परिश्रमांशिवाय प्रारब्ध पांगळे असते. : आर्य चाणक्य
खांडवी
खांडवी
साहित्य : १ वाटी तांदळाचा रवा,
१ वाटी साखर किंवा गूळ, आले कीस २,
३ चमचे, २ वाट्या नारळाचे दूध, पाव चमचा
वेलदोड्यांची पूड, तूप, चिमूटभर मीठ, थोडा
रोझ इसेन्स किंवा गुलाबपाणी
कृती : तांदूळ धुऊन कपड्यावर
पसरून वाळवावे. नंतर त्यांचा रवा काढावा.
तुपावर रवा चांगला भाजून घ्यावा. नारळाच्या
दुधात साखर विरघळून घ्यावी. दुधाला उकळी
आली की त्यात वाटलेले आले, मीठ व
भाजलेला रवा घालावा इसेन्स व वेलदोड्यांची
पूड घालावी. चांगले ढवळून झाकण ठेवावे.
गॅस मंद ठेवावा. नंतर बाजूने थोडे तूप सोडून
ढवळावे व तूप लावलेल्या थाळीत घालून
थापावे. वरून थोडे ओले खोबरे घालून थापावे.
गार झाल्यावर मोठ्या वड्या पाडाव्यात.
स्मरणशतीसाठी चुइंगम उपयुक्त
स्मरणशतीसाठी चुइंगम उपयुक्त
* च्युइंगम चावल्याने मानसिक
क्षमतेत पन्नास टक्के इतका फायदा होऊ
शकतो. याने आपला हार्ट रेट वाढतो
आणि या कारणाने रक्ताचा असरही वाढतो.
यामुळे मेंदूतील ऑसिजनचे प्रमाण वाढते.
यामुळे स्मरणशक्तीमध्ये अधिक फायदा होतो.
* भाज्या चिरण्यापूर्वी धुऊन घ्याव्यात.
यामुळे त्यातील खनिजे व व्हिटॅमिन नष्ट
होत नाहीत. पदार्थ नेहमी मंद आचेवरच
शिजवावेत. यामुळे मसाल्यांचा सुगंध टिकून
राहातो. पौष्टिक घटक नष्ट होत नाहीत व
भाजी स्वादिष्ट होते.
दैनिक पंचांग बुधवार, दि. १७ एप्रिल २०२४
श्रीराम नवमी, शके १९४६ क्रोधीनाम
संवत्सर, चैत्र शुलपक्ष, आश्लेषा अहोरात
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६
वा. २९ मि.
राशिभविष्य
मेष : अपेक्षेनुसार कार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. मित्रांपासून, सहकार्यांपासून लाभ मिळेल. योजनांमध्ये केलेला बदल
इतर कामे करण्यासाठी प्रवृत्त करेल.आपल्या आवडीच्या नातलगांना भेटा.
वृषभ : महत्वाच्या व्यक्तींशी संपर्क येईल. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखद. सामाजिक स्थितीत सुधारणा होईल. आपल्या आवडीच्या नातलगांना भेटा आणि स्वतःबद्दल त्यांची प्रतिक्रिया मिळवा.
मिथुन : राहते घर व जमिनीसंबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. काम व इच्छित योजनेला अमलात आणावे. आपण आपल्या घराच्या वाढीबाबत काही योजना बनवू शकता. आपण जीवनात हव्या असलेल्या वस्तूंवर लक्ष द्याल.
कर्क : कौटुंबिक जीवनात आनंद मिळेल, पण खाण्या-पिण्याच्या बाबतीत काळजी घ्या. शांत राहाण्याचा प्रयत्न करा. पोरकटपणा करणे टाळा. आजचा दिवस आपल्यासाठी नवी सुरुवात करण्यास किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय ठरावण्यास साहाय्यक असू शकतो.
सिंह : नवीन कामे, योजनांच्या बाबतीत स्थिती लाभदायक राहील. घरात किंवा कुटुंबात शुभप्रसंग घडतील. पूर्ण विश्वासाने त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करा. आर्थिक विषयांमध्ये सावगिरी बाळगा. हसत खेळत वेळ खर्च होईल.
कन्या : आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे. अडकलेली कामे योग्य
वेळी पूर्ण होतील. महत्त्वाच्या कामांसाठी श्रम करावे लागेल.
तूळ : व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. आरोग्य नरम-गरम राहील. व्यापार-व्यवसायात वातावरण अनुकूल
मिळेल. व्यापार व प्रणयाच्या क्षेत्रात यश मिळेल. प्रिय व्यक्तीबरोबर संवाद होईल.
वृश्चिक : वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. आपले काम धाडसाने करा. काही नवीन संधी मिळतील. मित्रांचा
अनुकूल सहयोग मिळेल. नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा. आवश्यक कार्य देखील पूर्ण होतील.
धनु : आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. योग्य उद्योगात गुंतवणूक केल्यास शेवटी आर्थिक नफा मिळेल.
लांबचे प्रवास टाळा. आज आपल्या आयुष्यात आपल्या नातलागांची व मित्रांची चांगली भूमिका रहाणे शय आहे.
