ऑफिस किंवा दुकानात सकारात्मक
उर्जेत वाढ करण्यासाठी, आपण बसतो तेव्हा
पाठ भिंतीकडे असली पाहिजे. त्या भिंतीवर
मोठ-मोठे पर्वत असलेले चित्र लावायला
पाहिजे. टेबलावर क्रिस्टलचे पेपरवेट ठेवायला
पाहिजे. घरात पूर्व दिशेस जास्त रिकामी
जागा सोडावी. मुख्य दरवाजासमोर पंचमुखी
हनुमानाचे चित्र लावावे.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.
वास्तू
दैनिक पंचांग मंगळवार, दि. १९ मार्च २०२४
—, शके १९४५ शोभननामसंवत्सर, फाल्गुन शुलपक्ष, पुनर्वसु २०|१०
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. ३२ मि.
राशिभविष्य
मेष : आपल्या कार्यक्षेत्रातील किंवा आपल्या व्यापारातील इतर लोकांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. मानसिक अस्थिरता जाणवेल. वैवाहिक जीवनात अडचणी येण्याची शयता.
वृषभ : अधिक श्रम करावे लागतील. पळापळ देखील अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. महत्त्वाचे निर्णय घेताना विचार करावा लागेल. वातावरण अनुकूल राहील.
मिथुन : एखाद्या मित्राशी झालेली भेट दिलासा देईल. आर्थिक पक्षाबाबत सावध राहा. व्यवसायातील अनेक कामे मार्गी लावू
शकाल. महत्वाचे निर्णय घेऊ शकाल.
कर्क : कौटुंबिक पाठिंबा देखील मिळणार नाही. वाहने अधिक काळजीपूर्वक चालवा. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल.
आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. मानसिक ताणय्तणाव जाणवेल.
सिंह : आपणास वरिष्ठ अधिकार्यांकडून समर्थन मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. वाहनखर्च होण्याची शयता आहे. मित्रांचा पाठिंबा मिळेल.
कन्या : आज आपणास कठोर श्रम करावे लागेल. धार्मिक कार्यांमध्ये खर्च होण्याची शयता आहे. वैवाहिक सौख्य लाभेल. प्रकृतीत सुधारणा होईल पण विशेष लक्ष द्या.
तूळ : आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा चांगला नसेल. मानसिक स्थिती आल्हाददायक राहील. प्रतिकूलता जाणवेल. नातेवाईकांपासून सावध रहा. प्रवासाचे योग संभवतात.
वृश्चिक : आरोग्याची काळजी घ्या. व्यस्त राहाल. कौटुंबिक विषयांमध्ये पैसा खर्च होईल. आरोग्य उत्तम राहील. आजचा दिवस हा विशेष कामासाठी अनुकूल असेल.
धनु : साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. मानसन्मानाचे योग येतील. व्यापार-व्यवसायात अडचणी येण्याची शयता.
मकर : चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. मानसिक स्थिती आनंददायक राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. मानसिक सुख मिळेल. वाद-विवाद शयतो टाळा.
कुंभ : काळजीपूर्वक कार्य करा. संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रगतीकडे वाटचाल कराल. कामामध्ये मन रमणार नाही.
मीन : हातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. खर्च अधिक होईल. मनोबल व आत्मविश्वास वाढवणारी एखादी घटना घडेल. तब्येत बिघडू शकते त्याकडे विशेष लक्ष द्या. आपण आपल्या घराच्या वाढीबाबत काही योजना बनवू शकता.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.
काही जणांच्या तोंडाला दुर्गंधी का असते?
काही जणांच्या तोंडाला दुर्गंधी का असते?
