दैनिक पंचांग रविवार, दि. २१ एप्रिल २०२४

प्रदोष, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर,
चैत्र शुलपक्ष, उत्तरा १७|०८
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६
वा. २९ मि.

राशिभविष्य

मेष : आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल. देवाण-घेवाण टाळा. प्रवासाचे योग संभवतात. जोखिम असलेल्या
कार्यांमध्ये गुंतवणूक करू नये.

वृषभ : मनोरंजनासाठी वायफळ खर्च करु नये. व्यस्त रहाल. आरोग्य उत्तम राहील. राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील. जोडीदारा बरोबर तणाव ठेऊ नका.

मिथुन : मनोरंजनासाठी काही प्लॅन कराल. कुटुंबाकडून सहयोग मिळेल. उपजीविकेच्या स्त्रोतांमुळे लाभ प्राप्ति. भागीदारीतून विशेष लाभ.

कर्क : व्यापार-व्यवसायिकांना दिवस संमिश्र. मानसिक सुखशांती मिळेल. मतभेदांपासून लांब रहा. व्यापार चांगला राहील. विवाह योग, घरात शुभ मांगलिक कार्ये.

सिंह : आजची संध्याकाळ मित्रांबरोबर व्यतित करण्याच्या प्रयत्न करा. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. अधिकारांचा योग्य वापर करा. स्पर्धा, पैजा जिंकू शकाल. लाभ होईल.

कन्या : कामाच्या ठिकाणी प्रसन्न वातावरण राहील. काळ अनुकूल आहे. उपजीविकेच्या स्त्रोतातून लाभ होईल.

तूळ : प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व संपर्क आपल्यासाठी आनंदायी ठरेल. आरोग्याची व खाण्या-पिण्याची काळजी घ्या. अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल. मनावरील दडपण दूर.

वृश्चिक : राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल. आर्थिक नुकसानाची शयता आहे. व्यापारिक
भागीदारीसाठी उत्तम वेळ. अभीष्टसिद्धी होईल. फायदा होईल.

धनु : काही प्रश्नांची सोडवणूक सर्वांना करावी लागेल. शत्रूंपासून दूर राहा. अनुसंधानातून कार्यक्षेत्रात प्राप्ति योग. उत्तम
वाहन सुख. तब्बेतीत सुधारणा.

मकर : वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. कामाचा भार अधिक राहील. धर्म, आध्यात्मात रूचि वाढेल. अनुकूलतेमुळे मन प्रसन्न राहील.

कुंभ : जोखमीची कामे टाळा. एखाद्याच्या सहयोगाने कार्ये पूर्ण होतील. संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते.
कार्यक्षमता वाढल्याने उत्साह वाढेल. आनंदाची बातमी मिळेल.

मीन : महत्वाचे काम टाळा. कौटुंबिक सभासदांशी वादविवाद टाळा. जोडीदाराबरोबर घालवलेली वेळ सुखद राहील. कार्यक्षेत्राचा विकास आणि विस्तार होईल. लोकप्रियतेत वृद्धि होईल. धार्मिक कार्यात वेळ जाईल.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

एड्स म्हणजे काय?

एड्स म्हणजे काय?

