काही जण रंगाने गोरे, तर काही जण काळे का असतात?

काही जण रंगाने गोरे, तर काही जण काळे का असतात?

माणसाच्या रंगावर काही अवलंबून नसते. हे खरे असले, तरी काळ्या रंगाच्या लोकांना गोर्‍या व्यक्ती सुंदर वाटत असतात; तर गोर्‍या व्यक्तींना काळे लोक तरतरीत, स्मार्ट वाटत असतात. एकूण काय स्वतःजवळ जे आहे, त्यापेक्षा दुसर्‍याकडचे जास्त आवडणे हा माणसाचा स्वभाव आहे. पण काहीजण गोरे का असतात आणि काही जण काळे का असतात, हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. विशेषतः एकाच आईच्या पोटी जन्म घेणार्‍या दोन मुलांचे रंगही वेगळे असतात, हे तुम्ही पाहिलेच असेल. असे का? ते आता समजून घेऊ. त्वचेची रचना दोन थरांमध्ये असते. यातला वरचा किंवा बाहेरचा थर (बाह्यत्वचा) पेशींच्या पाच थरांनी बनलेला असतो. यापैकी सर्वात खालच्या पेशीथरातून पेशी सतत निर्माण होत असतात व त्या हळूहळू वर सरकतात. या बाह्यत्वचेमध्ये रक्तपुरवठा किंवा मज्जातंतू नसतात. पोषण आणि संवेदना या दोन्हींसाठी त्याला खालच्या थरावर अवलंबून राहावे लागते. बाह्यत्वचेच्या पेशीथरांमध्ये मेलॅनीन नावाचे रंगद्रव्य असते. मेलॅनोसाईट नावाच्या पेशीपासून संप्रेरकाच्या नियंत्रणाखाली या द्रव्याची निर्मिती होत असते. मेलॅनिनचे प्रमाण हे आनुवंशिकता, वातावरण, स्त्री-पुरुष भेद, वय इ. विविध गोष्टींवर अवलंबून असते. आणि या रंगद्रव्याच्या प्रमाणावरूनच त्वचेचा काळे-गोरेपणा ठरतो. त्यामुळे निग्रोंची मुले सामान्यतः काळ्या रंगाची असतात. उन्हात काम करणारे लोक काळवंडतात, तर शरीराच्या ज्या भागाला ऊन लागत नाही तो भाग इतर भागांपेक्षा उजळ दिसतो. लहान मुले वयस्करांपेक्षा जास्त गोरी दिसतात. “आमचा राहुल लहानपणी फारच गोरापान होता हो, आताच काळवंडलाय…” असं तुमची आई म्हणते ते खरेच असते! अर्थात त्वचेचा रंग मुख्यत्वे मेलॅनीनमुळे ठरत असला, तरीही इतर दोन रंगद्रव्येही यासाठी महत्त्वाची असतात. एक म्हणजे त्वचेखालच्या चरबीतले पिवळे द्रव्य- कॅरोटीन आणि दुसरे म्हणजे त्वचेच्या रक्तप्रवाहातील हिमोग्लोबीन हे रक्तद्रव्य. यावरून तुमच्या लक्षात आले असेल की, आपला रंग मेलॅनीन, कॅरोटीन व हिमोग्लोबीन या तीन द्रव्यांवरून ठरतो.

सुविचार

कर्तृत्वाला कल्पकतेची जोड मिळाली म्हणजे अद्भुत कार्ये घडतात. : डॉ. हेडगेवार

अनारसे (साखरेचे)

अनारसे (साखरेचे)