हा अनुभव तुम्ही कधी तरी घेतलाच असेल. समोरच्याने बोलायला तोंड उघडावे आणि एकदम दुर्गंधी यावी. असे का बरे होते? सकाळी उठल्या-उठल्या दात घासलेले नसताना आपल्या सगळ्यांच्याच तोंडाला दुर्गंध येईल. रात्रभर तोंड बंद असल्याने असा वास येतो; पण इतर वेळा मात्र निरोगी माणसाच्या तोंडाला दुर्गंधी येत नाही. तोंडाला दुर्गंधी येण्याची अनेक कारणे आहेत. दातांना कीड लागली असल्यास दुर्गंधी येते. हिरड्यांतून संसर्गामुळे पू येत असेल, तरी तोंडाला दुर्गंधी येते. तोंडाची अस्वच्छता, तोंड, घसा, जीभ यांना झालेला जंतूसंसर्ग; लाळग्रंथींचा जंतूसंसर्ग या सर्वांमुळे तोंडाला दुर्गंधी येते. या स्थानिक कारणांखेरीज शरीरातील इतर इंद्रियांच्या रोगांमुळेही तोंडाला विशिष्ट असे वास येतात. फुफ्फुसात झालेला पू, ब्रॉन्कीएटॅसीससारखा रोग यांमुळे दुर्गंधी येते. खूप धूम्रपान करणार्या व्यक्तींच्या तोंडाला दुर्गंधी येते. यकृताच्या गंभीर आजारात तोंडाला माशासारखा वास येतो. मूत्रपिंडाचे कार्य बंद पडल्यास तोंडाला अमोनियाप्रमाणे वास येतो. मधुमेहाच्या गुंतागुंतीमध्ये तोंडाला गोडसर फळांसारखा वास येतो. तोंडाला दुर्गंधी येण्याची कारणे आपण पाहिली, स्थानिक कारणांमुळे येणारी दुर्गंधी ही त्या भागातील जंतूसंसर्गामुळे असते तर फुफ्फ ुसाच्या, यकृताच्या वा मूत्रपिंडाच्या रोगांमुळे येणारी दुर्गंधी ही श्वासामधून येते. त्यामुळे अशा वेळी नुसते तोंड स्वच्छ ठेवून वा दात घासून ती दुर्गंधी कमी होणार नाही. त्यासाठी मूळ रोगावरच उपचार घ्यावे लागतील; पण सामान्यतः तोंडाला येणारी दुर्गंधी स्थानिक कारणांमुळेच असते व वैयक्तिक स्वच्छता ठेवल्याने ती कमी होऊ शकते.
ध्यानधारणेमुळे मेंदूची क्षमता वाढते
ध्यानधारणेमुळे मेंदूची क्षमता वाढते
नियमित योगासने व ध्यानधारणेमुळे मेंदूची कार्यक्षमता तसेच ऊर्जापातळी वाढते, असे
नवीन संशोधनात दिसून आले आहे. हठयोग ही योगाची पद्धत पाश्चात्य देशातही वापरली जाते,
त्यामुळे हे शय होते असे सांगण्यात आले. यात शरीराच्या विविध अवस्था व श्वसनाच्या
पद्धती यांचा समावेश होतो. माइंडफुलनेस प्रकारच्या ध्यानधारणेने विचार, भावना व संवेदना
यांचे निरीक्षण केले जाते व माणसाचा खुलेपणा तसेच स्वीकार्यता वाढते. रोज हठयोग व
माइंडफुलनेस ध्यानधारणा केल्यास मेंदूची बोधनक्षमता वाढते तसेच भावनिक प्रतिसादानुसार
लगेच क्रिया करण्याचे प्रमाण कमी होते. सवयीचे विचार व कृती यापासून मुक्ती मिळते.
चॉकलेट पुडिंग
चॉकलेट पुडिंग
साहित्य : चोवीस मारी बिस्किटे, पाच
टी स्पून लोणी, एक कप दूध, तीन टे. स्पून
फळांचा रस, चार टे. स्पून ड्रिंकिंग चॉकलेट,
तीन टे. स्पून पिठीसाखर, दोन टे. स्पून
जिलेटीन, शोभेसाठी थोडे भाजलेले काजूचे
काप व मलई.
कृती : थोड्या कोमट पाण्यात
जिलेटीन विरघळून घ्यावे. नंतर त्यात फळांचा
रस घालून सारखे करावे. लोणी फेसून घ्यावे.
नंतर त्यात साखर, ड्रिंकिंग चॉकलेट घालून
हलके होईपर्यंत पुन्हा फेसावे. जिलेटीनचे
मिश्रण गार झाले की ते एगबिटरने घुसळून
वरील मिश्रणात घालावे.
दुधात एकेक बिस्किट बुडवून एका
प्लेटमध्ये ओळीने मांडावे. प्रत्येक बिस्किटावर
चॉकलेटचे मिश्रण ओतावे (पहिल्या थरात
साधारण आठ बिस्किटे). पुन्हा बिस्किटांचा
एक थर देऊन चॉकलेटचे मिश्रण ओतावे.
उरलेले मिश्रण कडेने गोल ओतावे. शोभेसाठी
वर काजू व साखर घातलेली मलई पसरावी.
नंतर ही बशी फ्रीजमध्ये ठेवून चांगले घट्ट होऊ
द्यावे.
होममेड फेसपॅक
होममेड फेसपॅक
मुलतानी माती पावडर, चंदन पावडर,
संत्र्याच्या सालीची पावडर, लिंबांच्या सालीची
पावडर व लिंबू रस समप्रमाणात मिसळून हे
द्रावण एका बाटलीत भरुन ठेवा. जेव्हा याचा
फेसपॅक म्हणून उपयोग करायचा असेल तेव्हा
या बाटलीतील थोडे द्रावण घ्या व त्यात कच्चे
दूध, गुलाबपाणी मिसळून चेहर्यावर लावा.
झाला तुमचा घरगुती फेसपॅक तयार!







