पाककला

0
18

खांडवी

साहित्य : १ वाटी तांदळाचा रवा,
१ वाटी साखर किंवा गूळ, आले कीस २,
३ चमचे, २ वाट्या नारळाचे दूध, पाव चमचा
वेलदोड्यांची पूड, तूप, चिमूटभर मीठ, थोडा
रोझ इसेन्स किंवा गुलाबपाणी
कृती : तांदूळ धुऊन कपड्यावर
पसरून वाळवावे. नंतर त्यांचा रवा काढावा.
तुपावर रवा चांगला भाजून घ्यावा. नारळाच्या
दुधात साखर विरघळून घ्यावी. दुधाला उकळी
आली की त्यात वाटलेले आले, मीठ व
भाजलेला रवा घालावा इसेन्स व वेलदोड्यांची
पूड घालावी. चांगले ढवळून झाकण ठेवावे.
गॅस मंद ठेवावा. नंतर बाजूने थोडे तूप सोडून
ढवळावे व तूप लावलेल्या थाळीत घालून
थापावे. वरून थोडे ओले खोबरे घालून थापावे.
गार झाल्यावर मोठ्या वड्या पाडाव्यात.