पाश्चराइझड् दूध म्हणजे काय?

पाश्चराइझड् दूध म्हणजे काय?

आपण पिशव्यांचे दूध जेव्हा आणतो, तेव्हा त्यावर पाश्चराइझड् मिल्क असे लिहिलेले असते. पाश्चराइझड् म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला सतावत असेल. लुईस पाश्चर या शास्त्रज्ञाच्या नावावरून हे नाव दिले गेले आहे. या फ्रेंच शास्त्रज्ञाने दूध निर्जंतुक करण्याची जी पद्धत शोधून काढली, त्याला ‘पाश्चरायझेशन’ असे म्हणतात. आपल्या घरी दूध खराब होऊन नासू नये म्हणून एकतर आपण ते फ्रिजमध्ये ठेवतो वा उकळवून थंड करून फ्रिजमध्ये ठेवतो. दूध आणून जर तसेच ठेवले, तर काही वेळाने ते नासते. उन्हाळ्यात तर असे फार लवकर होऊ शकते. मग दुधाचे एवढे टँकर, लाखो लिटर दुधाच्या डेअरीमध्ये दूध टिकावे म्हणून काय करत असतील, हा प्रश्न अनेकांना पडला असेल. यासाठी काय करतात, ते आपण पाहू. दूध योग्य त्या तापमानापर्यंत योग्य त्या काळासाठी गरम करून त्यासाठी सर्व रोगकारक जंतू नष्ट करण्याच्या प्रक्रियेला ‘पाश्चरायझेशन’ असे म्हणतात. या प्रक्रियेत दुधातील घटक त्याचा रंग, वास, पोषणमूल्य इत्यादींमध्ये कोणताही बदल होत नाही. पाश्चरायझेशनच्या अनेक पद्धती असल्या, तरी त्यातील एक पद्धत सामान्यतः वापरली जाते. या पद्धतीत दूध अत्यंत वेगाने खूप कमी वेळात ७२० से. पर्यंत गरम करतात. त्या तापमानाला किमान १५ सेकंद ठेवून नंतर अत्यंत वेगाने ४० सेंटीग्रेड इतके थंड करतात. या पद्धतीत खूप मोठ्या प्रमाणातील दुधाचे पाश्चरायझेशन दर तासाला होऊ शकते, त्यामुळे डेअरीमध्ये ही पद्धत वापरतात. पाश्चरायझेशनमुळे आपल्याला सुरक्षित दूध मिळते. पाश्चरायझेशनमुळे ९०% जंतू मरतात. म्हणून घरी आणल्यानंतर जर ते तसेच ठेवले, तर खोलीतल्या तापमानामुळे या जिवाणूंची वाढ होऊ शकते. पाश्चराईझ् केलेले दूध खराब होऊ नये म्हणून आणल्यावर एकतर ते उकळवून घ्यावे किंवा फ्रिजमध्ये ठेवावे.

भात आरोग्यासाठी उपयुत

भात आरोग्यासाठी उपयुत


तांदूळामध्ये फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असल्याने तो आरोग्यासाठी चांगला
असतो असेही काही संशोधनातून समोर आले आहे. भाताबरोबर आपण भाजी, आमटी खात
असल्याने भातातून थेट शरीरावर होणारे परिणाम होत नाहीत. अनेकदा आहारतज्ज्ञही भात खा
पण तो प्रमाणात खा असे सांगतात. त्यामुळे भात पूर्ण बंद करणे हा लठ्ठपणा किंवा रक्तातील
साखर कमी करण्याचा उपाय नव्हे असे या अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यामुळे भात आरोग्यासाठी
चांगला नसतो हे विधान वादग्रस्त आहे असे म्हणता येईल.

सिझेरीयन म्हणजे काय?

सिझेरीयन म्हणजे काय?

“सिझेरीयन झाले शेवटी”, “सिझेरीयनशिवाय गत्यंतर नाही, असे डॉटर म्हणाले” अशी वाये मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये वारंवार ऐकू येतात. बाळंतपणासाठी गेलेली स्त्री सात-आठ दिवस बिछान्यावर पडून असते. नंतर टाके काढल्यानंतर तिला घरी जाऊ देतात. एकूण सिझेरीयन व बाळंतपण यांचा संबंध आहे, हे आपल्या लक्षात आले असेल. ९५% प्रसूती नैसर्गिकरित्या होतात. म्हणजेच मातेच्या योनीमार्गातून बाळ बाहेर येते. काही वेळा मात्र योनीमार्गातून बाळ बाहेर येणे शय नसते. बाळाचे डोके मोठे असते वा मातेच्या कमरेच्या हाडांच्या ज्या पोकळीतून बाळ बाहेर येते ती पोकळी खूप लहान असते. कधी माता बाळंतपणाच्या कळा घेऊ शकत नाही. कधी तिचे पूर्व सिझेरियन झालेले असते. या सर्व कारणांमुळे योनीमार्गातून मुलाचा नैसर्गिकरित्या जन्म न होता ते पोटातून काढावे लागते. प्रथम ओटीपोटीवर छेद घेऊन नंतर गर्भाशयाचा छेद घेतल्यानंतर काही क्षणांतच बाळ बाहेर काढले जाते. एकदा मूल बाहेर आले की, मग त्याची काळजी नैसर्गिकरित्या जन्माला आलेल्या मुलाप्रमाणेच घेतली जाते. आजकाल सिझेरीयनचे प्रमाण वाढत चाललेले दिसते. डॉटरी व्यवसायातील धंदेवाईकपणा, हे याचे एक कारण असले तरी, वेदना सहज न करण्याकडे असलेला आधुनिक स्त्रियांचा कल, पूर्वीसारखी घरगुती कामे (बसून कपडे धुणे, सारवणे आणि बरीच इतर शारीरिक कष्टाची कामे) करावी न लागल्याने कमी होऊ लागलेली गर्भाशयाच्या स्नायूंची शक्ती ही कारणे देखील दुर्लक्षण्याजोगी नाहीत. त्यामुळे बर्‍याचदा स्त्रिया स्वतः होऊनच सिझेरीयन करायची विनंती डॉटरांना करतात. वेदनेशिवाय, कळांशिवाय मातृत्व ही कल्पनाच करणे योग्य नाही. सिझेरीयनचे दुष्परिणामही होऊ शकतात. ही शस्त्रक्रिया असल्याने भूल देण्यातील धोके, शस्त्रक्रियेत होणारे उपद्रव, जंतु संसर्गाची भीती असतेच. शिवाय साध्या बाळंतपणापेक्षा खर्चही ५-६ पट अधिक येतो. बाळाला दूध पाजणेही ४-६ तास (स्त्री शुद्धीवर येईपर्यंत) उशीरा सुरू होते. तसेच एकदा सिझेरीयन झाले की, बरेचदा पुढच्या बाळाच्या वेळीही सिझेरीयनच करावे लागते. या सर्व बाबी लक्षात घेता मातांनी सहनशीलता दाखवून सिझेरीयन टाळता येईल तेवढे टाळण्याचा प्रयत्न करावा.

