कैरीची कढी
साहित्य : १ नारळ, कैर्या ७-८,
१ कांदा, चिमूटभर मेथ्या, बेसन गरजेपुरते,
साखर, मीठ चवीपुरते, १ चमचा तूप.
कृति : नारळाच्या खवाचे दाट दूध
काढून ठेवा. नंतर पुन्हा त्याच खवाचे पातळ
दूध काढून ठेवा. कैर्या धुवून, कापून फोडी
करून ठेवा. कांदा जाडसर चिरून ठेवा. मंद
आचेवर तूप गरम करा. त्यात मेथ्या दाणे घाला.
तडतडू लागले की कांदा टाकून वाफवून घ्यावा.
मग कैरीच्या फोडी घालून परता. त्यावर थोडे
पाणी व मीठ टाका. झाकण घालून शिजवत
ठेवा. तोपर्यंत नारळाच्या पातळ दुधात बेसन
कालवून कैरीच्या शिजलेल्या फोडीवर ओता.
मिश्रणाला उकळी येऊ लागली की त्यात
साखर घाला. त्यावर नारळाचे दाटसर दूध
ओता. उकळी आल्यावर भांडे खाली उतरा.
आवडत असेल तर या कढीत अख्ख्या २-३
लाल मिरच्याही टाकू शकता.