—, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर,
चैत्र शुलपक्ष, आश्लेषा ०७|५७
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६ वा. २९ मि.
राशिभविष्य
मेष : आपल्या आवडीच्या नातलगांना भेटा आणि स्वतःबद्दल त्यांची प्रतिक्रिया मिळवा. प्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा.
आर्थिक खर्च अधिक होईल. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल.
वृषभ : ज्या व्यक्तीकडे फुकट घालवण्यासाठी वेळ आहे त्याचे ऐकण्याचा प्रयत्न करा आणि आपला सल्ला त्याला द्या.
आरोग्याची काळजी घ्या. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा.
मिथुन : आपण आपल्या घराच्या वाढीबाबत काही योजना बनवू शकता. आपल्या आवडीच्या नातलगांना भेटा. कौटुंबिक वाद-विवाद टाळा. मिळकतीपेक्षा अधिक खर्च होईल.
कर्क : आजचा दिवस आपल्यासाठी नवी सुरुवात करण्यास किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय ठरावण्यास साहाय्यक असू शकतो.
पैशासंबंधी येणार्या व अडचणी दूर होतील. आरोग्य उत्तम राहील.
सिंह : आपण जीवनात हव्या असलेल्या वस्तूंवर लक्ष द्या व पूर्ण विश्वासाने त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करा. मानसन्मानात वाढ
होईल. मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल.
कन्या : महत्त्वाच्या कामांसाठी श्रम करावे लागेल. आर्थिक विषयांमध्ये
सावगिरी बाळगा. भावनेच्या भरात वाहून नुकसान होण्याची शयता आहे. अपेक्षित व्यक्तींचे सहकार्य मिळेल.
तूळ : हसत खेळत वेळ खर्च होईल. व्यापार-व्यवसाय सहज राहील. कौटुंबिक सभासदांचा सहयोग मिळेल. नोकरदारांना अनुकूल वातावरण मिळेल.
वृश्चिक : व्यापार व प्रणयाच्या क्षेत्रात यश मिळेल. प्रिय व्यक्तीबरोबर संवाद होईल.
आरोग्याची काळजी घ्या.
धनु : मित्रांचा अनुकूल सहयोग मिळेल. आज आपल्या आयुष्यात आपल्या नातलागांची व मित्रांची चांगली भूमिका रहाणे शय आहे. व्यापार-व्यवसायात वातावरण अनुकूल मिळेल.
मकर : नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा. आवश्यक कार्य देखील पूर्ण होतील. राजकारणी व्यक्तींना उद्देशात यश मिळेल.
कुंभ : आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोन प्रदर्शित करा. आपले काम धाडसाने करा.
मीन : प्रेमीजनांसाठी आजचा दिवस आनंदाने परिपूर्ण असेल. सुख-शांतीचे वातावरण राहील. मिळकतीपेक्षा अधिक खर्च होईल.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर