जवळच्या नात्यातील व्यक्तीशी लग्न केल्यास काही दुष्परिणाम होतात का?

जवळच्या नात्यातील व्यक्तीशी लग्न केल्यास काही दुष्परिणाम होतात का?

एखाद्या व्यक्तीचे शरीर त्याच्या पेशीतील गुणसूत्रांवरच अवलंबून असते. मातापित्यांकडून मुलाला ही गुणसूत्रे मिळत असतात. त्यामुळेच मुलाचे डोळे आई वा वडिलांसारखे असतात. ते कोणासारखे तरी (आई, वडील, मामा, काका इ.) दिसते. हे होण्याचे कारण म्हणजे रक्ताचे नाते असणार्‍या लोकांमधील गुणसूत्रात साम्य असते. हे साम्य ते एकाच वा सारखी गुणसूत्रे असणार्‍या पूर्वजांचे वंशज असतात म्हणून असते. मेंडेलच्या अनुवंशिकतेच्या सिद्धान्तानुसार प्रत्येक गुणधर्मासाठी, जसे हिरवे डोळे, गुणसूत्रांचा संच असतो. त्यात वर्चस्व गाजवणारे (ऊेाळपरपीं) व दबावाला बळी पडणारे (ीशलशीीर्ळींश), असे दोन प्रकार असतात. दोन वर्चस्व गाजवणार्‍या गुमसूत्रांची गाठ पडली, तर तिसराच गुण तयार होतो. एक वर्चस्व गाजवणारे व दुसरे दबावाला बळी पडणारे गुणसूत्र आले, तर वर्चस्व गाजवणार्‍या गुणसूत्राची सरशी होते व त्याप्रमाणे बालकात गुण दिसून येतात. वेगवेगळ्या समाजातील लोक एकत्र आल्यास त्यांच्यात असणारी गुणसूत्रे विविध प्रकारची असतात. साहजिकच त्यांच्यातील वर्चस्व गाजवणार्‍या गुणसूत्रांचाच संकर होऊन निरोगी समाज जन्माला येतो. एकाच समाजात वारंवार लग्न होत गेल्याने त्या समाजातील दबावाला बळी पडणार्‍या गुणसूत्रांचा संकर होऊन कमी प्रतीचे गुणधर्म मुलबाळांत येतात. रक्ताचे नाते असलेल्या व्यक्तींनी परस्परांशी लग्न केले तर, गुणसूत्रांमधील दबावाला बळी पडणार्‍या गुणसूत्रांचे गुण मुलबाळांत येतात. वेडसरपणा, कोड, रक्ताचे विकार, मधुमेह, मज्जासंस्थेचे विकार असे अनेक रोग, अशा प्रकारे लग्न केलेल्या व्यक्तींच्या मुलांना होऊ शकतात. त्यामुळे काका-पुतणी, मामा-भाची, बहीण-भाऊ अशी लग्ने होऊ देऊ नयेत; हेच खरे.

‘अक्रोड’चे गुणधर्म!

‘अक्रोड’चे गुणधर्म!
अक्रोड आहारात असतील, तर ज्यांचे वजन जास्त आहे अशांना फायदा होतो. रक्तवाहिन्या
चांगल्या स्थितीत राहतात. ‘जग्लन्स रेजिया’ या शास्त्रीय नावाची अक्रोडाची झाडं हिमालयीन
परिसरात अनेक वर्षांपासून आढळलेली आहेत. अक्रोडमध्ये भरपूर प्रमाणात असलेले ओमेगा-३
मेदाम्ल हे अँटिऑसिडंट असल्याने त्याचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. जर्नल ऑफ
द अमेरिकन कॉलेज ऑफ न्यूट्रिशनमधील संदर्भानुसार अक्रोड आणि अक्रोडचे तेल या दोन्हीचा
उपयोग ताण कमी करण्यासाठी होतो. अक्रोड आहारात असतील, तर ज्यांचे वजन जास्त आहे
अशांना फायदा होतो.

