तोंडोली मटार मसालेभात

0

तोंडोली मटार मसालेभात

साहित्य – २ वाट्या तांदूळ, २ वाट्या उभी चिरलेली तोंडली, १ वाटी मटारचे दाणे, २ हिरव्या मिरच्यांचे तुकडे, १ चमचा काळा मसाला, १ चमचा धणेपूड, १/२ चमचा जिरेपूड, १/२ चमचा लमवंग, दालचिनी पूड, तेल, तिखट, मीठ, हळद, दही, ओले खोबरे, कोथींबीर.

कृती – तांदूळ स्वच्छ धूवून ठेवावे. तेलात हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी करा. त्यात तोंडली व मटारचे दाणे घालून परता. थोडे पाणी घालून ४ वाफा काढा. नंतर त्यात तांदूळ घालून परता. तिखट, मीठ, मसाले, हळद, दही, ओले खोबरे, कोथींबीर, मिरच्यांचे तुकडे घालून ढवळा. तांदळाच्या दुप्पट पाणी घालून भात करा. जरूर वाटल्यास आणखी थोडे पाणी घाला. चांगली वाफ आणा.

पोटदुखीवर घरगुती उपाय

0

पोटदुखीवर घरगुती उपाय


दहा ग्रॅम गुळ व अर्धा चमचा खायचा चुना एकत्र करून त्याची एक गोळी तयार करावी.
ही गोळी एक ग्लास कोमट पाण्यासोबत घेऊन थोडी झोप घ्यावी. थोड्याच वेळेत पोटदुखीवर
आराम पडेल. जर पोट फारच जोराने दुखत असेल तर आल्याच्या रसामध्ये मध मिसळून त्याचे
सेवन करावे. असे केल्याने पोट दुखणे थांबते.

 

दैनिक पंचांग बुधवार, दि. २८ फेब्रुवारी २०२४

संकष्ट चतुर्थी, शके १९४५ शोभननाम संवत्सर, माघ कृष्णपक्ष, हस्त ०७|३३
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. ३१ मि.

राशिभविष्य

मेष : निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये
हजेरी द्यावी लागेल. कामात अडचणी येतील. पारिवारिक वाद विकोपास जातील.

वृषभ : आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण होतील. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव. मुले व
पत्नी यांच्या सहवासामुळे कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहिल.

मिथुन : जोडीदारा बरोबर तणाव ठेऊ नका. मतभेदांपासून लांब रहा. व्यापार चांगला होईल. विवाह योग, घरात शुभ मांगलिक कार्ये. व्यापारिक भागीदारीसाठी उत्तम वेळ. आपल्या कामाच्या गोष्टी गुप्त ठेवा. मानसिक संतोष वाढेल.

कर्क : अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल. मनावरील दडपण दूर होईल. अनुसंधानातून कार्यक्षेत्रात प्राप्ति योग. जुन्या मित्रांचा सहवास लाभेल. आर्थिक जबाबदार्‍या वाढतील.

सिंह : कार्यक्षमता वाढल्याने उत्साह वाढेल. अभीष्ट सिद्धी होईल. फायदा होईल. विरोधक करार करतील. फत प्रयत्नांति परमेश्वर ही उती लक्षात ठेवावी. आत्मविश्वास वाढेल.

कन्या : अध्ययनात रूचि वाढेल. कामांची प्रशंसा होईल. भागीदारी पक्षात होऊ शकते. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. अध्ययनात छान यश. आपली चूक स्वीकारावी लागेल.

तूळ : उपजीविकेच्या स्त्रोतांमुळे लाभ प्राप्ति. भागीदारीतून विशेष लाभ. मागील उधारी उसनवारी वसूल होईल. क्रीडा, साहित्य या क्षेत्रांमध्ये चमकाल. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. सांगण्यावर विश्वास ठेवू नका. खर्चाची चिंता राहील.

वृश्चिक : काळजीपूर्वक काम करा. कोणतेही काम एखाद्यावर विसंबून राहून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील.
कामात अडचणी येतील. अनिश्चितता वाटेल. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढतील. वेळ सत्कारणी लागेल.

धनु : आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल. आजची संध्याकाळ मित्रांबरोबर व्यतित करण्याचा प्रयत्न करा. पाठबळ मिळेल. मनाला प्रसन्नता वाटेल. अडचणी येतील. सतत परिश्रमाने आर्थिक लाभ होतील.

मकर : प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व वरिष्ठांशी संपर्क आपल्यासाठी आनंद देणारा ठरेल. मुले आपल्यापासून लांब जाणार नाहित याची काळजी घ्यावी. पारिवारिक वैचारिक मतभेद वाढतील. अनपेक्षित फायदा करून देणार्‍या काही घटना घडतील.

कुंभ : काळ अनुकूल आहे कामे सहज होतील. राजकारणी लोकांचा पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल. आपल्याकडे राहिलेली लोकांची देणी परत कराल. नोकरीत कुणावरही विश्वास ठेवू नये. व्यापारिक लाभ आणि सुखय्समृद्धि वाढेल.

मीन : कामाचा भार अधिक राहील. महत्वाचे काम टाळा. कौटुंबिक सभासदांशी वादविवाद टाळा. मन आनंदी प्रसन्न राहिल्याने दिवस आनंदात जाईल. योजनेचे क्रियान्वयन आवश्यक. यश मिळणार नाही. सामाजिक मान-सन्मान वाढेल.

