मेथी मटार मलाई

मेथी मटार मलाई

साहित्य : २ वाट्या बारीक चिरलेली
मेथी, वाफवलेले ३ वाट्या मटार, मीठ
चवीनुसार, ३ चमचे तेल, १-२ चमचे जिरे,
बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला
टोमॅटो, १ कप दुध, चिमुटभर साखर, २
चमचे फ्रेश क्रीम, हिरवी मिरची, आलं, लसून,
काजू, खसखस, खडा मसाला
कृति : मेथी धुऊन त्यावर थोडं मीठ
शिंपडून ठेवा. थोड्या वेळाने सर्व पाणी काढून
टाका. यानंतर कढाईत २ चमचे तेल गरम
करून घ्या, त्यामध्ये जिरं घालून घ्या नंतर
मेथी घालून २-३ मिनिटं परतवू द्या सर्वात
शेवटी खडा मसाला पूड करून घाला नंतर
वाफवलेले मटार, दुध, साखर, फ्रेश क्रीम,
मीठ आणि थोडंसं पाणी घालून मेथी मटार
मलई गरमागरम सर्व्ह करा.

मुलायम चेहर्‍यासाठी

मुलायम चेहर्‍यासाठी
तांदुळाचे पीठ व मध एकत्र करून
चेहर्‍यावर लावून ५ मिनिटे मालिश करून मग
चेहरा धुऊन घ्यावा. यामुळे चेहर्‍याची त्वचा
मुलायम होते. त्याचप्रमाणे चेहर्‍याला गुलाबपाणी
आणि मुलतानी माती हे मिस करुन त्याचा
लेप लावल्यास चेहरा अत्यंत तजेलदार होतो.
त्याचप्रमाणे चेहर्‍यावरील सुरकुत्या निघून
जातात.

सल्ला

दिवसभराच्या कामातून थकवा वाटत
असेल तर पाण्यात गुलाबपाणी व लिंबाचे थेंब
टाकून आंघोळ करावी.

वास्तू

फुटलेला आरसा घरात असणे हा दोष आहे.
या दोषामुळे नकारात्मक उर्जा सक्रीय होते व
कुटुंबातील सदस्यांना नकारात्मक परिणामांनी
सामोरे जावे लागते.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

मुलाने वडिलांना विचारले
मुलगा : ’बाबा, तुम्ही अंधाराला घाबरता? ’
बाबा : ’नाही, बाळा’
मुलगा : ’ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटास?’
बाबा : ’अजिबात नाही’
मुलगा : ’शाबास बाबा म्हणजे तुम्ही आई व्यतिरिक्त
कोणालाच घाबरत नाही’

दैनिक पंचांग शुक्रवार, दि. १ मार्च २०२४

शके १९४५ शोभननामसंवत्सर, माघ कृष्णपक्ष, स्वाती १२|४९
सूर्योदय ०६ वा. २९ मि. सूर्यास्त ०६ वा. ३० मि.

राशिभविष्य

मेष : आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. मागील जी कामे
बाकी आहेत ती पूर्ण करण्यात यश मिळेल. कामाचा ताण जाणवेल. वाहने व उपकरणे सावकाश हाताळावीत.

वृषभ : आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. अधिक खर्च होईल. वाहने व यांत्रिक उपकरणे जपून चालवावीत. कुटुंबियांचा चांगला सहवास लाभेल. आपली स्थिति, वास्तविकता वाढेल. पारिवारिकदृष्टया वेळ सामान्य. आपल्या
प्रयत्नाने उन्नती कराल. धनलाभ होईल.

मिथुन ः आजचा दिवस विधायक कामासाठी चांगला आहे. आपण कुणापासून प्रेरीत व्हाल. पत्नीकडून उत्तम वैवाहिक सुख प्राप्त होईल. आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. वरिष्ठांची मर्जी राहील.

कर्क : आजचा दिवस छान जाईल. मैत्रिण किंवा प्रेयसी भेटेल. मनोरंजनासाठी वेळ काढाल. मागील उधारी उसनवारी वसुल होईल. खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल.

सिंह : योजनाबद्धरीत्याने आपले काम करण्याचा प्रयत्न करा. छोट्या-छोट्या येतील. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. दिवस निरुत्साही वाटेल.

कन्या : मनोरंजनावर खर्च होईल. शेजारी व कार्यालयीन सहकार्र्‍यांबरोबर तंटा करू नका. प्रेमसंबंधात यश मिळेल. जबाबदारीची कामे पडतील. शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्हा करु नका. मन रमणार नाही.

तूळ : काळजीपूर्वक कार्य करा. पळापळ अधिक आरोग्याची काळजी घ्या. आज आपणास कामाचा शिण येवू शकतो.
हितशत्रुंपासून सावधन असावे. मातृचिंता सतावेल. वाहने व मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी लागेल. ाभाच्या संधी. नवीन ओळखी संभवतात.

वृश्चिक : संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्या उतावीळ स्वभावावर संयम ठेवून मन शांत ठेवण्याचा प्रयत्न केल्यास
यश मिळेल. मागील उधारी उसनवारी वसुल दिवस आनंदात जाईल. संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग. मनात नवीन कल्पना सुचतील.

धनु : आपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. मात्र अडचणी आपला पिच्छा सोडत नाहीत. विश्वास कमी राहील. पितृचिंता सतावेल.शत्रुपक्ष डोके वर काढेल.

मकर : थंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. जुन्या मित्रांचा सहवास आनंददायी ठरेल. मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. आपल्या कामांची समाजात चर्चा होईल.

कुंभ : आपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रकल्प कार्यान्वित करणे आपल्यासाठी
श्रेयस्कर ठरेल. मित्रांची साथ लाभेल. नवपरिणीतांसाठी दिवस अत्यंत अनुकूल आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करतानाही यशस्वी व्हाल.

मीन : पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. मनोरंजनाकडे कल राहिल. डकलेला पैसा मिळेल. गुढ अनुसंधान करणार्‍यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील.

                                                                                    संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

विजेचा शॉक बसल्यास काय होते?

विजेचा शॉक बसल्यास काय होते?

लहान मुले फार उद्याेगी असतात. त्यांच्या काहीतरी कारवाया चालू असतात. विजेच्या उपकरणांशी खेळणे तर मुलांना फारच आवडते. इकडचा बल्ब काढून दुसरीकडे लाव, असली काही कामे करायला मुले नेहमीच तयार असतात. कधी कधी मात्र या गाेष्टी अंगलट येतात. जुनाट वायरवर ओले कपडे वाळत घालणे, प्लगमध्ये खिळा घालणे, बल्ब हाेल्डरमध्ये बाेट घालणे इत्यादीमुळे विजेचा शाॅक बसताे. विजेचा शाॅक बसला नाही, असा माणूस सापडणे अवघडच आहे. पाणी तापवण्यासाठी बèयाच घरात वापरल्या जाणाèया इमर्शन राॅडचे बटण चालू असताना पाण्यात हात घातला तरी शाॅक बसताे. विजेचा शाॅक हा तसा आपल्याला बारीकसा वा दाेन मिनिटे झिणमिण्या आणणारा अपघात वाटला, तरी प्रत्यक्षात मात्र ताे जीवघेणा असा गंभीर अपघात ठरू शकताे. आकाशात चमकणारी वीज काेणाच्या अंगावर पडली, तर ती व्यक्ती वाचत नाही. तिचा जळून अगदी काेळसा हाेऊन जाताे. घरगुती विजेमुळे मात्र कमी-अधिक शक्तीचे धक्के बसू शकतात. डीसी वीज ही एसीपेक्षा जास्त घातक असते. महाराष्ट्रात जवळपास सगळीकडची वीज एसी आहे. आकाशातून पडणारी वीज मात्र डीसीप्रमाणे कार्य करते. विद्युत धक्क्याचे व शाॅकचे दाेन प्रकारे परिणाम हाेतात. एक म्हणजे भाजणे व दुसरे म्हणजे मज्जासंस्था, स्नायू व हृदय यांच्यावर विद्युतप्रवाहाचा परिणाम हाेणे. विद्युतधक्क्यामुळे हृदयाची गती अनियमित हाेण्याची किंवा हृदय बंद पडण्याची शक्यता असते. शाॅकमुळे स्नायू अचानक आकुंचन पावतात व त्यामुळे दूर ेकले जाणे, खाली पडणे अशा माेठ्या हालचाली हाेऊ शकतात. विजेचा शाॅक खूप माेठा असेल, तर बेशुद्धी येते किंवा मृत्यूही ओढवताे. वीज आणि विकास यांची सांगड आहे, हे आपण औद्याेगिक क्रांतीपासून अनुभवताेय. पण वीज आणि विनाश यांच्या परस्परसंबंधाची जाणीव आपल्याला अपघातातून अधूनमधून हाेत असते. वीज हे दुधारी शस्त्र आहे. त्यामुळे त्याचा वापर करताना नीट काळजी घेणे अगत्याचे आहे, अन्यथा जीवावर बेतू शकते.

सुविचार

अहंकारापेक्षा नम्रतेचे मोल महान आहे. : पंचतंत्र

जळालेल्या त्वचेवर हे उपाय करा

0

जळालेल्या त्वचेवर हे उपाय करा
* जळालेल्या त्वचेवर मध लावल्यास डागही राहत नाही.
* केळीची साल त्वचेवर लावल्याने आराम मिळतो, याला तोपर्यंत लावून ठेवावे
जोपर्यंत त्वचा काळी पडत नाही.

* त्वचा कशानेही भाजली गेली तर लगेच त्यावर उपाय म्हणून कोरफड लावावे.
* कोरफड जखमेवर ताजे लावल्यास त्याचे डागही राहत नाहीत.
* भाजलेल्या त्वचेवर दहीसुद्धा लावू शकता, पण लगेच लावू नये,
अर्धा तासाने लावावे.

चॉकलेट बिस्किट

0

चॉकलेट बिस्किट

साहित्य : मैदा १ किलो, पिठीसाखर
५०० ग्रॅम, लोणी ५०० गॅ्रम, चॉकलेट सॉस
गरजेनुसार.

कृति : मैदा व साखर चाळून घ्या व
लोण्यासोबत मळून घ्या. मैद्याची बिस्किटे
बनवा व ती ओव्हन ट्रेत मांडा. २०० डिग्रीवर
प्रथम ओव्हन तापवून ठेवा व त्याच तापमानावर
बिस्किटे आत ठेवा. गुलाबीसर झाल्यावर बाहेर
काढा. चॉकलेट सॉसमध्ये बुडवून काढा. हवा
तर त्यावर सुकामेवा पेरा.