दैनिक पंचांग गुरुवार, दि. १४ मार्च २०२४

0
30

—, शके १९४५ शोभननामसंवत्सर, फाल्गुन शुलपक्ष, भरणी १६|५६
सूर्योदय ०६ वा. २९ मि. सूर्यास्त ०६ वा. ३२ मि.

राशिभविष्य

मेष : आरोग्य उत्तम राहील. आपल्या हातात आलेल्या संधी निसटू देऊ नका. आर्थिक नुकसान संभव. कामात गुप्तता राखा. जबाबदारीची कामे पडतील. नोकरीत नुकसानी संभव.

वृषभ : आपल्या नवीन व विविध विचारांनी आपण आपल्या मित्रांना आणि सहकार्‍यांना प्रभावित कराल. सहयोग मिळेल. संबंध बिघडतील. अव्यवहारिक कामांपासून लांब रहा.

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात अपेक्षेनुसार घडेल. तब्बेतीची काळजी घ्या. व्यावसायिक प्रकरणात अडचणी येतील. वैचारिक असंतोष राहील. कामात मन रमणार नाही.

कर्क : व्यापार-व्यवसायात स्थिती आशाजनक राहील. संमिश्र परिणामांचा दिवस. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल.

सिंह : व्यापार-व्यवसायात परिस्थिती मध्यम राहील. कोणत्याही प्रकारची जोखीम टाळा. संभाषणात सावगिरी बाळगा. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. कामाचा ताण जाणवेल.

कन्या : इतर लोकांना आपण प्रभावित कराल. आपल्या प्रिय व्यक्ती अधिक लक्ष मिळावे अशी अपेक्षा ठेवतात. आपली स्थिति, वास्तविकता वाढेल. पारिवारिक दृट्या वेळ सामान्य.

तूळ : आनंदाची बातमी मिळेल. आपल्या दिनचर्येचा सुरुवात गंभीर मानसिक स्वरूपाच्या कार्यांनी होईल. खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. आपल्या प्रयत्नाने उन्नति कराल. धनलाभ होईल. वरिष्ठांची मर्जी राहील.

वृश्चिक : काही महत्वपूर्ण प्रश्नांची सोडवणूक होण्याची शयता आहे. विश्वास कमी राहील. व्यर्थ ताण जाणवेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी. संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग.

धनु : जेव्हा इतर व्यक्ती आपल्याकडून वेळ मागतील त्यावेळी आपणास आपल्या इच्छेवर संयम ठेवणे आवश्यक असेल. आपल्या प्रयत्नांमुळे व्यापारात वृद्धि होईल. मनात नवीन कल्पना सुचतील.

मकर : व्यापार-व्यवसायात आर्थिक लाभ मिळेल. कला जगातील व्यक्तींना लाभ मिळेल. शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्हा करु नका. मन रमणार नाही. वेळेचे सदुपयोग केल्याने यश मिळेल.

कुंभ : आज आपणास आपल्या सामर्थ्यावर विश्वास होईल. परंतु आपल्या मुळच्या उतावीळ स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल. मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल.

मीन : घर जमीनसंबंधी व्यवहारात फायदा होईल. खर्च होईल. मागील उधारी वसुल होईल. अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्‍यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. नवीन ओळखी संभवतात. गुंतवणूकीतून लाभ होण्याची शयता.

                                                                                       संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.