देवायत्तं कुले जन्मः मदायत्तं तु पौरुषम्. : वेणिसंहार
थंड नारियल सरप्राईज
थंड नारियल सरप्राईज
साहित्य : एका नारळाचा खवलेला
चव, कोकम (आमसुले) २/३, एक ओली
लाल मिरची, जिरे १ टीस्पून, कढीपत्ता
पाने १/२, साखर व मीठ चवीनुसार, थोडी
चिरलेली कोथिंबीर, पाव टी स्पून आले
वाटण.
कृति : नारळाचा चव, आमसुले,
मिरचीचे तुकडे, आले, कढीपत्ता, जिरे यात
बेताचे पाणी घाला. ब्लेंडरमधून काढा. गोळा
वर उरलेल्या चोथ्यात अजून थोडे पाणी
घाला. ब्लेंडरमधून काढा. परत गाळून घ्या.
दोन्ही रस एकत्र करा. चवीनुसार मीठ,
मिरपूड घाला. ढवळा, फ्रिजमध्ये ठेवा थंडगार
झाल्यावर प्या.
केसांच्या आरोग्यासाठी
केसांच्या आरोग्यासाठी
* केस धुताना दही, ताक यात
मुलतानी माती मिसळून ती अगोदर केसांना
लावा व वाळल्यावर केस धुवा. केस कोमल
व लांब होतील. प्राचीन ऋषीमुनी मातीचाच
लेप सर्वांगावर लावत असत. यामुळे रोगजंतूही
शरीरापासून दूर राहतात. पायाच्या टाचेस
भेगा पडल्यास तेल व हळद एकत्र करून
लावावे.
* सायबर कॅफेसाठी काळ्याशिवाय
कोणताही फिकट रंग शुभ असतो.
दैनिक पंचांग बुधवार, दि. १३ मार्च २०२४
विनायक चतुर्थी, शके १९४५ शोभननामसंवत्सर, फाल्गुन शुलपक्ष, अश्विनी
१८|२५
सूर्योदय ०६ वा. २९ मि. सूर्यास्त ०६ वा. ३२ मि.
राशिभविष्य
मेष : आर्थिक नुकसान संभव. कामात गुप्तता राखा. सहयोग मिळेल. संबंध बिघडतील. अव्यवहारिक कामांपासून लांब रहा.
वृषभ : वैचारिक असंतोष राहील. कामात मन रमणार नाही. तब्बेतीची काळजी घ्या. व्यावसायिक प्रकरणात अडचणी येतील.
मिथुन : उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील.
कर्क : आपली स्थिति, वास्तविकता वाढेल. पारिवारिक दृट्या वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल.
सिंह : खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. जबाबदारीची कामे पडतील. नोकरीत नुकसानी संभव.
कन्या : शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्हा करु नका. मन रमणार नाही. विश्वास कमी राहील. व्यर्थ ताण जाणवेल.
तूळ : मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल.
वृश्चिक : अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील.
धनु : आपल्या प्रयत्नाने उन्नति कराल. धनलाभ होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. आपल्या प्रयत्नांमुळे व्यापारात वृद्धि होईल.
मकर : आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी. नवीन ओळखी संभवतात.
कुंभ : संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग. मनात नवीन कल्पना सुचतील. वेळेचे सदुपयोग केल्याने यश मिळेल.
मीन : आपल्या बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शयता. कामाला वाव मिळेल. गुंतवणूकीतून लाभ होण्याची शयता.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.
हिवतापासाठी लोरोक्वीन कसे देतात?
हिवतापासाठी लोरोक्वीन कसे देतात?
तुम्हाला ताप आल्यावर कोणीही पटकन म्हणते की “मलेरिया झाला असेल.” मलेरिया वा हिवताप इतका बोकाळला आहे की, कोणताही ताप मलेरिया असू शकतो, असे म्हणता येते. मलेरिया हा एक गंभीर आजार आहे. या आजारात मेंदूवर परिणाम झाल्यास मृत्यूही ओढवू शकतो. म्हणूनच वेळेवर उपचार घेण्याची नितांत आवश्यकता असते. हिवतापाचे निदान करण्यासाठी ताप आलेल्या व्यक्तीच्या बोटाचे दोन थेंब रक्त घेऊन त्याची सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासणी करतात. या तपासणीत हिवतापाचे जंतू दिसतात. हिवतापाचे निदान झाल्यास उपचार चालू करावे लागतात. यात लोरोक्वीन हे औषध अत्यंत महत्त्वाचे ठरते. हिवताप झालेल्या प्रौढ व्यक्तीला लोरोक्वीन फॉस्फेटच्या (२५० मि.ग्रॅ. च्या गोळीत १५० मि.ग्रॅ. लोरोक्वीन असते) एकूण दहा गोळ्या घ्याव्या लागतात. सुरुवातीला एकदम चार, मग आठ तासांनी दोन, अशा गोळ्या पहिल्या दिवशी देतात. दुसर्या व तिसर्या दिवशी दोन-दोन गोळ्या देतात. हिवतापाच्या प्रकारानुसार प्रायमाक्वीन हे औषधही दिले जाते. लोरोक्वीन उपाशीपोटी देऊ नये. कारण त्यामुळे मळमळ होणे, उलट्या होणे, पोटात जळजळ इत्यादी त्रास होऊ शकतो. लोरोक्वीनचा परिणाम न झाल्यास क्वीनीन, मेफ्लोक्वीन, मेटाकेल्फीन अशी औषधे वापरता येतात. हिवतापाचे गांभीर्य लक्षात घेता उपचार पूर्ण घेणे अगत्याचे ठरते, अन्यथा हिवताप परत होऊ शकतो किंवा मेंदूवर विपरीत परिणाम होऊन मृत्यू ओढवू शकतो.
भात खाऊनही वजन राहू शकते नियंत्रणात
भात खाऊनही वजन राहू शकते नियंत्रणात
आपल्या आहारातील अनेक पदार्थांबाबत आपल्या मनात गैरसमज असतात, भात हा
त्यातलाच एक. भातामुळे लठ्ठपणा येतो किंवा भातामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते असा
आपल्याकडे समज आहे. मात्र भारतात आजही दक्षिण भागात किंवा कोकणासारख्या भागात
भात हेच मुख्य अन्न आहे. याठिकाणी कायम तांदूळाचे पदार्थ खाल्ले जातात. पूर्वीच्या काळीही
मोठ्या प्रमाणात भात खाल्ला जायचा. पण अशा कायम भात खाण्याने या लोकांना काही त्रास
होत नाही हे दिसून येते.
लठ्ठपणा हे अनेकांचं भात न खाण्याचं प्रमुख कारण आहे. भातातील एक संयुग तुमचं हृदय
निरोगी राहण्यासाठी मदत करतं. म्भाताबरोबर आपण भाजी, आमटी खात असल्याने भातातून
थेट शरीरावर होणारे परिणाम होत नाहीत. अनेकदा आहारतज्ज्ञही भात खा पण तो प्रमाणात खा
असे सांगतात. त्यामुळे भात पूर्ण बंद करणे हा लठ्ठपणा किंवा रक्तातील साखर कमी करण्याचा
उपाय नव्हे असे या अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यामुळे भात आरोग्यासाठी चांगला नसतो हे
विधान वादग्रस्त आहे असे म्हणता येईल.







