केळी खाणे लाभदायक
केळ्यात बी-६ नावाचे जीवनसत्व असते. या जीवनसत्वामुळे मूत्र खड्यांच्या निर्मितीला
आळा बसतो, तसेच किडनीस्टोन झालेल्यांना केळ्याच्या सेवनाने आराम पडतो. त्याचप्रमाणे
कृश शरीरयष्टीच्या लोकांनी केळे खाल्ल्यास वजन वाढण्यास लाभ होतो.
भाजणीच्या चकल्या
भाजणीच्या चकल्या
भाजणीचे साहित्य : १ किलोग्रॅम
तांदूळ, १/२ किलो चणा दाळ, १/४ किलो
उडीद दाळ, अर्धा पाव मूग दाळ, एक मूठ
धने, दोन चमचे जिरे, एक मूठ साबूदाणे.
कृती : एका कढईत वरील सर्व
साहित्य एक एक करून गुलाबी रंग येईपर्यंत
खरपूस भाजून घ्या. नंतर सर्व साहित्य एकत्र
दळून घ्या. जितया कणकेच्या चकल्या
करावयाच्या असतील तितकी कणिक एका
कढईत घ्या. त्यात तेलाचे मोहन, चवीप्रमाणे
तिखट, मीठ, ओवा, जिरे, चिमूटभर खाण्याचा
सोडा दोन चमचे लोणी टाकून हे कणिक जास्त
सैलही नाही व घट्टही नाही असे मळून घ्या.
चकल्याचा साचा घेवून त्याला आतून तेल
लावून वरील भजलेली थोडी थोडी कणिक
घेऊन चकल्या पाडून घ्या. एका कढईत तेल
तापवून तयार केलेल्या चकल्या लालसर रंग
होईपर्यंत तळून घ्या.
चेहरा उजळण्यासाठी
* ग्लिसरीन, गुलाबपाणी व लिंबाचा
रस समप्रमाणात मिसळून चेहर्यावर लावल्यास
चेहरा उजळतो.
* १ मोठा चमचा टोमॅटोचा रस, १
मोठा चमचा काकडीचा रस, १ मोठा चमचा
कोंड्यासकट गव्हाचे पीठ आणि ४-५ थेंब
लिंबाचा रस घेऊन कच्च्या दुधात मिसळा.
चेहरा, मानेला लावा. २० मिनिटांनंतर धुवून
टाका.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.
दैनिक पंचांग मंगळवार, दि. ९ एप्रिल २०२४
गुढीपाडवा, अभ्यंगस्नान, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर, चैत्र शुलपक्ष, रेवती
०७|३२, अश्विनी २९|०६ सूर्योदय ०६ वा. २४ मि. सूर्यास्त ०६
वा. २८ मि.
राशिभविष्य
मेष : आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. शब्दाने शब्द वाढवू नका. आर्थिक स्थितीत सुधारणा. स्वजनांशी भेट
घडेल. विषयावर वाद संभव आहे. भाजणे, कापण अशा गोष्टी होण्याची शयता.
वृषभ : गुंतवणूक विचारपूर्वक करा. मित्रांबरोबर वेळ जाईल. नवे संबंध बनतील. मिळकतीतून लाभ प्राप्ति योग. सामाजिक
कामात सक्रिय भागीदारी. तब्बेत सांभाळा. आर्थिक लाभ.
मिथुन : दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल. धनलाभ होईल. मुले व पत्नी यांच्या सहवासामुळे आरोग्य उत्तम राहिल. दिवस धावपळीचा असेल. वाहने व उपकरणे जपून वापरावीत.
कर्क : विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन. घरात मंगल कार्याचा योग. आर्थिक क्षेत्रात संयमाने वागा. मागील उधारी उसनवारी वसुल होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. लांबलेल्या प्रकरणात यश. कार्यक्षेत्राचा विकास आणि विस्तार होईल.
सिंह : आहारावर विशेष लक्ष द्या. भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. खाण्या
पिण्यावर नियंत्रण ठेवा. कामात यश सुनिश्चित. सजावटीच्या वस्तु खरेदी कराल. चांगल्या घटना घडतील.
कन्या : आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल. तुमच्या सार्मथ्यात वाढ. आवास संबंधी समस्या सुटतील. व्यापार क्षेत्रात लाभ. आई-वडीलांचा व वडीलधार्यांचा सन्मान करा.
तूळ : आय-व्ययमध्ये संतुलन राहील. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा. आनंदाची बातमी कळेल. पुष्कळ दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. धर्म, आध्यात्मात रूचि वाढेल. अनुकूलतेमुळे मन प्रसन्न राहील. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल.
वृश्चिक : आळस करू नये, कामे वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी बातमी कळेल. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो. शासकीय स्त्रोतांकडून धन प्राप्तीचा योग. आर्थिक प्रकरणात विशेष अनुसंधान योग. आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण होतील.