एड्स हा शब्द गेल्या काही वर्षांत वारंवार कानावर पडू लागलेला आहे. हा शब्द उच्चारताच एक भयंकर आजार, ज्याचा अंत केवळ मरणात आहे, आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. एड्स हा एक रोग आहे, हे तर आपल्यापैकी बर्‍याच जणांना एव्हाना माहित झाले असेल. एड्सबद्दल आपण जास्त माहिती घेणे त्यात आवश्यक आहे, कारण आज नाही तरी अजून ५-१० वर्षांत आपल्या देशात भेडसावणार्‍या गंभीर समस्यांमध्ये एड्सचा समावेश नक्कीच झालेला असेल. एड्स म्हणजे अक्वायर्ड अम्यूनो डेफिशियन्सी सिन्ड्रोम. सर्वप्रथम १९८१ मध्ये अमेरिकेत या रोगाचे निदान झाले. भारतात हा रोग १९८६ मध्ये आढळून आला. २००० पर्यंत भारतात एड्सचे काही हजार रुग्ण आहेत. एड्स हा विषाणूंमुळे होणारा आजार आहे. या विषाणूंचे वैशिष्ट्य म्हणजे ते शरीराच्या रोगप्रतिकार शक्ती निर्माण करणार्‍या पेशींवर हल्ला करून त्यांना नष्ट करतात. रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने अनेक बुरशी संवर्गातील परजीवी जंतू, काही विषाणू व काही सामान्यतः मनुष्याला रोग न करणारे जिवाणू मामसाच्या शरीरात प्रवेश करतात व रोग होतात. या रोगांना संधीसाधू सांसर्गिक रोग असे म्हणतात. एड्सचे विषाणू शरीरात शिरल्यापासून एड्स होईपर्यंत अनेक वर्षे लोटतात. एड्सचे निदान करणार्‍या एलाइझासारख्या तपासण्या एड्स विषाणूच्या शरीरात प्रवेशानंतर शरीराने दिलेल्या अँटीबॉडीज्रूपी प्रतिसादावर अवलंबून असतात. त्यामुळे एच.आय.व्ही. पॉझिटीव्ह (शरीरात एड्सचे जंतू असलेली) व्यक्ती एड्सचा रुग्ण होईल वा नाही, वा केव्हा होईल, हे नक्की सांगता येत नाही. एड्सच्या लक्षणांत महिन्याभराहून जास्त काळ खोकला, शरीरभर लिंफ ग्रंथीची वाढ, त्वचेचे दाह, महिन्याभराहून जास्त काळ ताप, जुलाब, तसेच वजनात दहा टयांहून जास्त घट इत्यादींचा समावेश होतो.

सुविचार

सतत थेंबाथेंबाने पडणारे पाणी कठीण पाषाणालाही भेदू शकते; परंतु पाण्याचा
मोठा लोंढा त्याच्यावरून वाहून गेला तरी त्याची नावनिशाणीही राहत नाही. : स्वेट मॉर्डन

संधिवाताच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

संधिवाताच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको
एखाद्याला घोरण्याबद्दल सतत चिडवलं जातं. मस्करीला सामोरं जावं लागतं. चारचौघांतही
टीका सोसावी लागते, पण हसून दुर्लक्ष करण्याएवढा हा विषय साधा नाही. कदाचित हे एखाद्या
मोठ्या दुखण्याचे संकेत असू शकते. कदाचित हे संधिवाताचे लक्षण असू शकेल.
हा एक हाडासंबंधी आजार आहे. आठवड्यातून तीन-चार वेळा बिअर घेणार्‍यांनाही
तो संभवतो. ही व्याधी अपंग बनवणारी आहे. काही प्रसंगी पेशंट बेडवरून उठू देखील शकत
नाही. साधारणत: २० ते ५० वयोगटातील महिला या व्याधीनं प्रभावित होऊ शकतात. यामुळे
स्नायूमधील शक्ती कमी होते आणि लवचिकता कमी झाल्याने व्यक्ती पूर्ण कार्यक्षमतेने काम करू
शकत नाही.

हैदराबादी वांग्याची भाजी

हैदराबादी वांग्याची भाजी
साहित्य – २-३ मध्यम वांगी, २
कांदे. ३-४ हिरव्या मिरच्या, ३-४ लाल
वाळलेल्या मिरच्या, लसूण, ओले खोबरे, १
लहान तुकडा, कडीपत्ता, मोहरी, पाव टी स्पून
तीळ, अर्धा टी स्पून धने, चिंच, मीठ, हळद,
तेल, हवा असल्यास गूळ.
कृति – हिरव्या मिरच्या, लसूण व कांदे
बारीक चिरून घ्या. चिंच थोड्या पाण्यात
भिजत घाला व तिचा गर काढून घ्या. लाल
मिरची, कांदा थोड्याशा तेलात तळून निथळून
वेगळी वाटा. गूळ किसून घ्या.
वांगी उभी चिरून गरम तेलात तळून
काढा. तीळ कोरडे भाजून भरड वाटावेत.
१ मोठा चमचा तेल गरम करावे व त्यात
हिरव्या मिरच्या व हळद टाकावी. वाटलेले
लसूण, खोबरे, वाटलेल्या कांद्याची पेस्ट व
चिंच टाकून एकत्र परतावे.
वाटलेले तीळ टाकून परतत राहावे.
वांग्याचे तुकडे टाकून झाकून ठेवावे. अर्ध्या
मोठा चमचा तेलात मोहरी व कडीपत्ता
तडकवून वरून टाकावा. ५ मिनिटे जाळावर
ठेवून सर्व्ह करावे.

