कर्करोग म्हणजे काय?

कर्करोग म्हणजे काय?

‘कर्करोग’ हा शब्द ऐकताच रुग्णाची पाचावर धारण बसते. इतकी भयंकर स्थिती असण्याचे कारण काय? कर्करोग झालेला माणूस जास्त दिवस जिवंत राहत नाही हेच या भीतीचे कारण असते. या कर्करोगाला इतके घाबरायची खरंच गरज आहे का, ते आता पाहू. सामान्यपणे कर्करोग हा वयस्कर व्यक्तींचा रोग आहे. आपल्या देशात दर हजार लोकसंख्येत एक व्यक्ती कर्करोगग्रस्त आहे. म्हणजेच प्रत्येक खेडेगावात एकतरी रुग्ण सापडेलच. पुरुषामध्ये जीभ, तोंड, घसा, स्वरयंत्र, अन्ननलिका व जठर, प्रोस्टेट ग्रंथी, गुदाशय व मोठे आतडे, श्वसनसंस्था व फुफ्फुसे तसेच यकृत या भागाचे कर्करोग प्रामुख्याने होतात. स्त्रियांमध्ये गर्भाशयाचे तोंड, स्तन, अन्ननलिका व जठर, स्त्रीबीजांड, तोंडाचा अंतर्भाग, जीभ, गुदाशय, तसेच फुफ्फुसे व श्वसनसंस्था यांचे कर्करोग होतात. भारतातील कर्करोगाच्या एकूण रुग्णांपैकी ५०% रुग्ण तोंडाचा अंतर्भाग, घसा व गर्भाशयाचे तोंड या भागांशी संबंधित असतात. शरीरातील पेशींची संख्या नेहमी वाढत असते, पण त्यावर नियंत्रण असते. त्यामुळे त्या वाढीचे दुष्परिणाम होत नाहीत. तसेच जठरात फुफ्फुसाच्या पेशी वाढत नाहीत, तर यकृतात हाडांच्या पेशी वाढत नाहीत. कर्करोगात पेशींची अनियंत्रित अशी वाढ होते व लिंफ वाहिनीतून वा रक्तवाहिनीतून या पेशी इतर इंद्रियापर्यंत पोहोचून तेथे रुजतात व वाढायला लागतात. वाढ खूप झाल्यास इंद्रियाभोवतीच्या रक्तवाहिन्या, दुसरे अवयव यांच्यावरही त्या आक्रमण करतात व त्यांना हानी पोहोचते. कर्करोग होण्याची अनेक कारणे आहेत. काही रासायनिक पदार्थाशी संबंध येणे, किरणोत्सर्गी पदार्थांशी संबंध येणे, एखाद्या जागी सतत घर्षण होणे, काही विषाणूंचा संसर्ग होणे, आनुवंशिकता व व्यसने ही कर्करोगाची प्रमुख कारणे होत. कर्करोग झाला आहे, हे ओळखण्यासाठी काही लक्षणे उपयुक्त ठरतात. यात वजन अचानक खूप कमी होणे, भूक न लागणे, शरीरात कोठेही अचानक गाठ येणे वा न बरा होणार व्रण तयार होणे, उतारवयात मासिक पाळी थांबल्यानंतर सवयीत बदल होणे तसेच लघवी, शौचमार्ग व नाक, तोंड, कान यांतून अचानक रक्तस्राव होणे इत्यादींचा समावेश होतो. कर्करोगाचे निदान लवकर झाल्यास रुग्ण वाचू शकतो. मुख्य म्हणजे त्याचे आयुष्य वाढते. कर्करोग असेल म्हणून घाबरून काही लोक डॉटरांना दाखवतच नाहीत. हे बरोबर नाही. काही कर्करोग शस्त्रक्रियेने, तर काही किरणोपचाराने व औषधांनी बरे होतात. निदान व्यक्तीचा मृत्यू टाळता येतो व त्याचे आयुष्य वाढवता येते. फक्त निदान लवकर व्हायला हवे.

सुविचार

कर्तृत्वाने कल्पकतेची जोड मिळाली म्हणजे अद्‌भुत कार्ये घडतात.

