पाककला

0
28

कॉर्न फ्लॉवर वड्या

साहित्य : ३ वाट्या ओले खोबरे, १
कप दूध, १ कप दूध, १ वाटी कॉर्नफ्लॉवर,
तिन्ही मिळून जेवढे होईल तेवढी साखर,
४-५ वेलदोड्यांची पूड, केशरी रंग, काजू व
अक्रोडचे काप.
कृती : ओले खोबरे एका बाऊलमध्ये
घ्यावे. त्यावर गरम दूध ओतून तासभर
बाजूला ठेवावे. नंतर नारळाचे दूध काढून
घ्यावे. दूधात कॉर्नफ्लोअर, साखर, थोडा
लाल रंग व वेलदोड्यांची पूड घालून मिश्रण
सारखे करावे. त्यात दूधात भिजवलेला नारळ
खव घालावा. गॅसवर ठेवून ढवळावे. सतत
हलवत राहावे. घट्टसर झाले की, उतरवावे व
तूप लावलेल्या थाळीत ओतावे. वरून काजू व
अक्रोडचे काप पसरवून हलया हाताने थापून
ठेवावे. गार झाल्यावर वड्या पाडाव्यात.