घोरणे ठरू शकते घातक

घोरणे ठरू शकते घातक
या व्याधीत शरीरात काही घातक द्रव्य तयार होतात. ही द्रव्ये स्नायूंमधील रसायनांवर
हल्ला करतात आणि त्यामुळे संबंधित स्नायूभोवतालची जागा लाल आणि गरम होते. याबरोबरच
असह्य वेदनाही सुरू होतात. रोगाच्या पहिल्या अवस्थेमध्ये थकवा, भूक कमी होणे, घोरण्याचे
प्रमाण वाढणे आदी लक्षणे दिसतात. कालांतराने हातपायावर सूज, हातपायाची बोटे सुजणे,
कोपरावरील सूज आणि सांधेदुखी सुरू होते. काही दिवसांतच हातापायांची हालचाल कमालीची
वेदनादायी ठरते आणि छोटी-मोठी कामेही अशय होऊन बसतात. म्हणूनच वेळेवर ही लक्षणे
ओळखून डॉटरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

सुविचार

परिश्रमांशिवाय प्राप्त होईल अशी कोणतीही मूल्यवान वस्तू जगात नाही. : एडिसन

राघवदास लाडू

राघवदास लाडू

साहित्य : हरभरा डाळीचा रवा ४
वाट्या, १ वाटी साजूक तूप, अर्धी वाटी
खवा, २ वाट्या साखर, १ चमचा वेलदोडे
पूड, काजू, बेदाणे.
कृती : हरभरा डाळीचा रवा दूध घालून
घट्ट भिजवून ठेवावा. २ तासांनंतर तूप घालून
रवा मोकळा करून खमंग भाजावा. खवा
भाजून त्यात मिसळावा. साखरेत पाणी घालून
दोन तारी पाक करावा. पाकात रवा, खवा,
वेलदोडे पूड घालून मिश्रण एकसारखे करून
ठेवावे. २-३ तासांनी लाडू वळावेत. वरून
काजू, बेदाणे बसवावेत. राघवदास लागू खूप
चवदार, खमंग लागतो. शक्तिवर्धक आहे. आठ
दिवस टिकतो.

ओठांना कात्रे पडल्यास…

ओठांना कात्रे पडल्यास…
* साजूक तूप अगदर लोणी लावावे.
* मध लावावा. * निरशा दुधावरील फेस
लावणे. * साय लावावी, त्यात थोडी हळद
घालावी.

वास्तू

* मुलांनी डायनिंग टेबलवर अभ्यास
करणे अत्यंत अशुभ होय.
* स्वयंपाकघर आग्नेय कोपर्‍याव्यतिरिक्त
इतर कोणत्याही दिशेस बांधलेले असल्यास
कुटुंबातील महिला कायम मानसिक
तणावाखाली राहतात.

कॅसेटचा आवाज खरखरत असेल तर

* पोटदुखी, मुरडा इ. त्रासात ओवा
व मिठासोबत हिंग सेवन करावा.
* टोमॅटोची आंबट-गोड चटणी
तयार केल्यानंतर त्यात सायट्रिक अ‍ॅसिड
मिसळल्यास ती आठवडाभर टिकू शकते.
* फ्लॉवर वाळवायचा असेल, तर
त्याची फुले तोडून माळेत ओवून उन्हात
वाळवावीत.
* कॅसेटचा आवाज खरखरत असेल
तर ती थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवा. आवाज
व्यवस्थित येईल.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

हसा आणि शतायुषी व्हा!

गोट्या : आपण घरात नेहमी ५ जण राहणार तू, बाबा, आई
आणि मी न दिदी
आजी : नाही रे…तुझे लग्न झाले की ६ होणार…
गोट्या : दिदीचे लग्न झाले की परत ५ होणार
आजी : तुला मुलगा झाला की परत ६ होणार
गोट्या : तू मेल्यावर परत ५ होणार…
आजी : झोप कुत्र्या…