डोयात केस नसलेले गोल चट्टे कशामुळे येतात?
काहीजणांच्या डोयात केस नसलेले चट्टे दिसतात. बरेच जण समजतात की, उंदीर चावल्यामुळे असे चट्टे येतात व पुन्हा तेथे केस येत नाहीत. डोयाचे केस जाण्याची अनेक कारणे आहेत. डोयाच्या त्वचेला जंतूसंसर्ग झाला असेल, दाह असेल तरी केस गळतात. याखेरीज टिनीया कॅपिटीससारख्या रोगातही केस गळतात. डोयात केस नसलेले गोल चट्टे असण्याचे मुख्य कारण म्हणजे, कारण माहीत नसलेला अॅलापेशिया एरॅटा हा रोग. ३० टक्के रुग्णांमध्ये आनुवंशिक कारणे
सापडतात. यात डोयात दोन वा तीन केस नसलेले चट्टे असतात; पण डोयाची त्वचा मात्र निरोगी असते. ह्या चट्ट्यांवर केस नसले तरी ६ ते १२ महिन्यानंतर परत केस उगवतात. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नसते. त्वचेच्या जिवाणू
वा बुरसी संसर्गामुळे केस जात असतील, तर मात्र त्यावर योग्य ते उपाय करावे लागतात. म्हणजे केस
गळायचे थांबतात.