सुविचार

घाम गाळल्याशिवाय मिळालेली भाकरी हरामाची आहे. : सेंट फ्रान्सिस

मुखविलास लाडू

मुखविलास लाडू

साहित्य : ३ वाट्या हरभरा डाळ, ३
कप दूध, दीड ते २ वाट्या साजूक तूप,
दीड वाटी खवा, अर्धी वाटी काजू-बेदाणे, १
लहान चमचा जाडसर कुटलेली वेलदोडा पूड,
४ वाट्या साखर, पाव चमचा केशर.
कृति : हरभरा डाळ स्वच्छ धुवून
दुधात भिजत घालावी. ४ तासानंतर
मिसरवर वाटून घ्यावी. कढईत तूप तापवून
मंद आचेवर वाटलेली डाळ मोकळी होईपर्यंत
परतावी. गुलाबीसर झाली आणि तूप सुटू
लागले की काढून घेऊन खवा परतावा. डाळ,
खवा, काजू आणि बेदाणे एकत्र करावे. नंतर
साखरेत १ वाटी पाणी घालून ३ तारी पाक
करावा. खाली उतरवून त्यात केशर-वेलदोडा
आणि एकत्र केलेले साहित्य घालून मिश्रण
आळल की लाडू वळावे. हे लाडू जरा ओलसर
असतात. त्यामुळे जेवणात पक्वान्न म्हणून
चांगले लागतात.

वास्तू

मुख्य दरवाजा संदर्भात
* मुख्य दरवाजानुसार विजेचा किंवा
सिमेंटचा खांब असणेही अशुभ आहे.
* मुख्य दरवाजासमोर तुळस लावावी.
* मुख्य दरवाजासमोर दररोज
स्वस्तिकची रांगोळी काढावी.

फ्रिजमध्ये अगोदरच कणीक मळून ठेवली असेल तर

जर फ्रिजमध्ये अगोदरच कणीक मळून
ठेवली असेल तर ती चपात्या करण्याच्या दहा
पंधरा मिनिटे अगोदरच बाहेर काढून ठेवावी.

नरम त्वचा

* दूध, साय व मध एकत्र करून रात्री
झोपताना त्याचा लेप चेहर्‍यावर लावावा.
दुसर्‍या दिवशी सकाळी कोमट पाण्याने
चेहरा धुतला की, त्वचा नरम पडते. आर्द्रता
वाढते. रखरखीतपणा नाहीसा होतो. यामुळे
मुरुम-पुटकुळ्याही नष्ट होतात.
* पेरूमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेटस्,
कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न तसेच जीवनसत्व
‘ब’सुध्दा आढळते. पेरूच्या बिया व साल यात
जीवनसत्व ‘क’ भरपूर प्रमाणात असते. जसजसे
पेरू पिकत जातो तसतसे या जीवनसत्वाचे
प्रमाण वाढत जाते.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

बायको : तुमचे माझ्यावर किती प्रेम आहे!!
नवरा – ८२%
बायको : १००% का नाही!!
नवरा : १८% जीएसटी नाही का? असं टॅक्स  बुडवून
काळ्या धना सारखं काळं प्रेम करणार नाही मी.!

दैनिक पंचांग शुक्रवार, दि. १९ एप्रिल २०२४

एकादशी, शके १९४६
क्रोधीनामसंवत्सर, चैत्र शुलपक्ष, मघा १०|५७
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६ वा. २९ मि.

राशिभविष्य

मेष : आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपले धाडस वाढेल. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील

वृषभ : आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोन प्रदर्शित करा. सावकाश चालवा. आपल्या शत्रूंवर आपला प्रबळ प्रभाव राहील.

मिथुन : आजचा दिवस व्यापार क्षेत्रातील चांगली बातमी आणणारा आहे. कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत
ठामपणे मांडा. आज आपणास अनुकूल वार्ता मिळतील.