वास्तू

झाडू घरात उघड्यावर,
उभा ठेवणे अत्यंत अशुभ
झाडू, फडके व डस्टबीन या वस्तू
नेहमी लपवूनच ठेवाव्यात. त्या स्वयंपाकघर,
डायनिंग रुम, बेडरुम इ. ठिकाणी उघड्यावर
ठेवू नयेत. या वस्तू सहजपणे दिसतील
अशा ठिकाणी ठेवणेच वास्तूशास्त्राने निषिध्द
मानले आहे. झाडू लपवून ठेवावा, याचा
अर्थ तो कोपर्‍यात उभा करून ठेवू नये.
तो कोपर्‍यात आडवा करून ठेवावा. कारण
येथूनच माणसाचे नशीब प्रवेश करते, अशी
वास्तूशास्त्राची धारणा आहे.

काळे केस

तूप खावे व केसांच्या मुळांना चोळावे.
केस काळे होतील.

कोथिंबीर व कढीपत्त्याच्या काड्या

कोथिंबीर व कढीपत्त्याच्या काड्या
फेकून न देता सावलीत वाळवा व वाटून घ्या.
या दही, रायता, पुलावात टाकू शकता.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

नवरा : “वकिल साहेब, मला लवकरात लवकर घटस्फोट
हवाय. गेले सहा महिने माझी बायको माझ्याशी एक शब्द
सुद्धा बोललेली नाही.”
वकिल : ”परत एकदा विचार करा, इतकी गुणी बायको पुन्हा
मिळणार नाही!!!”

दैनिक पंचांग शनिवार, दि. २० एप्रिल २०२४

—, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर,
चैत्र शुलपक्ष, पूर्वा १४|०४
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६ वा. २९ मि.

राशिभविष्य

मेष : शत्रूंना मात द्याल. अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल. आपल्या सर्जनशील व कलात्मक वैशिष्ट्यांना प्रेरणा मिळेल.

वृषभ : आपल्या आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक विषयांमध्ये आपणास समर्थन मिळेल पण एखाद्याला जामीन देणे टाळा. इतर लोकांना आपल्या स्वतःची गरज व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे.

मिथुन : आर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवा. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवाल.
सहकार्‍यांबरोबरील मतभेदांचे प्रसंग मिटवा.

कर्क : व्यवसायात प्रगती कराल. स्थिती अनुकूल राहील. आरोग्य उत्तम राहील. महत्वपूर्ण कार्यात यश मिळेल. आपल्या जुन्या लोकांना किंवा आधार देणार्‍या मित्रांना जोडणे या वेळी आपल्यासाठी फलदायी आहे.

सिंह : अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. वाद- विवाद टाळण्याचे प्रयत्न करा.

कन्या : वाहने काळजीपूर्वक चालवा. भावनाशील असल्यामुळे नुकसान होणे शय आहे. उपकरणे व यंत्रे जपून वापरा. हुशारीने गुंतवलेले धन आपणास ध्येयाजवळ घेऊन जाईल.

तूळ : मनावर नियंत्रण ठेवा. पैशाच्या बाबतीत आपली नड भागेल. कार्यक्षेत्रात वेगाने कार्य करा पण घाई करू नका. जोखिम असलेले कार्ये टाळा. आरोग्य मध्यम राहील. अधिकार क्षेत्रात वाढ होईल.

वृश्चिक : बेपर्वाईने कार्य करू नका. कुटुंबियांबरोबर वार्तालाप केल्याने एकमेकांच्या गरजा समजण्यात मदत मिळेल.

धनु : मागील एखादे बाकी राहिलेले काम आज पूर्ण होईल. उधारी व उसनवारी वसुल होईल. वाहने सावकाश चालवा.

मकर : एखाद्या विशिष्ट योजनेला हातावेगळे करण्यात बराच वेळ जाईल. वेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल.

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. व्यापारय्व्यवसायात स्थिती सुखद राहील. आपल्या इच्छेवर आणि मनस्थितीवर संयम ठेवा.

मीन : कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शयता आहे. आर्थिक पक्षाबाबत सावध राहा. मातृपक्षाकडून प्रसन्नता राहील.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.