धनु : निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. घरात मंगल कार्य होतील. अधिकारांचा योग्य वापर करा. स्पर्धा, पैजा जिंकू शकाल. लाभ होईल.
मकर : आध्यात्मा संबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग. कौटुंबिक सुख लाभेल. भाग्यवर्धक यश. कर्मक्षेत्रात गूढ अनुसंधाना संबंधी विशेष योग. कोर्ट-कचेर्या यांपासून लांब रहा. वादंग होण्याची शयता असल्यामुळे शांत राहावे.
कुंभ : जोडीदारा बरोबर तणाव ठेऊ नका. मतभेदांपासून लांब रहा. व्यापार चांगला होत राहील. विवाह योग, घरात शुभ मांगलिक कार्ये. मित्रांचा सहयोग मिळेल. व्यापारिक भागीदारीसाठी उत्तम वेळ. आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली असते.
मीन : अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल. मनावरील दडपण दूर. अनुसंधानातून कार्यक्षेत्रात प्राप्ति योग. आनंदी वातावरण राहील. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव. मागील उधारी उसनवारी वसुल होईल.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर
अपघात का होतात?
अपघात का होतात?
दुसर्यांनी अपघात केला की ‘फार जोरात
गाडी चालवतो’, ‘लक्षच नसतं समोर’, ‘ओव्हरटेक
करत असेल’, ‘तिघांना घेऊन लूना चालवावीच
कशाला?’ ‘लायसेन्स कसे काय मिळाले कोणाला
माहीत’ असे अनेक उद्गार ऐकायला मिळतात.
दुसरीकडे ‘रस्त्यावर चिखल होता’, ‘स्पीड ब्रेकर
आहे, पण त्याबद्दल सूचनाच नाही’, ‘केवढे खड्डे
आहेत रस्त्यावर’, ‘बाजूला चालणारा माणूस
एकदम मध्ये आला’ यातील एखादे स्पष्टीकरण दिले
जात असते. यावरून अपघात का होतात, याचा
थोडा अंदाज आपल्याला येतो. गाडी चालवणारा,
वाहने व रस्ते या तिन्हींमुळे अपघात होऊ शकतात.
खूप वेगात गाडी चालवणे, ओव्हरटेक करणे, खूप
ताणतणाव, अतिश्रम, जागरण, मद्यपान व इतर
व्यसने, गाडीचे ब्रेक नीट नसणे, गाडीची देखभाल
व्यवस्थित न करणे, तांत्रिक अडचणी निर्माण होणे,
रस्ता खराब असणे, पुरेसा उजेड नसणे, हवामान
चांगले नसणे, खूप पाऊस, वावटळ, रस्त्यावर खड्डे
असणे, स्पीड ब्रेकर अयोग्य जागी असणे, रस्त्यावर
प्राणी असणे, एकाच रस्त्यावर पादचारी, हातगाड्या,
बैलगाड्या, ट्राम, बस, ट्रक अशी सर्वच प्रकारची
वाहतूक असणे; अशा अनेक कारणांमुळे अपघात
होतात. मद्यपान हे अपघातामागील महत्त्वाचे कारण
आहे. रस्त्यावरील अपघातांपैकी ३० ते ५०%
अपघातांचे कारण मद्यपान हेच असते. काही
जणांमध्ये अपघात होण्याची शयता इतरांहून
जास्त असते. धांदरटपणा, वेगाची आवड व दुसर्या
वाहनाला पुढे जाऊ न देण्याची वृत्ती; यामुळंही
अपघात होतात.
भारतात दरवर्षी ६०,००० लोक रस्त्यावर
होणार्या अपघातात मरण पावतात.
“टाळता येत नाही तो अपघात” वा
“देवाच्या इच्छेपुढे कोणाचे काय चालणार” अशा
विचारांमुळे ‘अपघात टाळता येतात’ या सत्याकडे
अक्षम्य दुर्लक्ष होऊ शकते. उपरोक्त सर्व कारणांबाबत
योग्य ती काळजी घेतल्यास अपघातांचे प्रमाण
बरेचसे कमी करता येईल. योग्य ती काळजी घेऊन
काम केल्यास घरगुती अपघात व उद्योगधंद्याच्या
ठिकाणातील अपघातही कमी करता येतील.
रोज मनुका खाण्याचे फायदे
रोज मनुका खाण्याचे फायदे
मनुका खाल्ल्याने ब्लड सर्कुलेशन इम्प्रुव्ह होते. यामुळे त्वचेची रंगत वाढते आणि रंग
देखील निखरण्यास मदत होते. मनुकांमध्ये फायबर्स असतात. हे डायजेशन योग्य ठेवण्यास
मदत करतात. यात पोटॅशियमची मात्रा जास्त असते. मनुका हार्ट अॅमटॅकच्या आजारांमध्ये
इफेटिव आहे. यात आयरन असते. हे अॅनीमिया (रक्ताची कमतरता) दूर करण्यास फायदेशीर
ठरतात.







