपवासाचे (वर्‍याच्या तांदळाचे) मोदक

0

उपवासाचे (वर्‍याच्या तांदळाचे) मोदक

साहित्य : २ फुलपात्रे वर्‍याच्या
तांदुळाचे पीठ, २ वाट्या साखर, १ मोठा
नारळ, ७-८ वेलदोडे, २५ ग्रॅम बेदाणा, २
टेबलस्पून तूप, १ केळे (हवे असल्यास)
कृती : नेहमीप्रमाणे नारळ व साखर
यांचे सारण तयार करावे. त्यात वेलदोड्याची
पूड व बेदाणा घालावा. केळे बारीक चिरून
आयत्या वेळी घालावे (हवे असल्यास).
वर्‍याचे तांदूळ घरी दळावे व चाळणीने पीठ
चाळून घ्यावे.
२ फुलपात्रे पाणी गॅसवर ठेवून, पाण्यातच
मीठ व तूप घालावे. पाण्याला उकळी आली,
की त्यात वर्‍याचे पीठ पेरावे व उलथण्याच्या
टोकाने ढवळावे. झाकण ठेऊन वाफ येऊ
द्यावी. नंतर खाली उतरवून २ मिनिटांनी
उकड चांगली माळून, नेहमीप्रमाणे अगर साचा
वापरुन मोदक करावेत. हे मोदक उपवासाला
सुद्धा चालतात.

सुंदर चेहर्‍यासाठी

सुंदर चेहर्‍यासाठी

संत्र्याच्या सुया साली २० ग्रॅम, सुकी
कडुलिंबाची पाने ५ ग्रॅम एकत्र वाटून चूर्ण
बनवून घ्या. या चूर्णात ५ ग्रॅम चंदन चूर्ण
व पीठ मिसळा. या मिश्रणात बदाम तेल व
तितकेच तिळाचे तेल मिसळा. आता हे उटणे
रात्रभर चेहर्‍यावर लावून ठेवा व सकाळी
पाण्याने धुवा.
हे उटणे आठवड्यातून ३-४ वेळा
लावा. त्याचप्रमाणे चेहर्‍यासाठी मुलतानी म
ातीचा लेपही अत्यंत उपयुत आहे.

सल्ला

0

झोपताना एक ग्लास गोड व गरम कोमट
दुधामध्ये एक चमचा शुद्ध तूप टाकून मुलांना
द्यावे.

वास्तू

0

वास्तुशास्त्राने दक्षिण दिशेस ‘कर्मभावाची
दिशा’ मानले आहे. त्यामुळे घरात लहान-
मोठी यंत्रसामग्री, वॉशिंग मशीन वा दुरुस्तीची
उपकरणे ठेवायची असतील, तर ती आवर्जून
आणि कटाक्षाने दक्षिण दिशेसच ठेवली
पाहिजेत.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

दैनिक पंचांग शनिवार, दि. २४ फेब्रुवारी २०२४

माघस्नान समाप्ती, शके १९४५ शोभननामसंवत्सर, माघ शुलपक्ष, मघा
२२|२१ सूर्योदय ०६ वा. २९ मि. सूर्यास्त ०६ वा. ३४ मि.

राशिभविष्य

मेष : आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा.

वृषभ : दिवस अनुकूल व महत्वाचा असेल. आपले अडकेलेले कार्ये पूर्ण होतील. आनंदाची बातमी मिळेल. विशिष्ट कार्य पूर्ण होतील.

मिथुन : महत्वपूर्ण व्यक्तींशी संपर्क सुखाचे राहील. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखदायक राहील. एखादे काम न झाल्यामुळे अप्रसन्न राहाल.

कर्क : आरोग्य देखील उत्तम राहील. नोकरदार व्यक्तींसाठी वातावरण अनुकूल राहील. आरोग्य देखील उत्तम राहील. कौटुंबिक सहयोग मिळेल.

सिंह : शत्रूवर्ग निष्प्रभावी राहील. श्रम अधिक झाल्यामुळे दमल्यासारखे वाटेल. वाहने काळजीपूर्वक चालवा. संतोषजनक स्थितीमुळे उत्साह वाढेल. महत्त्वाचा कार्यक्रम होण्याची शयता आहे.

कन्या : प्रेयसीशी संपर्क होण्याची शयता आहे. मनोरंजनावर खर्च होईल. आरोग्य उत्तम राहील. आरोग्याच्या दृष्टीने उत्तम
वेळ आहे. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील.