मिक्स धान्यांच्या चकल्या

मिस धान्यांच्या चकल्या

साहित्य : हरभरे, तांदूळ, ज्वारी,
बाजरी, मूग, मटकी, चवळी, मसूर, वाल,
तूरडाळ, धने, तीळ, ओवा, तिखट, मीठ,
काळा मसाला, तेल.
कृती : वर दिलेले सर्व धान्ये प्रत्येकी
एक वाटी घ्यावेत. सर्व धान्ये भाजून घ्यावीत
व एकत्र करून दळावीत. नंतर त्या पिठात एक
वाटी तेल तापवून घालावे व ऐक वाटी तीळ,
एक वाटी तिखट, हळद व चवीप्रमाणे मीठ व
काळा मसाला व थोडा ओवाही घालावा. नंतर
त्या पिठात दोन-तीन वाट्या उकळते पाणी
घालावे. नंतर ते पीठ गार पाण्यात भिजवून
चांगले मळून त्याच्या चकल्या पाडून खरपूस
तळून काढाव्यात.

शैक्षणिक यशासाठी

शैक्षणिक यशासाठी
बटाट्याच्या भाजीत रस्सा जास्त झाला
असेल तर ती भाजी अधिक घट्ट बनवण्यासाठी
त्यात उकडलेला बटाटा कुस्करुन टाका व
वरुन थोडेसे मीठ मिसळा. चवीसाठी चाट
मसालाही मिसळू शकता.
* दारे-खिडया फुगल्याने व्यवस्थित
लागत नसल्यास त्यांच्या कडांवर मेण
घासावे.

वास्तू

मुलांची स्टडी किंवा बेडरूममध्ये पूर्वे
कडे ‘मनिप्लँट’ लावावा. शिक्षणात हमखास
यश मिळते.

चेहर्‍यावरील काळवंडलेपणा

मुलतानी मातीत थोडासा पुदिन्याचा
रस मिसळून लावल्यास चेहर्‍यावरील
काळवंडलेपणा नाहीसा होतो.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

हसा आणि शतायुषी व्हा!

‘गुरुजी फळ्यावर लिहितात ते मला अजिबात दिसत नाही!’
राजूनं आपलं गार्‍हाणं सांगायला सुरुवात केली. अनेकदा
त्याने सांगितल्यावर वडील त्याला डॉटरकडे घेऊन गेले.
डॉटरांनी डोळे तपासले. काहीच दोष आढळला नाही. तेव्हा
डॉटरांनी विचारलं,
‘बाळ, तुला का बरं फळ्यावरचं दिसत नाही?’
माझ्या समोरच्या बाकावर एक उंच मुलगा बसतो!

अ‍ॅसिडीटी टाळण्यासाठी

अ‍ॅसिडीटी टाळण्यासाठी

 


मानसिक ताण, काळजी यांमुळे अ‍ॅसिडीटी वाढते, त्याकरिता या गोष्टींवर नियंत्रण मि
ळवण्यासाठी मेडिटेशन, रिलॅसेशन टेनिस करावे. जागरण टाळावे. किमान साडेसहा ते सात
तास झोप घेणे आवश्यक असते. डॉटरांच्या सल्ल्याशिवाय एस्पिरीन, सांधेदुखीची औषधे,
पेनकिलर्स परस्पर घेऊ नयेत. घाईगडबडीने जेवल्याने अपचन, अ‍ॅसिडीटी असे त्रास होतात.

दैनिक पंचांग शुक्रवार, दि. १२ एप्रिल २०२४

विनायक चतुर्थी, शके १९४६ क्रोधीनाम
संवत्सर, चैत्र शुलपक्ष, रोहिणी २४|५१
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६
वा. २९ मि.

राशिभविष्य

मेष : अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. आपल्या उतावीळ स्वभावावर नियंत्रण ठेवा. अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील.

वृषभ : कौटुंबिक जीवन आपल्यासाठी आनंद आणेल, पण खाण्या-पिण्याच्या बाबतीत काळजी घ्या. आरोग्य नरम-गरम राहील. आपल्या उतावीळ स्वभावावर नियंत्रण ठेवा. घरात किंवा कुटुंबात शुभप्रसंग घडतील.