साहित्य : तांदूळ, साखर, तूप,
खसखस.
कृती : तांदूळ तीन दिवस पाण्यात
भिजवून ठेवा. नंतर चाळणीत काढून घ्या
व कापडावर वाळत घाला. अगदी ओलसर
किंवा खूप जास्त कोरडेही करू नका. नंतर
मिसरमध्ये बारीक करून घ्या. मैद्याच्या
चाळणीने पीठ चाळून घ्या. जेवढे तांदूळ
असतील तेवढी पीठी साखर पिठात मिसळवून
घ्या. एक वाटी पिठाला दोन चमचे तूप
याप्रमाणे तूप घालावे. सर्व पीठ कालवून गोळे
करून स्टीलच्या डब्यात भरून ठेवा. ३-४
दिवसांनी अनारशांचे पीठ तयार होते. अनारसे
करायच्या वेळी थोडे पीठ ताटात काढून घ्या.
त्यात १/४ साईचे दही गालून पीठ मळा.
नंतर या पीठाचा पेढ्याएवढा गोळा घेवून
खसखशीवर थापून घ्या. नंतर हा अनारसा
मंद आचेवर तळून घ्या.

वास्तू

मुलांची बेडरुम व शैक्षणिक यश
* मुलांची स्टडी किंवा बेडरूममध्ये पूर्वे
कडे ‘मनिप्लँट’ लावावा. शिक्षणात हमखास
यश मिळते.
* मुख्य दरवाजानुसार विजेचा किंवा
सिमेंटचा खांब असणेही अशुभ आहे.
* मुख्य दरवाजासमोर तुळस लावावी.
* मुख्य दरवाजासमोर दररोज
स्वस्तिकची रांगोळी काढावी.

विंचू डसल्यास

 

विंचू डसल्यास डसलेल्या जागी अत्तर
लावा. मध, तूप व चुना समप्रमाणात एकत्र
मिसळून लावल्यास विष उतरेल.

बोटांवरील सांधे काळे पडले असतील, तर

बोटांवरील सांधे काळे पडले असतील,
तर त्यावर लिंबाच्या फोडीवर मीठ लावून
चोळावे असे नियमित केल्यास काळेपणा
नाहीसा होतो.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

शिक्षिका : जो माझ्या प्रश्नाचे लवकर उत्तर देईल
त्याला आज माझ्याकडून सुट्टी मिळेल..!
गण्याने लगेच आपली बॅग वर्गाबाहेर फेकली
शिक्षिका : ती बॅग कोणी फेकली?
गण्या : मी, आता घरी जाऊ का?

दैनिक पंचांग गुरुवार, दि. ११ एप्रिल २०२४

गौरी तृतीया, शके १९४६ क्रोधीनाम
संवत्सर, चैत्र शुलपक्ष, कृत्तिका २५|३८
सूर्योदय ०६ वा. २४ मि. सूर्यास्त ०६
वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष : नवीन कामे, योजना लाभदायक ठरतील. अडकलेली कामे आपल्या प्रयत्नांमुळे पूर्ण होतील. रोख रकमेची मोठी देवघेव टाळा. कलाक्षेत्रातील लोकांना अनुकूल परिस्थिती मिळेल.

वृषभ : महत्त्वाच्या कामांमध्ये आपणास घऱच्यांचा पाठींबा मिळेल. आपण ठरावीक वेळेत काम पूर्ण कराल. भावनेच्या भरात वाहून नुकसान होण्याची शयता आहे.

मिथुन : अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधीच्या कामात स्थिती अनुकूल राहील. शत्रू पराभूत होतील.

कर्क : आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील.

सिंह : मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल बातम्या कळतील. नोकरदार व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे.

कन्या : पत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. सामाजिक कार्य काळजीपूर्वक करा.

तूळ : प्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. महत्त्वाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील.

वृश्चिक : आरोग्याची काळजी घ्या. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. पैश्यासंबंधी वाद सोडविण्यासाठी भाग्यवर्धक यश प्राप्ति योग. आकस्मिक लाभ. अडकलेली कामे पूर्ण होतील.

धनु : शेअर्समध्ये गुंतवणुक करु नका. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. आर्थिक क्षेत्रात अनुसंधान संबंधी योग. वडीलोपार्जीत मालमत्तेचे व्यवहार पूर्ण होतील.

मकर : अपेक्षित व्यक्तींचे सहकार्य मिळेल. नोकरदारांना अनुकूल वातावरण मिळेल. राजकारणी व्यक्तींना उद्देशात यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. मानसन्मानात वाढ होईल. घरासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल.

