त्वचा उजळण्यासाठी

त्वचा उजळण्यासाठी
गळा, मान येथील त्वचेची स्वच्छता
करण्यासाठी हळद + लिंबू रस + दूध यांचे
मिश्रण करून भागावर चोळावे. याने त्वचा
उजळते.

सल्ला

0

डोळ्यांना आराम मिळण्यासाठी कापडी
घडी बर्फाच्या पाण्यात बुडवून ही पट्टी डोळ्यावर
ठेवावी.

वास्तू

0

घरातील वस्तूंचे स्वतःचे योग्य असं
स्थान असते. त्या ठिकाणीच त्या असाव्यात.
वाटेल तिथे वस्तू ठेवल्यास आपल्या आयुष्यावर
त्याचा नकारात्मक परिणाम पडू शकतो.
अशामुळे मनःशांती ढळते. जर घरामधील
पलंग दाराजवळ ठेवला असेल तर रात्री
शांत झोप लागत नाही. सतत बेचैन वाटत
राहते. यात्रीची झोपही पूर्ण होत नाही.
म्हणून दरवाज्याजवळ पलंग कधीही नसावा.
संकलक : ॲड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

वडील (मुलाला) : तू मघापासून कोंबडा
का झाला आहेस?
मुलगा : बाबा, तुम्हीच तर म्हणाला
होतात ना की जे कामशाळेत करशील तेच
घरातही अर्धा तास करत जा म्हणून!

दैनिक पंचांग गुरुवार, दि. २९ फेब्रुवारी २०२४

शके १९४५ शोभननामसंवत्सर, माघ कृष्णपक्ष, चित्रा १०|२२
सूर्योदय ०६ वा. २९ मि. सूर्यास्त ०६ वा. ३० मि.

राशिभविष्य :-

मेष : आज आपला जोडीदार किंवा प्रिय व्यक्ती त्याच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्यावर दबाव आणू शकतो. जुने मित्र भेटतील त्यांच्या बरोबर बराच वेळ व्यतीत कराल.

वृषभ : मानसन्मानाच्या क्षेत्रात वाढ होईल. कामात एखाद्याचे सहकार्य प्रगतीचे कारण बनेल. चांगले भोजन मिळेल. मौजम
जेत दिवस व्यतीत होईल. आपली स्थिति,वास्तविकता वाढेल. अडकलेला पैसा मिळेल.भूमी, घर विकत घेण्याचे योग.

मिथुन : ठरविलेले कामे पूर्ण करण्यासाठी असे प्रसंग प्रेरणादायी ठरतील. यथायोग्य विचार करून कार्य करा. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. पारिवारिकदृष्टया वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल.

कर्क : आजचा दिवस आपल्या कार्य योजनेंसाठी आणि सहकार्यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. काळजीपूर्वक
कार्य करा. आरोग्यात सुधारणा. मानसिक स्थिती उत्तम राहिल.

सिंह : बेपर्वाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे. सामाजिक क्षेत्रात घवघवीत यश प्राप्त होईल.

कन्या : आपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. मागील उधारी उसनवारी वसुल होईल. वाहने व यांत्रिक उपकरणे सावधगिरीने हाताळावीत.

तूळ :  आपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत
ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल.

वृश्चिक : अधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. हातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेटची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा.

धनु : आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आपल्या उतावीळ
स्वभावाला आज नियंत्रीत करावे. पत्नीकडून उत्तम वैवाहिक सुख प्राप्ती होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल.

मकर :  महत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. मुले व पत्नीचा सहवास लाभेल. दिवस चांगला जाईल. आपली दूरदृष्टी आणि बुद्धीने अडकलेली कामे पूर्ण होतील.

कुंभ :  आपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात.
शत्रू प्रभावहीन होतील. आपला चंचल स्वभाव मात्र स्थिर ठेवावा. वरिष्ठांची मर्जी राहील. मातृचिंता सतावेल.

मीन :  आपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न
आणू शकतात. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. दिवस आनंदात जाईल. कामांची गती मंदावेल. मुलर-मुलींची चिंता सतावेल.

                संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

कुत्र्याला मिळाला धडा

कुत्र्याला मिळाला धडा

एका गावात एक कुत्रा राहत होता. त्याचे नाव होते मोती. गावभर हिंडे, खाऊन-पिऊन आनंदात राही. अशा प्रकारे त्याची चंगळ होती. पण हे सुख त्याला फार काळ नाही लाभले. दिवस पालटले. त्या गावात मोठा दुष्काळ पडला. खाण्यास काहीच मिळेना. गुरे-माणसे पटापट मरू लागली. यातच अनेक कुत्रीही मरून पडली. मोतीने ही परिस्थिती पाहिली. जीव वाचवण्यासाठी काही तरी केले पाहिजे, असे मनात येताच त्याने ते गाव सोडले. तो दुसर्‍या एका गावात गेला. स्वागत तर चांगले झाले. लोकांनी त्याला भाकरीचे तुकडे दिले. त्या गावात लोक होते, तशाच गायी होत्या, म्हशी होत्या, गाढवे होती. कोणी त्याला हुंगून प्रेम व्यक्त केले; तर कोणी नुसतेच पाहिले. हे बघून त्याला आनंद झाला. याच गावात राहावे, असे त्याने ठरविले. परंतु हाय रे दैवा! तिथे दुसरेच संकट सामोरे आले. तेथील कुत्र्यांना याचा वास येताच पाच-पन्नास कुत्र्यांचा कळपच त्याच्या अंगावर धावून आला. त्याला घेरले. चारी दिशांनी हल्ला करून सापडेल तिथे चावा घेत सुटले. शेपूट घालून तो इकडे-तिकडे धावू लागला. कसाबसा जीव बचावून मरणाच्या दारातून परत आपल्या मूळच्या गावी आला. त्याला पाहून त्याचे मित्र प्रेमाने त्याची चौकशी करू लागले. तेव्हा मध्येच कोणी तरी म्हणाले, “ते दुसरे गाव कसे आहे रे?” “मित्रांनो, गाव तसे बरे आहे. खायला प्यायला भरपूर मिळते. लोक प्रेम दाखवतात. पण एक गोष्ट मात्र चांगली नाही.” “ती कोणती गोष्ट?” “मित्रांनो, तिथेही आपले जातभाई मोठ्या प्रमाणात आहेत.” “अरे, मग तर यात आनंदच आहे.” “बाबा रे, हीच तर अडचण आहे. सार्‍या जगाशी एकवेळ पटेल; पण आपल्या जातभाईंशी पटत नाही. भावाचे भावाशी जमत नाही आणि म्हणूनच भाऊबंदकी वाढते. इतरांची तर्‍हाच वेगळी. त्यांचे प्रश्न वेगळे. अडचणी, सुख-दुःखे वेगळी. त्यांना आपल्या सुख-दुःखांबद्दल सोयरसुतक नसते. पण भाऊबंदाचे तसे नसते. “भाऊबंदांना वाटते, हा कशाला आला इथे? आता आपल्यात वाटेकरी होणार. तेवढेच आपले कमी होणार. दुसरीकडे जाईल किंवा मरेल, तर बरे. म्हणून इतरांवर विश्वास ठेवलेला बरा; पण भाऊबंदांवर कधीही विश्वास टाकू नये. तेच आपले एक नंबरचे शत्रू असतात.” “बरं, मग आता इथेच राहतोस काय?” “होय बाबा. खायला कमी मिळाले, तरी चालेल; पण जिवाची भीती तर नाही. तिथे जिवाला सुरक्षितता नाही आणि म्हणूनच मी पुन्हा आपल्या गावी आलो.” सर्वच कुत्र्यांना त्याचे म्हणणे पटले. हा त्यांच्यापैकीच असल्याने त्यांनी त्याला आनंदाने तेथे ठेवून घेतले. तात्पर्य – हितसंबंध गुंतलेले असल्यामुळे जातभाई प्रसंगी गळा कापायलाही मागे-पुढे पाहत नाहीत.

शिंका का येतात?

शिंका का येतात?