                                                                                        संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

‘मोसंबी’चे फायदे

0

‘मोसंबी’चे फायदे
शरीरात कोणत्याही कारणाने रक्तयदोष निर्माण झाला, तर काही दिवस तरी नियमाने रस
घ्यावा. बस, ट्रेन, बोट लागण्याची सवय असल्यास प्रवासात अधूनमधून साल काढून कापटी
चोखत राहावे; त्रास जाणवत नाही.

आपण झोपतो म्हणजे काय?

आपण झोपतो म्हणजे काय?

झोप झाल्यावर माणूस ताजातवाना होतो. रोज आपण दिवसभराच्या परिश्रमानंतर झोपी जातो व सकाळी उठून परत कामाला लागतो. झोप न मिळाल्यास काय होते हे तुम्ही अनुभवले असेलच. आपण चिडचिडे होतो, कामात लक्ष लागत नाही, डुलया येतात, कधीकधी चक्कर येते. यावरून झोप घेणे ही अपरिहार्य गोष्ट आहे, हे आपल्या लक्षात येईल. लहान मुले १६ ते १८ तास झोपतात. या काळात अपचयाचा दर कमी असतो व मुलांची वाढ होते. हळूहळू झोप कमी होते. तरुण व्यक्तींना ७ ते ८ तास झोप आवश्यक असते. वृद्धावस्थेत मात्र ५ ते ६ तास झोपही पुरते. सहसा दुपारी झोपू नये. नुसते पडून राहणे म्हणजे झोप नव्हे, हे तुम्हाला माहीत आहे. झोपेचे इलेट्रो एनकेफॅलोग्रॅम वा मेंदूच्या कार्याच्या आलेखाद्वारे विश्लेषण केले तर असे लक्षात येते की, या काळात मेंदूच्या येणार्‍या लहरी कमी होतात; पण त्यांची उंची वाढते. नंतरच्या अवस्थेत डोळ्यांच्या जलद हालचाली होतात व मेंदूतून येणार्‍या लहरींची संख्या वाढते. या लहरींची उंची कमी असते. झोपेच्या एका चक्रात डोळ्यांची जलद हालचाल न होणारी झोप व डोळ्यांची जलद हालचाल होणारी झोप अशा दोन अवस्था असतात. एकदा प्रौढ माणूस झोपल्यावर अशी ४ ते ५ चक्रे त्यात असतात. या प्रत्येक चक्राचा कालावधी दीड तासांचा असतो. झोप ही लंबमज्जेतील चेतातंतूंवर अवलंबून असते. त्यामुळे या भागाला इजा झाल्यास वा त्यावर परिणाम झाल्यास खूप झोप येते वा येतच नाही. हे जरी खरे असले तरी सामान्यतः जास्त झोप हा सवयीचाच परिणाम असतो. त्यामुळे योग्य सवय लागल्यास झोप कमी होते. झोप ही जीवनासाठी आवश्यक असते, कारण या काळात शरीराला विश्रांती मिळते. श्वसन व रक्ताभिसरणाचे कार्यही मंदावते. अशी ही झोप जास्त झाली, तर मात्र ‘झोपाळूपणाचा’ आरोप येतो आणि खूप कमी झाली तरी चिंता वाटते.

सुविचार

पारखून घेतलं तर कोणीच आपलं नसतं आणि समजून घेतलं तर कोणीच परकं नसतं.

पंजाबी माँ दी दाल

0

पंजाबी माँ दी दाल

साहित्य : १ कप उडीद डाळ, १/२
कप राजमा, ४ कप पाणी, १ तुकडा कापलेले
आले, ४ पाकळी कापलेला लसूण, १
कापलेला कांदा, ३/४ चमचे गरम मसाला,
२ कापलेली हिरवी मिरची, १/२ चमचे हळद,
१ चमचा मीठ, २ मोठे चमचे तेल, ३/४ चमचे
जीरे, कापलेली कोथिंबीर, २ मोठे कापलेले
टोमॅटो, ३/४ चमचे लाल मिरची
कृती : उडीद व राजम्यास ४ कप पाणी
व एक चुटकी मीठ टाकुन उकळावे. तेल गरम
करून जीरे टाकावे. नंतर कांदा, लसूण, आले
व हिरवी मिरची फ्राय करावी. मीठ, वाटलेली
लाल मिरची व हळद टाकून एक मिनीट
फ्राय करून टोमैटो टाकावे. ३ मिनीटानंतर
उकळलेली डाळ टाकावी आणि चमच्याने
चांगली घोटावी, ४-५ मिनीट उकडल्यानंतर
कोथिंबीर व गरम मसाला टाकावा. तंदूरी
पोळी बरोबर गरम गरम खावी.

सल्ला

0

दुधाची मलई तसेच वाटलेली
खडीसाखर आवश्यकेनुसार मिसळून मुलांना
खाऊ घालावी.

चेहर्‍यावरील डाग कमी करण्यासाठी

चेहर्‍यावरील डाग कमी करण्यासाठी
अ‍ॅलोव्हेराच्या पानाचा वरचा थर काढून
त्यातील गर चेहर्‍यावर चोळल्यास हळूहळू
चेहर्‍यावरील डाग कमी होतात.

वास्तू

0

दक्षिण दिशेचा संबंध यंत्रसामग्री, तराजू,
भांडी आणि फर्निचर अशा जड वस्तूंशी आहे.
या दिशेस मोठे दार किंवा खिडकी असणे
अशुभ आहे. या दिशेची भिंत जास्त भक्कम
बांधून घेतली पाहिजे, शिवाय वर उल्लेख
केलेल्या वजनदार वस्तू ठेवून ही दिशा जड
केली पाहिजे.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर