पाककला

0
24

भाजणीच्या चकल्या

भाजणीचे साहित्य : १ किलोग्रॅम
तांदूळ, १/२ किलो चणा दाळ, १/४ किलो
उडीद दाळ, अर्धा पाव मूग दाळ, एक मूठ
धने, दोन चमचे जिरे, एक मूठ साबूदाणे.
कृती : एका कढईत वरील सर्व
साहित्य एक एक करून गुलाबी रंग येईपर्यंत
खरपूस भाजून घ्या. नंतर सर्व साहित्य एकत्र
दळून घ्या. जितया कणकेच्या चकल्या
करावयाच्या असतील तितकी कणिक एका
कढईत घ्या. त्यात तेलाचे मोहन, चवीप्रमाणे
तिखट, मीठ, ओवा, जिरे, चिमूटभर खाण्याचा
सोडा दोन चमचे लोणी टाकून हे कणिक जास्त
सैलही नाही व घट्टही नाही असे मळून घ्या.
चकल्याचा साचा घेवून त्याला आतून तेल
लावून वरील भजलेली थोडी थोडी कणिक
घेऊन चकल्या पाडून घ्या. एका कढईत तेल
तापवून तयार केलेल्या चकल्या लालसर रंग
होईपर्यंत तळून घ्या.