मकर : आपल्या संपर्कात येणार्या लोकांच्या वर्तनामुळे आपणास संताप येण्याची शयता आहे. आपण जे करण्याची
इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोन प्रदर्शित करा.
कुंभ : आपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास अधिक चांगल्या रीतीने कार्य करण्यास आपली मदत करेल. घरातील
वातावरण आनंददायी राहील. सुख-शांतीचे वातावरण राहील. व्यापार-व्यवसाय सहज
राहील. कौटुंबिक सभासदांचा सहयोग मिळेल.
मीन : गंभीर आणि योजनाबद्ध प्रयत्नांनी आपणास यश आणि आनंद मिळेल. इतरांवर चुकीचा प्रभाव पडू शकतो.
बळात वाढ होईल. आरोग्य उत्तम राहील. प्रेमीजनांसाठी आजचा दिवस आनंदाने परिपूर्ण असेल.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर
विषारी दारू पिल्याने लोकांचे मृत्यू का होतात?
विषारी दारू पिल्याने लोकांचे मृत्यू का होतात?
सूरा पिऊन दिल्लीत शेकडो लोक मृत्यूमुखी पडले. मुंबईतही विषारी दारूमुळे लोक बळी पडले. अधूनमधून वृत्तपत्रात विषारी दारूच्या बातम्या येतच असतात. विषारी दारू म्हणजे काय व ती पिल्याने लोक का मरतात, ते आता पाहू. सामान्यपणे ज्या दारूचा पिण्यासाठी उपयोग केला जातो, त्यात एथाईल अल्कोहोल असते. दारूमुळे व्यसन लागते व इतर अनेक तोटे होतात. नशा येते, अपघात होऊ शकतात व गुन्हेगारी प्रवृत्ती वाढतात. हे खरे असले तरी, रक्तातील एथाईल अल्कोहोलचे प्रमाण जोपर्यंत दर शंभर मि.ली.त ४०० ते ५०० मि.ग्रॅ. इतके वा त्याहून जास्त होत नाही, तोपर्यंत मृत्यू येण्याची शयता कमी असते. याउलट विषारी दारू अल्प प्रमाणात प्यायली तरी मृत्यू येतो. विषारी दारू म्हणजे मिथाईल अल्कोहोल. मळी वा लाकडाच्या विघटनापासून हे अल्कोहोल तयार होते. वैद्यकशास्त्रात वापरल्या जाणार्या स्पिरीटचा कोणी पिण्यासाठी वापर करू नये, म्हणून त्यात मिथाईल अल्कोहोल टाकतात. तरीही मद्यपी स्पिरीटही पिण्यासाठी वापरतात व विषबाधा होते. मिथाईल अल्कोहोल ६० ते २४० मि.ली. इतके पिल्यास प्रौढांचा खात्रीने मृत्यू होतो. २४ ते ३६ तासांत व्यक्ती मृत्यूमुखी पडते. मिथाईल अल्कोहोल शरीरातून फार संथगतीने उत्सर्जित केले जाते. त्याचे चयापचय होऊन फॉर्मिल्डिहाईड व फॉर्मिक अॅसिड हे विषारी पदार्थ तयार होतात. या विषारी पदार्थांमुळेच विषबाधेची लक्षणे दिसतात. विषारी दारू प्यायल्यानंतर सुरुवातीला डोके दुखते, चक्कर येते, मळमळ व उलट्या होतात; तसेच पोटात दुखते. नंतर स्नायूंमध्ये शक्ती राहत नाही व हृदयाचे कार्यही मंदावते. डोळ्यांवर फारच विपरीत परिणाम होतात. काही वेळा तात्पुरते अंधत्व येते; पण दृष्टीसाठी आवश्यक असणारे चेतातंतू नष्ट झाल्यास वा निकामी झाल्यास कायमचे अंधत्वही येते. नंतर व्यक्तीचा मृत्यू ओढवतो. या विषबाधेमध्ये डायलिसीसचा वापर करून रोग्याचे प्राण वाचवता येतात. इतर उपचार लक्षणांवर आधारित असे असतात. दारू पिणे वाईटच, पण त्यातही स्वस्त मिळते म्हणून कोणतीही दारू पिणे अतिशय वाईट. कारण अशा दारूत मिथाईल अल्कोहोल असू शकते व त्यामुळे जीवदेखील जाऊ शकतो.
जेवणासंबंधी काही नियम
जेवणासंबंधी काही नियम
जेवताना हळूहळू आणि प्रत्येक घास चावून खावा. दुपारी जेवून लगेच आडवे होण्याने
हमखास अॅसिडीटी वाढते. त्यामुळे दुपारची वामकुक्षी टाळावी. रात्रीचे जेवण लवकर करावे.
जेवणानंतर ३ तासांनी झोपावे. रात्री खूप उशिरा जेवू नये. धूम्रपान, तंबाखू सेवन,
मद्यप्राशन अशी व्यसने, त्याचप्रमाणे चहा-कॉफी, कोला पेये यांचा अतिरेक टाळावा.








