मेथ्या खाल्ल्याने मधुमेहावर नियंत्रण
टाइप २ च्या मधुमेहाच्या रुग्णांना, रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मेथ्यांचा निश्चित
उपयोग होतो. मेथीमध्ये भरपूर फायबर आणि ट्रायगोनेलिन नावाचे एक द्रव्य असते. यांचा दुहेरी
फायदा होतो. यामुळे शरीरात इन्शुलिनची संवेदनशीलता वाढते शिवाय वजनही कमी होते.
म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांसाठी नियमित मेथीचे दाणे खाणे उत्तम. ज्यांची रक्तशर्करा जास्त आहे
अशांना ती नियंत्रित राहण्यास मेथ्यांचा उपयोग होतो. काही वेळा नियमित मेथ्या खाणार्यांचे
औषधाचे डोस कमी होण्याचीही शयता असते, मात्र हे करताना, डॉटरांच्या सल्ल्यानेच बदल
करावेत.
मेथ्या खाल्ल्याने मधुमेहावर नियंत्रण
बर्गर
बर्गर
साहित्य : ६ बर्गर पाव, मेयोनीज
आणि मस्टर्ड सॉस आवश्यकतेनुसार.
कटलेटसाठी : ६ उकडलेले बटाटे,
१/४ कप मटार आणि फेंचबीन्स (दोन्हीही
वाफवलेले), बारीक चिरलेले गाजर आणि ५
हिरव्या मिरच्या, अर्धा टी स्पून आले पेस्ट,
अर्धा ब्रेडचा चुरा, २ टे स्पून कॉर्नफ्लोर, मीठ
चवीनुसार.
सॅलॅडसाठी : कांदा, काकडी आणि
टोमॅटोच्या चकत्या, थोडीशी सॅलॅडची पाने,
थोड्याशा चीज स्लाइसेस, टोमॅटो सॉस, मीठ
चवीनुसार.
कृति : कटलेटचे सर्व साहित्य एकत्र
करून मध्यम आकाराच्या टिक्की (वड्या)
बनवून घ्या. टिक्की ब्रेडच्या चुर्यामध्ये घोळवून
गरम तेलामध्ये तळून घ्या. बर्गरचा पाव मधोमध
कापून घ्या. पावाच्या दोन्ही बाजूला मयोनीज
आणि मस्टर्ड सॉस लावा.
नंतर एका भागावर कांद्याची स्लाइस
आणि सॅलॅडचे पान ठेवा. नंतर कटलेट, चीज
स्लाइस, काकडी आणि टोमॅटोच्या स्लाइस
ठेवा व ओव्हनमध्ये २-३ मिनिटे ग्रील करा.
गरम गरम बर्गर फ्रेंच फ्राइज बरोबर सर्व्ह
करा.
दैनिक पंचांग गुरुवार, दि. १८ एप्रिल २०२४
—, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर,
चैत्र शुलपक्ष, आश्लेषा ०७|५७
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६ वा. २९ मि.
राशिभविष्य
मेष : आपल्या आवडीच्या नातलगांना भेटा आणि स्वतःबद्दल त्यांची प्रतिक्रिया मिळवा. प्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा.
आर्थिक खर्च अधिक होईल. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल.
वृषभ : ज्या व्यक्तीकडे फुकट घालवण्यासाठी वेळ आहे त्याचे ऐकण्याचा प्रयत्न करा आणि आपला सल्ला त्याला द्या.
आरोग्याची काळजी घ्या. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा.
मिथुन : आपण आपल्या घराच्या वाढीबाबत काही योजना बनवू शकता. आपल्या आवडीच्या नातलगांना भेटा. कौटुंबिक वाद-विवाद टाळा. मिळकतीपेक्षा अधिक खर्च होईल.
कर्क : आजचा दिवस आपल्यासाठी नवी सुरुवात करण्यास किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय ठरावण्यास साहाय्यक असू शकतो.
पैशासंबंधी येणार्या व अडचणी दूर होतील. आरोग्य उत्तम राहील.
सिंह : आपण जीवनात हव्या असलेल्या वस्तूंवर लक्ष द्या व पूर्ण विश्वासाने त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करा. मानसन्मानात वाढ
होईल. मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल.
