दैनिक पंचांग मंगळवार, दि. ९ एप्रिल २०२४

0
28

गुढीपाडवा, अभ्यंगस्नान, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर, चैत्र शुलपक्ष, रेवती
०७|३२, अश्विनी २९|०६ सूर्योदय ०६ वा. २४ मि. सूर्यास्त ०६
वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष : आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. शब्दाने शब्द वाढवू नका. आर्थिक स्थितीत सुधारणा. स्वजनांशी भेट
घडेल. विषयावर वाद संभव आहे. भाजणे, कापण अशा गोष्टी होण्याची शयता.

वृषभ : गुंतवणूक विचारपूर्वक करा. मित्रांबरोबर वेळ जाईल. नवे संबंध बनतील. मिळकतीतून लाभ प्राप्ति योग. सामाजिक
कामात सक्रिय भागीदारी. तब्बेत सांभाळा. आर्थिक लाभ.

मिथुन : दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल. धनलाभ होईल. मुले व पत्नी यांच्या सहवासामुळे आरोग्य उत्तम राहिल. दिवस धावपळीचा असेल. वाहने व उपकरणे जपून वापरावीत.

कर्क : विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन. घरात मंगल कार्याचा योग. आर्थिक क्षेत्रात संयमाने वागा. मागील उधारी उसनवारी वसुल होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. लांबलेल्या प्रकरणात यश. कार्यक्षेत्राचा विकास आणि विस्तार होईल.

सिंह : आहारावर विशेष लक्ष द्या. भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. खाण्या
पिण्यावर नियंत्रण ठेवा. कामात यश सुनिश्चित. सजावटीच्या वस्तु खरेदी कराल. चांगल्या घटना घडतील.

कन्या : आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल. तुमच्या सार्मथ्यात वाढ. आवास संबंधी समस्या सुटतील. व्यापार क्षेत्रात लाभ. आई-वडीलांचा व वडीलधार्‍यांचा सन्मान करा.

तूळ : आय-व्ययमध्ये संतुलन राहील. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा. आनंदाची बातमी कळेल. पुष्कळ दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. धर्म, आध्यात्मात रूचि वाढेल. अनुकूलतेमुळे मन प्रसन्न राहील. सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल.

वृश्चिक : आळस करू नये, कामे वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी बातमी कळेल. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो. शासकीय स्त्रोतांकडून धन प्राप्तीचा योग. आर्थिक प्रकरणात विशेष अनुसंधान योग. आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण होतील.

धनु : निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील. घरात मंगल कार्य होतील. अधिकारांचा योग्य वापर करा. स्पर्धा, पैजा जिंकू शकाल. लाभ होईल.

मकर : आध्यात्मा संबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग. कौटुंबिक सुख लाभेल. भाग्यवर्धक यश. कर्मक्षेत्रात गूढ अनुसंधाना संबंधी विशेष योग. कोर्ट-कचेर्‍या यांपासून लांब रहा. वादंग होण्याची शयता असल्यामुळे शांत राहावे.

कुंभ : जोडीदारा बरोबर तणाव ठेऊ नका. मतभेदांपासून लांब रहा. व्यापार चांगला होत राहील. विवाह योग, घरात शुभ मांगलिक कार्ये. मित्रांचा सहयोग मिळेल. व्यापारिक भागीदारीसाठी उत्तम वेळ. आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली असते.

मीन : अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल. मनावरील दडपण दूर. अनुसंधानातून कार्यक्षेत्रात प्राप्ति योग. आनंदी वातावरण राहील. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव. मागील उधारी उसनवारी वसुल होईल.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर