पुदिना शेव

पुदिना शेव

साहित्य : २ कप बेसन, १ पुदिना गड्डी,
४ हिरव्या मिरच्या, १/४ कप बटर, १/४ टी
स्पून हिंग, चिमूट हळद, मीठ चवीने, तेल
कृती : प्रथम पुदिना गड्डी निवडून,
धुऊन घ्या. मिसरमध्ये पुदिना पाने, हिरवी
मिरची, १/४ कप पाणी घालून चांगली
बारीक पेस्ट करून घेऊन गाळून घ्या. एका
परातीत बेसन व बटर मिस करून घ्या.
मग त्यामध्ये मीठ, हिंग, हळद घालून मिस
करून पुदीन्याचे पाणी घालून मिस करून
शेवेचे पीठ चांगले मळून घ्या. शेवेच्या पिठाला
तेलाचा हात लावावा. शेव बनवण्यासाठी
शेवेचा सोर्‍या घेऊन बारीक भोक असलेली
चकती लावून शेवेचे पीठ त्यामध्ये भरून घ्या.
कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये शेव
घालून विस्तव मंद करा. दोन्हीही बाजूने शेव
कुरकुरीत तळून घ्या. शेव थंड झाल्यावर घट्ट
झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.

टोमॅटो सुप बनविताना

टोमॅटो सुप बनविताना
सूप बनविण्यासाठी टोमॅटो फ्रीजमध्ये
ठेवा. जेव्हा ते सोलावयाचे असतील तेव्हा
त्यावर गरम पाण्याची धार सोडा. टोमॅटोची
साल मऊ होईल व ते सोलणे सोपे जाईल.
टोमॅटो जास्तीत जास्त आहारात घेणे अत्यंत
आवश्यक असते. टोमॅटोने शरीरातील रत
वाढते त्याचप्रमाणे त्वचेचा रंग उजळतो आणि
हिमोग्लोबीनही मोठ्या प्रमाणात वाढते

वास्तू

देवघरातील मूर्तीचे तोंड उत्तर वा दक्षिण
दिशेला असू नये.

रुक्ष त्वचेवरील डाग हटवण्यासाठी

रुक्ष त्वचेवरील डाग हटवण्यासाठी
दुधात चंदन उगाळून लावावे.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा,
नगर

हसा आणि शतायुषी व्हा!

नवरा : तुला किती वेळा सांगितले… स्वयंपाक करताना
मोबाईल मध्ये तोंड खुपसून स्वयंपाक नको करत जाऊस…
आमटीत मीठ नाही… हळद नाही… मिरची नाही… मसाला
नाही… अगदी पाण्या सारखी फिक्की आहे.
बायको : (लाटणे फेकून) तुम्हाला किती वेळा सांगितले
की मोबाईलमध्ये तोंड खुपसून जेवत जाऊ नका.. तुम्ही
पाण्याच्या ग्लासात पोळी बुचकळून खात आहात.

दैनिक पंचांग रविवार, दि. ७ एप्रिल २०२४

शिवरात्रि, शके १९४५ शोभननाम संवत्सर, फाल्गुन कृष्णपक्ष, पू.भा.१२|५८
सूर्योदय ०६ वा. २४ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष : अडचणी येतील. सतत परिश्रमाने आर्थिक लाभ होतील. योजनेचे क्रियान्वयन आवश्यक. वाहने व उपकरणे सावकाश
चालवावीत.

वृषभ : शत्रुपक्षाच्या कारवाया वाढतील. पारिवारिक वैचारिक मतभेद वाढतील. व्यापारात नवीन लाभदायी करार होतील. मानसिक शांति मिळेल. अध्यात्मिक क्षेत्राकडे आपण आज वाटचाल कराल.

मिथुन : कामे अपुरी राहतील. खर्चाची चिंता राहील. सांगण्यावर विश्वास ठेवू नका. अनपेक्षित फायदा करून देणार्‍या काही घटना घडतील. वेळ सत्कारणी लागेल.

कर्क : खर्च होईल. अडकलेल्या कामात सुधारणा होईल. निश्चितेने काम करा. चांगली बातमी मिळेल. गुंतवणूकीतून लाभ होण्याची शयता.

सिंह : कायदेशीर कामात आत्मविश्वास कमी राहील. आपल्या पावलांच्या खुणा दुसर्‍यांना मार्गदर्शक ठरण्याचा संभव आहे. मागील उधारी उसनवारी वसूल होईल.

कन्या : आपल्या विवेकबुध्दीच्या उलट काम झाल्याने हानि होऊ शकते. नियंत्रण ठेवा. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. खिशाला आर्थिक झळ बसण्याचा संभव आहे.

तूळ : आपल्या यशाचा मूळ मंत्र कोणत्याच कामाला अशय न समजणे आहे. कामाला वाव मिळेल. आपले निर्णय, विचार दुसर्‍यांवर थोपू नका. वेळेच महत्व समजा. आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे.

वृश्चिक : आई-वडीलांची चिंता सतावेल. कार्यालयातील सहकार्‍यांकडून मार्गदर्शन मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. कामे कौशल्यपुर्ण करावी लागतील. वाहन व गृहखरेदीसाठी चांगला दिवस.

