संधिवाताच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको
एखाद्याला घोरण्याबद्दल सतत चिडवलं जातं. मस्करीला सामोरं जावं लागतं. चारचौघांतही
टीका सोसावी लागते, पण हसून दुर्लक्ष करण्याएवढा हा विषय साधा नाही. कदाचित हे एखाद्या
मोठ्या दुखण्याचे संकेत असू शकते. कदाचित हे संधिवाताचे लक्षण असू शकेल.
हा एक हाडासंबंधी आजार आहे. आठवड्यातून तीन-चार वेळा बिअर घेणार्यांनाही
तो संभवतो. ही व्याधी अपंग बनवणारी आहे. काही प्रसंगी पेशंट बेडवरून उठू देखील शकत
नाही. साधारणत: २० ते ५० वयोगटातील महिला या व्याधीनं प्रभावित होऊ शकतात. यामुळे
स्नायूमधील शक्ती कमी होते आणि लवचिकता कमी झाल्याने व्यक्ती पूर्ण कार्यक्षमतेने काम करू
शकत नाही.