तूळ : व्यापारासाठी प्रवासाचे योग संभवतात. वैवाहिक जीवनाच्या आनंदात वाढ
होईल. लेखन कार्यात यश मिळेल. कोणतीही अर्ज देण्यासाठी उत्तम वेळ. वाहने व उपकरणे जपून हाताळावीत.

वृश्चिक : आरोग्य चांगले राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. कामात किंचित अडचणी येतील पण धैर्यशील
राहिल्याने कार्ये पूर्ण होतील. आपण सहजरित्या नवीन आव्हाने पेलता.

धनु : उल्हासाचा अनुभव येईल. शीघ्र अनुकूल परिस्थिती होईल. जिभेला सुखावणारा दिवस असेल. मित्र आनंद देतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील.

मकर : आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. महत्वपूर्ण प्रश्नांचे निराकरण होईल. स्त्री पक्षाकडून सहयोग मिळेल. येणारा काळ भूतकाळातील आनंद पुन्हा आणेल.

कुंभ : मनोरंजनावर खर्च होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात प्रगती होईल. विश्रांतीसाठी किंचित वेळ काढणे या वेळी आपल्यासाठी उपयोगी ठरेल. मित्रांचा सहयोग मिळेल.

मीन : आपल्या कार्यक्षेत्रातील एखाद्या कल्पक सर्जनशील कार्यात प्रगति होईल आणि एखाद्या ओळखीच्या व्यक्तीबरोबर आपले सामंजस्य वाढेल. त्याची कसोटी घेणारा हा दिवस आहे.

                                                                                   संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

आपण बोलतो कसे?

आपण बोलतो कसे?

लहानपणापासून आपण बोलत असतो, बोललेले ऐकत असतो. हे इतया सवयीचे झालेले असते, की आपण काही विशेष वेगळी क्रिया करत आहोत, हे जाणवतही नाही; पण ज्यावेळेस आवाज बसतो त्यावेळेस बोलण्याची क्रिया कशी होत असेल, असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. आवाजाच्या निर्मितीत पोटाचे स्नायू, छाती व पोट यांच्यामधील पडदा, फुफ्फुस, स्वरयंत्र, घसा, नाक, तोंड या अवयवांचा सहभाग असतो. यातही स्वरयंत्रांचे काम महत्त्वाचे असते. उत्क्रांतीमध्ये स्वरयंत्राचा विकास होऊन बोलणे हे कार्य मानवात स्वरयंत्र करू लागले. बोलण्याच्या क्रियेत सर्वप्रथम मेंदूतील वाचाकेंद्रातून आज्ञा येते. त्यानुसार स्वरयंत्राची स्वरतंतूची हालचाल होऊन आपण बोलावयास लागतो. फुफ्फुसातील हवेचा वापर यासाठी केला जातो. तसेच वर सांगितल्याप्रमाणे घसा, टाळू, दात, ओठ, नाक व जिभेच्या सहाय्याने वेगवेगळ्या शब्दांची निर्मिती केली जाते. जसे कंठ्य शब्द क, ख, ग. इ; तालव्य शब्द ट, ठ, ड; दंत्य शब्द त, थ, द; ओष्ठ्य शब्द प, फ आणि अनुनासिक शब्द ञ वगैरे. अशा प्रकारे आपण बोलतो. वरीलपैकी कशात बिघाड झाला, म्हणजे वाचाकेंद्र, आज्ञावहन करणारे चेतातंतू, स्वरयंत्रातील स्वरतंतू आणि घसा, जीभ वगैरे अवयव यात बिघाड झाल्यास वा या ठिकाणी व्याधी झाल्यास बोलण्याच्या प्रक्रियेत अडथळा येऊन आवाज पूर्ण बंद होणे, अडखळत बोलणे अशी लक्षणे निर्माण होतात.

आरोग्यदायी पपई

0

आरोग्यदायी पपई

पपई व्हिटॅमिन सी ने भरपूर आहे. पिकलेल्या पपईत असलेल्या एंटी-ऑसिडेंट आणि
फायबर शरीरात कोलेस्टेरॉल आणि रक्ताचे थक्के बनवण्यास रोखतो. बर्‍याच वेळा कोलेस्टरॉल
हे हृदयघात आणि रक्तचाप वाढणे व हृदयाशी निगडित बर्‍याच आजारांचे कारण बनतो. रोजच्या
खाण्यात पपईचा वापर तुम्हाला फायदा पोहोचवले. यात फार कमी कॅलरी असते जे लठ्ठपणा कमी
करण्यास मदत करते. यात फायबरची मात्रा जास्त असल्यामुळे आतड्यांचे आरोग्य उत्तम राहते.