एड्स म्हणजे काय?

0
79

एड्स म्हणजे काय?

एड्स हा शब्द गेल्या काही वर्षांत वारंवार कानावर पडू लागलेला आहे. हा शब्द उच्चारताच एक भयंकर आजार, ज्याचा अंत केवळ मरणात आहे, आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. एड्स हा एक रोग आहे, हे तर आपल्यापैकी बर्‍याच जणांना एव्हाना माहित झाले असेल. एड्सबद्दल आपण जास्त माहिती घेणे त्यात आवश्यक आहे, कारण आज नाही तरी अजून ५-१० वर्षांत आपल्या देशात भेडसावणार्‍या गंभीर समस्यांमध्ये एड्सचा समावेश नक्कीच झालेला असेल. एड्स म्हणजे अक्वायर्ड अम्यूनो डेफिशियन्सी सिन्ड्रोम. सर्वप्रथम १९८१ मध्ये अमेरिकेत या रोगाचे निदान झाले. भारतात हा रोग १९८६ मध्ये आढळून आला. २००० पर्यंत भारतात एड्सचे काही हजार रुग्ण आहेत. एड्स हा विषाणूंमुळे होणारा आजार आहे. या विषाणूंचे वैशिष्ट्य म्हणजे ते शरीराच्या रोगप्रतिकार शक्ती निर्माण करणार्‍या पेशींवर हल्ला करून त्यांना नष्ट करतात. रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने अनेक बुरशी संवर्गातील परजीवी जंतू, काही विषाणू व काही सामान्यतः मनुष्याला रोग न करणारे जिवाणू मामसाच्या शरीरात प्रवेश करतात व रोग होतात. या रोगांना संधीसाधू सांसर्गिक रोग असे म्हणतात. एड्सचे विषाणू शरीरात शिरल्यापासून एड्स होईपर्यंत अनेक वर्षे लोटतात. एड्सचे निदान करणार्‍या एलाइझासारख्या तपासण्या एड्स विषाणूच्या शरीरात प्रवेशानंतर शरीराने दिलेल्या अँटीबॉडीज्रूपी प्रतिसादावर अवलंबून असतात. त्यामुळे एच.आय.व्ही. पॉझिटीव्ह (शरीरात एड्सचे जंतू असलेली) व्यक्ती एड्सचा रुग्ण होईल वा नाही, वा केव्हा होईल, हे नक्की सांगता येत नाही. एड्सच्या लक्षणांत महिन्याभराहून जास्त काळ खोकला, शरीरभर लिंफ ग्रंथीची वाढ, त्वचेचे दाह, महिन्याभराहून जास्त काळ ताप, जुलाब, तसेच वजनात दहा टयांहून जास्त घट इत्यादींचा समावेश होतो.