कन्या : महत्त्वाच्या कामांसाठी श्रम करावे लागेल. आर्थिक विषयांमध्ये
सावगिरी बाळगा. भावनेच्या भरात वाहून नुकसान होण्याची शयता आहे. अपेक्षित व्यक्तींचे सहकार्य मिळेल.
तूळ : हसत खेळत वेळ खर्च होईल. व्यापार-व्यवसाय सहज राहील. कौटुंबिक सभासदांचा सहयोग मिळेल. नोकरदारांना अनुकूल वातावरण मिळेल.
वृश्चिक : व्यापार व प्रणयाच्या क्षेत्रात यश मिळेल. प्रिय व्यक्तीबरोबर संवाद होईल.
आरोग्याची काळजी घ्या.
धनु : मित्रांचा अनुकूल सहयोग मिळेल. आज आपल्या आयुष्यात आपल्या नातलागांची व मित्रांची चांगली भूमिका रहाणे शय आहे. व्यापार-व्यवसायात वातावरण अनुकूल मिळेल.
मकर : नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा. आवश्यक कार्य देखील पूर्ण होतील. राजकारणी व्यक्तींना उद्देशात यश मिळेल.
कुंभ : आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोन प्रदर्शित करा. आपले काम धाडसाने करा.
मीन : प्रेमीजनांसाठी आजचा दिवस आनंदाने परिपूर्ण असेल. सुख-शांतीचे वातावरण राहील. मिळकतीपेक्षा अधिक खर्च होईल.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर
विंचू चावल्यास काय करावे?
विंचू चावल्यास काय करावे?
शहरामध्ये विंचू चावण्याचे प्रमाण कमी असले तरी दमट, अंधार्या जागी, गोठ्यांजवळ विंचू असू शकतात. अशा ठिकाणी वावरताना तसेच शेतात काम करताना अपघाताने विंचू चावू शकतो. विंचू चावतो तो तोंडाने नव्हे, तर त्याला एक नांगी असते. ती पोकळ असून त्यात विषाने भरलेली नळी असते. या नांगीने जखम होऊन त्यातून विष आपल्या शरीरात सोडले जाते. विंचवाचे विष सापाहून विषारी असते; परंतु त्याचे प्रमाण कमी असल्याने सापाच्या विषाप्रमाणे त्याचे परिणाम दिसत नाहीत. विंचू चावल्यावर चावलेल्या जागी खूप आग होते. ती जागा लाल होते. काही वेळेस डोके दुखणे, चक्कर, मळमळ होणे, खूप घाम येणे, हातापायाला पेटके येणे, बेशुद्धी येणे अशी लक्षणे दिसून येतात. इंगळीच्या विषाने याहून गंभीर परिणाम होऊन मृत्यूही होऊ शकतो. हाताला किंवा पायाला विंचू चावल्यास त्याच्या वरच्या बाजूस पट्टी बांधावी. गरज असल्यास चावलेल्या जागी छेद घ्यावा. जखम पाण्याने, अमोनिया किंवा पोटॅशियम परमँग्नेटने धुवावी. बधिर करण्यासाठी औषध उपलब्ध असल्यास ते टाकावे. चावलेल्या भागाची हालचाल शयतो करू नये. त्यामुळे विष कमी शोषले जाते. लक्षणांमध्ये वाढ होत गेल्यास, तसेच इंगळीने म्हणजे लाल मोठ्या विंचवाने दंश केल्यास, लहान मुलांना विंचू चावल्यास लगेच डॉटरांचा सल्ला घ्यावा.
पायाला कांदा लावून झोपणे फायदेशीर
पायाला कांदा लावून झोपणे फायदेशीर
कांद्यातील अँटी बॅटेरिअल आणि अँटी वायरल तत्त्वांमुळे शरीर निरोगी राहण्यास मदत
होते. रात्री झोपताना पायमोजे घालून त्यात कांद्याच्या चकत्या ठेवण्याने शरीरातल्या घातक
जिवाणूंचा आणि किटाणूंचा नाश होतो, तसेच रक्तशुद्धी साधते. कांद्यामधील फॉस्फरिक अॅमसिड
रक्तामध्ये शोषलं जातं आणि रक्तशुद्धी होते. कांद्याच्या उग्र वासामुळे खोलीतील हवा शुद्ध
होतेच पण पायाची दुर्गंधीही नाहिशी होते. याने घातक रसायनं आणि विषारी तत्त्व शरीराबाहेर
टाकण्यास मदत होते.





