
देवघराची खिडकी व दरवाजे पश्चिम
बाजूला नसून उत्तर वा पूर्व दिशेला असावेत.
दही-नारळाच्या वड्या

साहित्य : १ वाटी आंबट दही, १ वाटी
दूध, १ वाटी ओल खोबरे, अर्धी वाटी मैदा,
दही, दूध, ओले खोबरे, मैदा जेवढे होईल तेवढी
साखर, वेलदोड्यांची पूड आवडीप्रमाणे.
कृती : दही, दूध, खोबरे, मैदा व
तेवढीच साखर एकत्र करून मिश्रण गॅसवर
ठेवावे. सतत ढवळत राहावे. घट्टसर होत
आले की वाटल्यास थोडी पिठीसाखर घालून
घोटावे. तूप लावलेल्या थाळीत थापावे. गार
झाल्यावर वड्या पाडाव्यात.
बॉडी बिल्डींगसाठी आवश्यक पदार्थ
तेलबिया म्हणजे पांढरे आणि काळे तीळ, शेंगदाणे, जवस, सूर्यफुलाच्या बिया. सुकामेव्यामध्ये
बदाम, अक्रोड. सोयाबीन, पावटा, मसूर आदी पदार्थांपासून बॉडी बिल्डींग करणार्यांसाठी भरपूर
प्रोटीन्स मिळते. थंडीत रोगजंतूंची वाढ झपाट्याने होते ती टाळण्यासाठी म्हणून काही पदार्थ
आहारात आवश्यक आहेत. आलं, सुंठ, लसूण, तुळस, गवती चहा असे औषधी पदार्थ जरूर घ्यावेत.
लवंग, मिरे, दालचिनी, मोहरी, हळद असे जंतुनाशक, प्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ. ओवा,
हिंग, मेथी दाणे यांमुळे, भूक वाढते, अन्नपचन सुधारते, रक्ताभिसरण वाढते व रोगप्रतिकारशती
वाढण्यास मदत होते. बाजरीची भाकरी तुप व तिळाची चटणीही पौष्टिक घटक आहे.
कासव आणि ससा
एका रानात एक कासव आणि ससा राहत होते. ससा नेहमी कासवाची भेट होताच बढाया मारी. त्याच्यासमोर फुशारकी गाजवे. एकदा ससा असाच फुशारकी करीत कासवाला म्हणाला, “माझ्या चपळतेपुढे तू फारच क्षुद्र. माझ्याबरोबर चालण्याची, पळण्याची बरोबरी कोणीच करणार नाही.” तेव्हा कासव म्हणाले, “ससेभाऊ, तुझ्या चपळतेचा तुला एवढा गर्व असेल तर चल, माझ्याबरोबर धावण्याची पैज लाव. आपण दोघे एकाच वेळी निघून त्या डोंगरापर्यंत जाऊ. जर माझ्या आधी तू तेथे पोहोचलास, तर मी तुला बक्षीस देईन. जर मी तुझ्या आधी तेथे पोहोचलो, तर तू मला बक्षीस देशील. बोल, आहेस कबूल?” सशाने कासवाची अट मान्य केली. मग दोघेही एकाच वेळी तिथून निघाले; पण थोड्याच अवधीत ससा बराच पुढे निघून गेला. कासव आपले आपल्या गतीने वाट कापीत चालले होते. कासव खूपच मागे राहिलेले पाहून दमलेला ससा मनात म्हणाला, ‘अजून कासव खूपच मागे आहे. आपण आता धावून दमलो. थोडा वेळ या झाडाखाली विश्रांती घ्यावी आणि पुन्हा ताजेतवाने होऊन धावत सुटावे; म्हणजे कासवाच्या किती तरी आधी आपण डोंगरापर्यंत पोहोचू. समजा, एखादे वेळी कासव थोडे पुढे निघूनही गेेले, तरी त्याला गाठण्यास आपल्याला कष्ट पडणार नाहीत. चार उड्यांतच आपण त्याच्या पुढे जाऊ” असा विचार करीत ससा जवळच असलेल्या झाडाच्या गार सावलीत झोपला. थोड्याच वेळात तो घोरू लागला. इकडे कासव मंद गतीने चालत-चालत सशाच्याही पुढे निघून गेले आणि थोड्याच वेळात ते डोंगराच्या पायथ्याला पोहोचले, तरी ससा आपला झाडाच्या सावलीत झोपलेलाच. जेव्हा ससा जागा झाला, तेव्हा पाहतो, तर कासव पायथ्याला पोहोचलेले दिसले. तेव्हा त्याला आपलीच लाज वाटली. तात्पर्य ः तेज बुद्धी असून अंगी आळस असेल, तर त्या माणसाकडून फारसे कार्य होत नाही. परंतु बुद्धी मंद असूनही जो सतत उद्योगात मग्न असतो, त्याच्याकडून खूप काम केले जाते.
