कॉर्न फ्लॉवर वड्या

कॉर्न फ्लॉवर वड्या

साहित्य : ३ वाट्या ओले खोबरे, १
कप दूध, १ कप दूध, १ वाटी कॉर्नफ्लॉवर,
तिन्ही मिळून जेवढे होईल तेवढी साखर,
४-५ वेलदोड्यांची पूड, केशरी रंग, काजू व
अक्रोडचे काप.
कृती : ओले खोबरे एका बाऊलमध्ये
घ्यावे. त्यावर गरम दूध ओतून तासभर
बाजूला ठेवावे. नंतर नारळाचे दूध काढून
घ्यावे. दूधात कॉर्नफ्लोअर, साखर, थोडा
लाल रंग व वेलदोड्यांची पूड घालून मिश्रण
सारखे करावे. त्यात दूधात भिजवलेला नारळ
खव घालावा. गॅसवर ठेवून ढवळावे. सतत
हलवत राहावे. घट्टसर झाले की, उतरवावे व
तूप लावलेल्या थाळीत ओतावे. वरून काजू व
अक्रोडचे काप पसरवून हलया हाताने थापून
ठेवावे. गार झाल्यावर वड्या पाडाव्यात.

वास्तू

वास्तुपुरुषासाठी नैवेद्य
* रोज जेवणापूर्वी वास्तू पुरुषासाठी
वेगळा नैवेद्य आठवणीने दाखवावा.
* घरात जास्तीत जास्त शांतता
ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच घर आणि
घराचा परिसर स्वच्छ व नीटनेटका ठेवावा.
* रोज घरात रामरक्षा आणि हनुमान
स्तोत्र मोठ्याने म्हणावे.

मुलांची रोगप्रतिकारकशक्ती वाढावी यासाठी

मुलांची रोगप्रतिकारकशक्ती वाढावी
यासाठी तुळशीची पाने ५ ते १० रोज स्वच्छ
धुवून खाण्यास द्यावी.

केसांसाठी अ‍ॅलोव्हेरा जेल

आवळा, रिठा व शिकेकाईची पेस्ट
बनवून केसांना लावा व नंतर धुवा-अ‍ॅलोव्हेरा
जेल केसांना १५ मिनिटं लावून ठेवा व नंतर
धुवा.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

हसा आणि शतायुषी व्हा!

सर : ‘त्याने भांडी घासली’ आणि
‘त्याला भांडी घासावी लागली’ या दोन
वाक्यात काय फरक आहे?
गण्या : ‘पहिल्या वाक्यात कर्ता
अविवाहीत आहे आणि दुसर्‍या वाक्यात कर्ता विवाहीत आहे.
सरांचे डोळे भरुन आले.

दैनिक पंचांग मंगळवार, दि. १६ एप्रिल २०२४

दुर्गाष्टमी, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर, चैत्र शुलपक्ष, पुष्य २९|१६
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६ वा. २९ मि.

 


राशिभविष्य :

मेष : आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. व्यापार
व्यवसायात सावधगिरी बाळगा. राजकीय व्यक्तींना काळ अनुकूल आहे. कौटुंबिक सुख
वाढेल. अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील.

वृषभ : इच्छित कार्य थोड्या उशीरा होतील. कामात पूर्ण समर्पणभाव ठेवा.
अनपेक्षित खर्च होण्याची शयता. महत्त्वाचीकामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. शत्रू पराभूत
होतील. राहते घर व जमिनीसंबंधीच्या कामातस्थिती अनुकूल राहील.

मिथुन: नवीन कामे, योजना लाभदायक ठरतील. अडकलेली कामे आपल्या प्रयत्नांमुळे
पूर्ण होतील. शेअर्समध्ये गुंतवणुक करु नका. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य
उत्तम राहील. अधिक जोखमीचे कार्ये टाळा.आरोग्य नरम-गरम राहील.

कर्क : महत्त्वाच्या कामांमध्ये आपणास घऱच्यांचा पाठींबा मिळेल. आपण ठरावीक
वेळेत काम पूर्ण कराल. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने महत्त्वाची कार्य पूर्ण होतील. शत्रू
पराभूत होतील.

सिंह : अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधीच्या कामात
स्थिती अनुकूल राहील. अधिक जोखमीचे कार्ये टाळा. आरोग्य नरम-गरम राहील. दृष्टीकोनात
बदल केल्याने निश्चितच यश मिळेल.

कन्या : शत्रू पराभूत होतील. दृष्टीकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल. आपली
कामे धाडसाने करा. व्यापारात वेळ मध्यम राहील. कामात काही विघ्न येऊ शकतात.
आपली कामे धाडसाने करा.

तूळ : मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल बातम्या कळतील. नोकरदार
व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. अधिकार्यांपासून दूर राहा. धार्मिक कार्यांमध्ये खर्च होण्याची
शयता आहे. धार्मिक कार्यांमध्ये खर्च होण्याची शयता आहे.

वृश्चिक : पत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा.
सामाजिक कार्य काळजीपूर्वक करा. व्यापार व्यवसायात जोखमीचे काम टाळा. व्यापारात
वेळ मध्यम राहील. कामात काही विघ्न येऊ शकतात. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता
त्रास देतील.

धनु : प्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. कर्ज देणे
टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. नोकरदार कामात व्यस्त राहातील. अधिकार्यांपासून दूर
राहा. सामाजिक कार्य काळजीपूर्वक करा. व्यापार-व्यवसायात जोखमीचे काम टाळा.

मकर : आरोग्याची काळजी घ्या. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल.
व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. कौटुंबिक वाद-विवाद टाळा. मिळकतीपेक्षा
अधिक खर्च होईल. नोकरदार व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे.

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. मानसन्मानात वाढ होईल. भावनेच्या भरात
वाहून नुकसान होण्याची शयता आहे. मान सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल.
अनुकूल बातम्या कळतील.

मीन :   अपेक्षित व्यक्तींचे सहकार्य मिळेल. नोकरदारांना अनुकूल वातावरण मिळेल.
राजकारणी व्यक्तींना उद्देशात यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. मानसिक सुख
शांतीचे वातावरण राहील.

                              संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

 

डॉटर : घाबरू नका देशपांडे…
खूप छोटे ऑपरेशन आहे.
पेशंट : थॅयू डॉटर…
पण माझे नाव देशपांडे नाही…!
डॉटर : मला माहिती आहे…
देशपांडे माझे नाव आहे…!!!
पेशंट आवाक् होतो

सुविचार

अथांग परिश्रमानेच सफलता प्राप्त होत असते; केवळ विचार करीत बसल्याने नव्हे. – बेन्जामिन फँ्रकलिन

अविचारी कृत्य

अविचारी कृत्य

एक शिकारी माणूस रानात शिकार शोधत असता त्याच्या नजरेला एक सुंदर कोल्हा पडला. त्याचे कातडे आपल्याजवळ असावे, अशी इच्छा होताच त्याने कोल्ह्याचे लपण्याचे ठिकाण शोधून काढले. कोल्हा आतमध्ये लपला होता; म्हणून शिकार्‍याने त्याच्या बिळाच्या बाहेर एक मोठा खड्डा खोदला. त्यावर झाडाचा पालापाचोळा पसरला आणि त्यावर एक मोठा मांसाचा तुकडा ठेवला. कोल्हा बाहेर आल्यावर मांसाचा तुकडा खाण्यासाठी तेथे जाताच नेमका त्या खड्ड्यात पडेल आणि आयताच जिवंतपणी आपल्या हाती लागेल, असे शिकार्‍याला वाटले. अशी सर्व व्यवस्था करून शिकारी आडबाजूस जाऊन दडून बसला. काही वेळा कोल्हा बिळाबाहेर आला असता समोरच त्याला मांसाचा मोठा तुकडा दिसला. तो खावा, असे वाटताच तो थोडा पुढे आला; पण यामागे काहीतरी कपट असावे, हे धूर्त कोल्ह्याने ओळखले व तो परत बिळात जाऊन लपला. थोड्या वेळानेच एक वाघ त्या रस्त्याने जात असता त्याने तो मांसाचा तुकडा पाहिला. कसले मांस आहे हे पाहावे, म्हणून मागचा-पुढचा कसलाही विचार न करता तो त्या तुकड्याकडे धावला, तसा त्या खड्ड्यात पडला. त्याचा पडण्याचा आवाज शिकार्‍याच्या कानी पडताच तोही तिकडे धावला. खड्ड्यात कोल्हा पडला, असे समजून त्याने खड्ड्यात उडी टाकली असता खवळलेल्या वाघाने त्याच्यावरच हल्ल केला आणि त्याला ठार केले. तात्पर्य ः अविचाराने केलेले कृत्य कधी-कधी जिवावर बेतते.

डोयात केस नसलेले गोल चट्टे कशामुळे येतात?

डोयात केस नसलेले गोल चट्टे कशामुळे येतात?

काहीजणांच्या डोयात केस नसलेले चट्टे दिसतात. बरेच जण समजतात की, उंदीर चावल्यामुळे असे चट्टे येतात व पुन्हा तेथे केस येत नाहीत. डोयाचे केस जाण्याची अनेक कारणे आहेत. डोयाच्या त्वचेला जंतूसंसर्ग झाला असेल, दाह असेल तरी केस गळतात. याखेरीज टिनीया कॅपिटीससारख्या रोगातही केस गळतात. डोयात केस नसलेले गोल चट्टे असण्याचे मुख्य कारण म्हणजे, कारण माहीत नसलेला अ‍ॅलापेशिया एरॅटा हा रोग. ३० टक्के रुग्णांमध्ये आनुवंशिक कारणे
सापडतात. यात डोयात दोन वा तीन केस नसलेले चट्टे असतात; पण डोयाची त्वचा मात्र निरोगी असते. ह्या चट्ट्यांवर केस नसले तरी ६ ते १२ महिन्यानंतर परत केस उगवतात. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नसते. त्वचेच्या जिवाणू
वा बुरसी संसर्गामुळे केस जात असतील, तर मात्र त्यावर योग्य ते उपाय करावे लागतात. म्हणजे केस
गळायचे थांबतात.