हिवाळ्यात किंवा गार वार्‍यात फिरून आल्यावर तुम्हाला फटाफट शिंका आल्या असतील. काहीतरी बोलायला तोंड उघडावे आणि तेवढ्यात शिंक येऊन बोलता येऊ नये, असेही कधी झाले असेल. सर्दी-पडसे झाल्यावर शिंका येतात. विशेषतः वावड्यामुळे सर्दी आली असेल, तर शिंका जास्तच येतात. धुळीत गेल्यास, विशिष्ट फूल हुंगल्यास किंवा अत्तराचा, उदबत्तीचा वास आल्यास वावडे असलेल्या लोकांना शिंका येतात आणि सर्दी होते. काय म्हणता तुम्हाला शिंका येत नाहीत? मग एक काम करा. आजोबांच्या कोटाच्या खिशातली तपकिरीची डबी घ्या आणि एक चिमूटभर नाकात सोडा! काय आता आल्या का शिंका? शिंका येणे शुभ की अशुभ? काहीजण म्हणतात- एक शिंक येणे वाईट, पण दोन शिंका येणे चांगले. अर्थात ह्या सर्व अंधश्रद्धा बरं का! पण शिंका का येतात, ते पाहू. खोकला आणि शिंका यांत बरेच साधर्म्य आहे. आपल्या श्वासनलिकेत काही त्रासदायक पदार्थ आला, तर खोकला येतो. आपण खोकतो म्हणजे काय करतो? सर्वात आधी आपण दीर्घ श्वास घेतो. त्यानंतर एपिग्लॉटीस नावाचा पडदा श्वासनलिकेवर दाबला जातो. त्यानंतर आपण जोराने श्वास सोडतो. साहजिकच खोकताना हवा दाबाखाली बाहेर पडते व श्वासनलिकेतील घाण, जिवाणू बेडयाच्या रूपाने बाहेर टाकले जातात. आता शिंकेविषयी नाकातील हवा जाण्याच्या मार्गात जर काही अपायकारक, त्रासदायक असे पदार्थ आले तर शरीर खोकल्याप्रमाणेच प्रतिसाद देते. नाकातील ही संवेदना निघणार्‍या पाचव्या नसेमार्फत मेंदूच्या मेड्यूला या भागात जाते. येथील पेशींमध्ये संवेदनेचे विश्लेषण होऊन शिंक येण्याची क्रिया होण्याचा आदेश दिला जातो. यात सुरुवातीचे दीर्घ श्वास, नंतर एपिग्लॉटीसचे श्वासनलिकेवर येणे व नंतर जोरात उच्छ्वास हे खोकल्याप्रमाणेच असते. मात्र जोरात श्वास सोडताना पडजीभ खाली पडते व त्यामुळे हवा तोंडातून बाहेर न पडता नाकातून बाहेर पडते. नाकातील अपायकारक पदार्थ यामुळे बाहेर पडतो. वावड्यामुळे वा जंतूसंसर्गामुळे नाकातील आवरण हुळहुळे होते व त्यामुळे वारंवार शिंका येतात. एव्हीलसारखी गोळी देऊन वावड्यामुळे येणार्‍या शिंका कमी करता येतात. तसेच ज्या पदार्थांचे आपल्याला वावडे आहे, त्यापासून दूर राहून स्वतःचे संरक्षण करणे जास्त योग्य होय.

वास्तू

0


दुकानाचे प्रवेशद्वार पूर्वेस किंवा उत्तरेस असावे.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

सल्ला

0


मनावरच्या ताण दूर करण्यासाठी दीर्घ
श्वास घ्या. हळूहळू श्वास आत घेण्याचा
प्रयत्न करा. श्वास आत घेण्याचा कालावधी
हळूहळू आपोआपच वाढत जाईल.

तजेलदार त्वचेसाठी

तजेलदार त्वचेसाठी


* रोज झोपण्यापूर्वी व सकाळी
आंघोळीपूर्वी संपूर्ण शरीराला बदामाच्या तेलाने
मालिश करावे. यामुळे कोरडी त्वचा तजेलदार
बनते.
* एरंडीचे तेलसुद्धा खूप फायदेशीर
आहे. दोन महिने रोज रात्री या तेलाने केसांना
मॉलिश केल्यास टक्कल पडत नाही.