हैदराबादी वांग्याची भाजी
साहित्य – २-३ मध्यम वांगी, २
कांदे. ३-४ हिरव्या मिरच्या, ३-४ लाल
वाळलेल्या मिरच्या, लसूण, ओले खोबरे, १
लहान तुकडा, कडीपत्ता, मोहरी, पाव टी स्पून
तीळ, अर्धा टी स्पून धने, चिंच, मीठ, हळद,
तेल, हवा असल्यास गूळ.
कृति – हिरव्या मिरच्या, लसूण व कांदे
बारीक चिरून घ्या. चिंच थोड्या पाण्यात
भिजत घाला व तिचा गर काढून घ्या. लाल
मिरची, कांदा थोड्याशा तेलात तळून निथळून
वेगळी वाटा. गूळ किसून घ्या.
वांगी उभी चिरून गरम तेलात तळून
काढा. तीळ कोरडे भाजून भरड वाटावेत.
१ मोठा चमचा तेल गरम करावे व त्यात
हिरव्या मिरच्या व हळद टाकावी. वाटलेले
लसूण, खोबरे, वाटलेल्या कांद्याची पेस्ट व
चिंच टाकून एकत्र परतावे.
वाटलेले तीळ टाकून परतत राहावे.
वांग्याचे तुकडे टाकून झाकून ठेवावे. अर्ध्या
मोठा चमचा तेलात मोहरी व कडीपत्ता
तडकवून वरून टाकावा. ५ मिनिटे जाळावर
ठेवून सर्व्ह करावे.