‘मीठा जहर’ म्हणजे काय?
गोड बोलून विश्वासघात करणे, म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे. अशीच एक वनस्पती आहे. जिचे मूळ गोड लागते, पण खाल्ल्यास प्राणावर बेतते. या विषाला त्यामुळेच ‘मीठा जहर’ असे म्हणतात. अॅकोनिटम नॅपेल्स नावाचे हे झाड हिमालयाच्या प्रदेशात आढळून येते. तसे या झाडाचे सर्वच भाग विषारी असतात; परंतु मूळ जास्त विषारी असते. मुळात अॅकोनिटीन हा अत्यंत विषारी असा घटक असतो. हे एक शोभेचे झाड आहे. पानात वा इतर पदार्थात मिसळून हे विष खायला देतात. यामुळे ओठ, घसा, जीभ बधिर होणे, लाळ सुटणे, पोटात दुखणे, उलट्या होणे, खूप घाम येणे, चक्कर येणे, दृष्टी व वाचा यावर दुष्परिणाम होणे, हातापायातील त्राण जाणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. अखेर हृदयाच्या स्नायूवर परिणाम होऊन किंवा श्वसन थांबून मृत्यू होतो. १ गॅ्रम वजनाइतके मूळ वा २५० मि.ग्रॅ. इतके अॅकोनाईट खाल्ल्यास सुमारे सहा तासात मृत्यू होतो. वन्य प्राण्यांना मारण्यासाठी बाणाला लावायच्या विषात याचा उपयोग केला जातो. तसेच खून करण्यासाठी गुन्हेगार याचा वापर करतात. स्वस्त व सहजगत्या उपलब्ध असल्याने विषप्रयोगासाठी याचा जास्त वापर केला जातो. पोटात गेलेले विष टॅनिक अॅसिडचे द्रावण प्यायला देऊन वा पोटॅशियम परमँगनेटचे द्रावण प्यायला देऊन पोटाच्या बाहेर काढतात. हृदय व श्वसनसंस्था यांचे कार्य सुरळीत चालावे, यासाठी उपचार करावे लागतात. कृत्रिम श्वसन यंत्र व प्राणवायूचा पुरवठा यांचाही उपयोग करतात. असे आहे हे ‘मीठा जहर’; चवीला गोड, पण भयंकर.
सोयाबीन रस्सा
साहित्य : सोयाबीन (बारीक वड्या) २ वाट्या, किसलेले सुके खोबरे १ वाटी,
उभा चिरलेला कांदा १ मोठा, लसूण पाकळ्या १५२०, मिरी दाणे ५६, लवंगा ५६, आले-
मध्यम तुकडा, कोथिंबीर १२ वाटी, लाल तिखट- चवीनुसार, मीठ-चवीनुसार.
कृति : सर्वप्रथम एका सोयाबीनचे दोन तुकडे असे सर्व तुकडे करून घ्यावे.
कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालून किसलेले खोबरे, आले, लसूण, कांदा, लवंगा, मिरे
भाजून घ्यावे. खोबर्याचा रंग बदलला की, गॅस बंद करून सर्व जिन्नस वाटून घ्यावे.
कढईमध्ये तेल घालून त्यात थोडी साखर घालावी. साखर घातल्याने तेलाचा छान तवंग
येतो. नंतर त्यात लाल तिखट आवडीनुसार घालावे. हा रस्सा जरा झणझणीतच चांगला
लागतो. तेल तापल्यावर त्यात वाटलेली पेस्ट घालून खूप परतावे. खोबरे तेल सुटेपर्यंत
परतावे. नंतर त्यात तुकडे केलेले सोयाबीन घालून थोडे परतावे. उकळलेले पाणी घालून
सोयाबीन शिजू द्यावे. चवीनुसार मीठ घालावे. शिजल्यावर वरून कोथिंबीर घालावी. गरम
गरम भाकरीबरोबर वाढावे. सोबत कांदा चिरून द्यावा.