मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
44

विंचू चावल्यास काय करावे?

शहरामध्ये विंचू चावण्याचे प्रमाण कमी असले तरी दमट, अंधार्‍या जागी, गोठ्यांजवळ विंचू असू शकतात. अशा ठिकाणी वावरताना तसेच शेतात काम करताना अपघाताने विंचू चावू शकतो. विंचू चावतो तो तोंडाने नव्हे, तर त्याला एक नांगी असते. ती पोकळ असून त्यात विषाने भरलेली नळी असते. या नांगीने जखम होऊन त्यातून विष आपल्या शरीरात सोडले जाते. विंचवाचे विष सापाहून विषारी असते; परंतु त्याचे प्रमाण कमी असल्याने सापाच्या विषाप्रमाणे त्याचे परिणाम दिसत नाहीत. विंचू चावल्यावर चावलेल्या जागी खूप आग होते. ती जागा लाल होते. काही वेळेस डोके दुखणे, चक्कर, मळमळ होणे, खूप घाम येणे, हातापायाला पेटके येणे, बेशुद्धी येणे अशी लक्षणे दिसून येतात. इंगळीच्या विषाने याहून गंभीर परिणाम होऊन मृत्यूही होऊ शकतो. हाताला किंवा पायाला विंचू चावल्यास त्याच्या वरच्या बाजूस पट्टी बांधावी. गरज असल्यास चावलेल्या जागी छेद घ्यावा. जखम पाण्याने, अमोनिया किंवा पोटॅशियम परमँग्नेटने धुवावी. बधिर करण्यासाठी औषध उपलब्ध असल्यास ते टाकावे. चावलेल्या भागाची हालचाल शयतो करू नये. त्यामुळे विष कमी शोषले जाते. लक्षणांमध्ये वाढ होत गेल्यास, तसेच इंगळीने म्हणजे लाल मोठ्या विंचवाने दंश केल्यास, लहान मुलांना विंचू चावल्यास लगेच डॉटरांचा सल्ला घ्यावा.