कुंभ : महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. शत्रू पराजित होईल. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहाणार नाही. विरोधक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. सुखद वातावरण राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. वादांपासून लांब रहा. मुलांकडून सुखद बातमी कळेल. ईच्छा नसतानाही लांबचा प्रवास करावा लागेल.

मीन : निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. एखाद्या गोष्टीवर डोळे मिटून विश्वास करू नये. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींची काळजी घ्या. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना मनाची एकाग्रता साधता येईल. आध्यात्मिक चेतना मिळेल.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

प्लेग कशामुळे होतो?

प्लेग कशामुळे होतो?
काही वर्षांपूर्वी प्लेगने भारतात हाहाःकार
उडवून दिला होता. सूरत, बीड, दिल्ली अशा शहरात
प्लेगचे खूप रोगी सापडले. काही मृत्युमुखीही पडले.
प्लेग हा काही शतकापूर्वी अत्यंत भयंकर असा
रोग मानला जायचा. सहाव्या शतकात जगात या
रोगाने १० कोटी बळी घेतले, तर १२४६ ते १६४५
पर्यंत २.५ कोटी बळी घेतले. १८९८ ते १९०८
या काळात भारतात प्लेगने दरवर्षी ५ लाखांच्यावर
लोक मृत्युमुखी पडत होते. नंतर हे प्रमाण खूप कमी
झाले. १९६६ नंतर तर १९९४ पर्यंत प्लेगचा एकही
रुग्ण भारतात आढळला नाही. सप्टेंबर १९९४
पासून मात्र ५००० हून जास्त रुग्ण सापडले.
यर्सिनीला पेस्टीज नावाच्या जिवाणूमुळे प्लेग
हा रोग होतो. प्लेग हा सामान्यपणे जंगली
उंदीर व तत्सम प्राण्यांपासून होणारा रोग आहे.
असे उंदीर भूकंप, पूर, युद्ध अशा आपत्तींच्या
काळात समाजजीवनाची घडी बिघडल्याने, वस्त्या
ओस पडल्याने गावांमध्ये येतात. त्यामुळे त्यांचा
व घरातील उंदरांचा संपर्क येतो व तेथील
घरात राहणार्‍या उंदरांमध्ये हा रोग पसरतो. या
रोगाचा प्रसार उंदरांमध्ये व उंदरांपासून माणसांमध्ये
पिसवांमुळे होतो. घाण असलेल्या जागी उंदराचे
वास्तव्य असते. त्यांच्या शरीरावर पिसवा असतात.
या पिसवा प्लेग रोग असलेल्या उंदराला चावून,
नंतर निरोगी माणसाला चावतात. त्यामुळे निरोगी
माणसाला प्लेग होतो. प्लेग होण्याचे मुख्य कारण हे
अस्वच्छता वा कमी दर्जाचे राहणीमान यात सापडते.
प्लेगचे गाठींचा प्लेग (ब्युबोनिक), फुफ्फुसाचा प्लेग
(न्यामोनिक) व रक्तातील प्लेग (सेप्टीसेमीक) असे
तीन प्रकार आहेत. पूर्वी प्लेगवर परिणामकारक
औषधे उपलब्ध नव्हती. त्यामुळे खूप लोक बळी
पडत. आज मात्र सेप्ट्रान, टेट्रासायलीन अशी
अनेक प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. प्रतिबंधक
लसही उपलब्ध आहे. त्यामुळे प्लेगला घाबरण्याचे
मुळीच कारण नाही. आजच्या काळात तो एक
सहजगत्या बरा होणारा रोग आहे. फक्त त्याचे निदान
लवकर व्हायला हवे. आपले घर-परिसर स्वच्छ
राखला, उंदरांचा नायनाट केला; तर प्लेगची भीती
बाळगण्याचे काहीच कारण उरणार नाही.

सुविचार

अत्यंत पराक्रमी मनुष्य अत्यंत क्षमाशील आणि भांडणापासून दूर राहणारा असतो. : थॅकरे