मिथुन : नवीन कामे, योजनांच्या बाबतीत स्थिती लाभदायक राहील. घरात किंवा कुटुंबात शुभप्रसंग घडतील. कौटुंबिक जीवन आपल्यासाठी आनंद आणेल, पण खाण्या-पिण्याच्या बाबतीत काळजी घ्या. आरोग्य नरम-गरम राहील.

कर्क : शत्रू पराभूत होतील. दृष्टीकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल. आपली कामे धाडसाने करा. मागील उधारी उसनवारी वसुल होईल. नवीन कामे, योजनांच्या बाबतीत स्थिती लाभदायक राहील. मागील उधारीय्उसनवारी वसुल होईल.

सिंह : मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक वाद-विवाद टाळा. शत्रू पराभूत होतील. दृष्टीकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल. मआरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक वाद-विवाद टाळा. दैनंदिन कामात सातत्य राहणार नाही. अस्वस्थता जाणवेल.

कन्या : व्यापार-व्यवसायात जोखमीचे काम टाळा. नोकरदार कामात व्यस्त राहातील. आरोग्य नरम-गरम राहील. आपली कामे धाडसाने करा. उधारी वसुल होईल.

तूळ : व्यापारात वेळ मध्यम राहील. कामात काही विघ्न येऊ शकतात. अधिक जोखमीचे कार्ये टाळा. बाहेरचे खाणे शयतो
टाळावे. व्यापार-व्यवसायात जोखमीचे काम टाळा. नोकरदार कामात व्यस्त राहातील. आरोग्य नरम-गरम राहील. मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल.

वृश्चिक : अधिकार्‍यांपासून दूर राहा. धार्मिक कार्यांमध्ये खर्च होण्याची शयता आहे. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने महत्त्वाची
कार्य पूर्ण होतील. व्यापारात वेळ मध्यम राहील. कामात काही विघ्न येऊ शकतात. आर्थिक विषयांमध्ये सावध रहा. कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल.

धनु : राजकीय व्यक्तींना काळ अनुकूल आहे. कौटुंबिक सुख वाढेल. आर्थिक विषयांमध्ये सावध रहा. कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. अधिक जोखमीचे कार्ये टाळा. बाहेरचे खाणे शयतो टाळावे. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने महत्त्वाची कार्य पूर्ण होतील.

मकर : मागील उधारी-उसनवारी वसुल होईल. दैनंदिन कामात सातत्य राहणार नाही. अस्वस्थता जाणवेल. अधिकार्‍यांपासून दूर राहा. धार्मिक कार्यांमध्ये खर्च होण्याची शयता आहे. जुने मित्र -मैत्रिणी भेटतील. आनंदाची बातमी मिळेल.

कुंभ : व्यापार-व्यवसायात वातावरण अनुकूल मिळेल. मिळकतीपेक्षा अधिक खर्च होईल. आपले काम धाडसाने करा. यंत्रे व उपकरणे जपून हाताळावीत. यंत्रे व उपकरणे जपून हाताळावीत. नुकसान होण्याचा संभव आहे.

मीन : पैशासंबंधी येणार्‍या व अडचणी दूर होतील. आनंदाची बातमी मिळेल. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. नुकसान होण्याचा संभव आहे. राजकीय व्यक्तींना काळ अनुकूल आहे. कौटुंबिक सुख वाढेल.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

गोड पदार्थांवर नियंत्रण हवे

गोड पदार्थांवर नियंत्रण हवे
अतिरेकी प्रमाणात चहा, कॉफी नको. त्याऐवजी सुप्स, हर्बल टी, डाळ सूप, काढा
घ्या. पाणी भरपूर प्या. साधं पाणी प्यायलं जात नसेल तर गरम पाणी प्या. तेल, तुपाचा वापर
मर्यादेतच करा. गोड पदार्थांचा अतिरेक नको. ते पदार्थ पचण्यासाठी खूप वेळ आणि कार्यशक्ती
खर्च होईल. शरीराचं तापमान कमी होईल.