मेथ्या खाल्ल्याने मधुमेहावर नियंत्रण
टाइप २ च्या मधुमेहाच्या रुग्णांना, रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मेथ्यांचा निश्चित
उपयोग होतो. मेथीमध्ये भरपूर फायबर आणि ट्रायगोनेलिन नावाचे एक द्रव्य असते. यांचा दुहेरी
फायदा होतो. यामुळे शरीरात इन्शुलिनची संवेदनशीलता वाढते शिवाय वजनही कमी होते.
म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांसाठी नियमित मेथीचे दाणे खाणे उत्तम. ज्यांची रक्तशर्करा जास्त आहे
अशांना ती नियंत्रित राहण्यास मेथ्यांचा उपयोग होतो. काही वेळा नियमित मेथ्या खाणार्यांचे
औषधाचे डोस कमी होण्याचीही शयता असते, मात्र हे करताना, डॉटरांच्या सल्ल्यानेच बदल
करावेत.