धनु : आपली वैचारिक पातळी चांगली ठेवा. वडीलोपार्जित मालमत्तेचे व्यवहार मार्गी लागतील. भाऊबंद डोके वर काढण्याची शयता आहे. जुन्या गुरुजन वर्गाची भेट होईल. पत्नीकडून सहकार्य मिळेल.

मकर : खूप दिवसांपासून नियोजित राहिलेले काम आज मार्गी लागेल. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. वाहने व उपकरणे
सावकाश चालवा. मागील केलेले संकल्प आज पुर्णत्वास येतील.

कुंभ : पितृचिंता सतावेल. धाकट्या भावंडांची शैक्षणिक चिंता राहिल. दिवस कालच्या दिवसाइतका आनंदी जाणार
नाही. अनेक प्रकारच्या अडचणी संभवतात. हितशत्रुंकडून त्रास संभवतो. शब्दाने शब्द वाढवू नका. आर्थिक स्थितीत सुधारणा.

मीन : गुरुजनांचे मार्गदर्शन लाभेल. इतरांची देणी आपण परत कराल. दिवस प्रसन्नतेत जाईल. कार्यालयातील वरिष्ठांची मर्जी संपादन केल्यास कामातील समस्या दूर होतील.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

डांग्या खोकला म्हणजे काय?

डांग्या खोकला म्हणजे काय?
डांग्या खोकला हा जिवाणूंमुळे होणारा
श्वसनसंस्थेचा रोग आहे. या रोगाला इंग्रजीत हूपींग
कफ, मराठीत माकड खोकला, तर कोकणात
कोल्हेढास असे म्हणतात. वेळूच्या गाठीस डांग
म्हणतात. ती पाण्यात उगाळून पाजली असता हा
खोकला जातो, असा आयुर्वेदिक ग्रंथात उल्लेख
आहे. म्हणून या रोगाला डांग्या खोकला असे
म्हणतात. हा रोग सामान्यतः ५ वर्षांखालील
मुलांनाच होतो. श्वासावाटे हा रोग एकापासून
दुसर्‍याला पसरतो. या आजारात जिवाणूंमुळे
श्वसनसंस्था, फुफ्फुसे यांचा दाह होऊन खोकला
येत राहतो. एकदा खोकला सुरू झाला की त्याची
उबळ १०-१५ मिनिटांपर्यंत टिकून राहते. कित्येक
वेळा मुलाचा श्वास कोंडतो व मूल काळेनिळे पडते.
उबळीमध्ये उलटीही होऊ शकते. श्वास कोंडल्याने
मुल दगावू शकते. जोरजोराने खोकल्याने निर्माण
झालेल्या दाबाने डोळ्यात वा मेंदूतही रक्तस्राव होऊ
शकतो. या रोगाची गुंतागुंत म्हणून न्यूमोनिया,
श्वासनलिकादाह, कान फुटणे, मेंदूवर विपरीत
परिणाम आदी गोष्टी होऊ शकतात. यामुळे मूल
मृत्यूमुखी पडते.
डांग्या खोकला हा एरिथ्रोमायसीन किंवा
टेट्रासायलीनच्या औषधाने बराच कमी होतो.
खोकला कमी होण्यासाठी कोडेनचा वापर करता
येतो. पण एकदा रोग झाला की, औषधोपचारांचा
फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे रोग होऊ न
देणेच चांगले.
डांग्या खोकल्याचा आता सहजगत्या प्रतिबंध
करता येतो. यासाठी लहान मुलांना वयाच्या दीड,
अडीच व साडेतीन महिने वयात त्रिगुणी लसीचे
तीन डोस द्यावेत. त्यानंतर एक वर्षाने बूस्टर डोस
द्यावा. असे केल्यास हा रोग मुलांना होत नाही.
गेल्या काही वर्षात लसीकरणाचे प्रमाण वाढल्याने
या रोगाचे रुग्ण क्वचितच दवाखान्यात सापडतात.
या प्रभावी लसीचा वापर वाढल्यास हा रोग
कायमचा हद्दपार होऊ शकतो.

तुळशीच्या चहाचा लाभ

तुळशीच्या चहाचा लाभ
तुळस घालून नियमित चहा घेतल्याने किडनी स्टोनच्या आजारापासून आराम पडतो.
तसेच तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने खडा लघवीवाटे बाहेर पडण्यास मदत होते. नियमीत
तुळशीचा चहा पिल्याने घसा मोकळा होतो व घशातील जळजळीपासून आराम मिळतो.

सुविचार

शस्त्रास्त्रांच्या लढाईत विजय मिळवण्यापेक्षा आत्मविजय मिळवण्यात खरी शूरता आहे.

खारे शंकरपाळे

खारे शंकरपाळे

साहित्य : ५०० ग्रॅम मैदा, २ चमचा
कलौंजी, १ चमचा बडीशेप, पाव चमचा मेथी,
दीड चमचा खायचा सोडा, २ टे. स्पून तुपाचे
मोहन, मीठ व थोडी साखर.
कृती : कलौंजी, बडीशेप व मेथी भाजून
पूड करावी. मैदा, कडकडीत तुपाचे मोहन व
इतर वस्तू एकत्र करून गरम करून पाण्याने
पीठ भिजवावे. नंतर चांगले मळून या पिठाच्या
पोळ्या लाटून घ्याव्यात व नेहमीप्रमाणे
शंकरपाळे करावेत व तुपात तळावेत.