कर्क : इतर लोकांबरोबर काही विषयांवर संमती द्यावी लागू शकते. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. आपल्या व्यवसायात
काहीतरी चांगले घडून आहे.

सिंह : मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. आपली प्रसिद्धी
वाढण्याची शयता आहे.

कन्या : मित्रांचा पाठिंबा मिळेल. पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल. आपली इच्छा असेल तर दिवास्वप्नही खरी ठरू शकतात.

तूळ : महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. शत्रू पराजित होईल. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहाणार नाही. कौटुंबिक आनंददायी राहील आणि मित्रांकडून पाठबळ मिळेल.

वृश्चिक : विरोधक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक विषयांमध्ये सावध रहा. पैशासंबंधी येणार्‍या
व अडचणी दूर होतील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील.

धनु : शत्रू पराभूत होतील. काहीप्रेमपूर्ण अनुभव आज येऊ शकतात. हा वेळ  आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू शकता.

मकर : आनंदाची मिळेल. निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. एखाद्या गोष्टीवर डोळे मिटून विश्वास करू नये. आरोग्य चांगले राहील.

कुंभ : प्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल. आपल्या धाडसात वाढ होण्याची शयता आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील.

मीन : आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींची काळजी घ्या. रोख रकमेची मोठी देवघेव टाळा. कलाक्षेत्रातील लोकांना अनुकूल परिस्थिती मिळेल.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

लहान मुलांना व स्त्रियांना दाढीमिशा का नसतात?

लहान मुलांना व स्त्रियांना दाढीमिशा का नसतात?

स्त्री व पुरुषातील मुख्य फरक म्हणजे त्यांच्यात असणारी वेगळी जननेंद्रिये, पुरुषात पूबीज कोष शरीराच्या बाहेरच्या भागात, तर स्त्रियांमध्ये स्त्रीबीज कोष ओटीपोटात असतात. पौगंडावस्थेत वा वयात येत असताना मेंदूच्या नियंत्रणाखाली मुलांमध्ये टेस्टेस्टेरॉन, तर स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन व प्रोजेस्टरॉन हे हॉर्मोन्स स्रवायला सुरुवात होते. या हॉर्मोन्समुळे मुलामुलींमध्ये दुय्यम लैंगिक लक्षणे दिसू लागतात. त्यांच्या पूबीज व स्त्रीबीज कोषात पुनरुत्पादनासाठी आवश्यक असणारी पूबीजे (शुक्राणू) व स्त्रीबीजे (अंडी) अनुक्रमे तयार होतात. दुय्यम लैंगिक लक्षणांत आवाज फाटणे, कंठ फुटणे, काखेत व जननेंद्रियांवर केस येणे यांचा समावेश मुले-मुली दोहोंत होतो. मुलींमध्ये स्तनांची वाढ होते. मेदाचे साठे वाढतात. मासिक पाळी सुरू होते. मुलांमध्ये दाढी- मिशा येऊ लागतात. बिजाची निर्मिती होऊ लागते. मुला-मुलींमध्ये वेगवेगळे हॉर्मोन्स स्रवत असल्याने मुलींना दाढी-मिशा येत नाहीत, तर मुलांमध्ये स्तनांची वाढ होत नाही. एक लक्षात घ्यायला हवे की, मुलींमध्ये टेस्टोस्टेरॉन असतो, पण तो अत्यंत अल्प प्रमाणात असतो व मुलांमध्येही अत्यल्प प्रमाणात इस्टोजेन असतो. काही वैगुण्यामुळे वा विकारांमुळे या हॉर्मोन्सचे प्रमाण वाढल्यास मुलींमध्ये दाढी-मिशासारखी पुरुषी लक्षणे, तर मुलांमध्ये स्तनांची वाढ होण्यासारखी बायकी लक्षणे दिसून येतात.